रंग कोकणी महोत्सवाचे.....

Submitted by रोहित ..एक मावळा on 8 March, 2011 - 00:35

निसर्गसंपत्तीने नटलेलं कोकण म्हणजे महाराष्ट्राचं नंदनवनच.
हिरवा शालु पांघरलेला कोकण अन स्वच्छ- सुंदर समुदकिनारे, जलदुर्ग, पवित्र धार्मिक भक्तीस्थाने, खाड्या, नारळी-पोफळी तसंच आंबा-काजूच्या बागा, वेगाने वाहणा-या नद्या हे सारं काही आपल्याला नेहमी आकर्षित करते.फक्त एव्हढच नाही तर कोकणातील संस्कृती,लोककला,खाद्यसंस्कृती,आपल्या पराक्रमाने जगावर प्रभाव टाकणारी कोकणरत्ने याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.अशा या कोकणची ओळख जागतिक स्तरावर होण्यासाठी नुकताच २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०११ रोजी मुंबईत कोकण महोत्सव पार पडला.

माझे कार्यालय वांद्रे-कुर्ला संकुलातच असल्याकारणाने शुक्रवारी २५ फेब्रुवारीला संध्याकाळी कामावरुन सुटल्यानंतर या महोत्सवाची मजा अनुभवायला गेलो.सर्व काही माझ्या कॅमेरात टिपता आले नाही.पण जे टिपल ते तुमच्यासमोर मांडत आहे.

जगप्रसिद्ध कलादिग्दशर्क नितीन देसाई यांनी उत्तुग ते अथांग कोकणदर्शन आपल्या संकल्पनेतुन साकारल होत.

रस्त्याने जाताना अशी वेगवेगळी आकर्षक होर्डीग लक्ष्य वेधुन घेत होती.

किल्ल्याचा दरवाजा.....

तुतारी...

छत्रपती शिवाजी महाराज ......
महाराजांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.

पालखी ....

'गाव तिथे मंदिर आणि मंदिर तिथे दशावतारी नाटय़खेळ' असं हे कोकणी माणसाने कोकणी संस्कृतीशी कायम जपलेलं विलक्षण नातं..!


......................................................................................................................


......................................................................................................................


......................................................................................................................

या महोत्सवात कोकण पर्यटनाला जास्त भर दिलेला दिसला.
वेगवेगळ्या प्रदर्शनाची दालन सुद्धा उभारली होती.
बांबुपासुन बनवलेल्या कलाकृती तर फर्मास होत्या.


......................................................................................................................

कोकणरत्न...
लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, गोखले, विनोबा भावे, महर्षी कर्वे यांच्यापासून सचिन तेंडुलकर, गावसकरपर्यंत कोकणातील जागतिक व्यक्तिमत्वांचे माहितीपूर्ण प्रदर्शन 'कोकणरत्न' या दालनात आयोजित केलेले होते.
त्यापैकी हि काही रत्न....

होडी................

कोकणचा विकास साधायचा असेल तर खेड्यापाड्यात वीज पोहोचली पाहिजे.

जगातील सर्व आश्चर्य येथे एकवटली होती.

आबालवृद्धांना भुरळ पाडणारा हा कोंबडा...............

कोकणी कौलारू घर...

माझि होडी समिंदर ,
ओढी खालीवर,.
पाण्यावर देइ ना ठरू,.
ग साजने, होडीला बघतो धरूं

कोळी नृत्याने तर बहार आणली.तरूणाईची पाऊले आपसुकच थिरकाय लागली.
... मी हाय कोली, सोडिल्या डोली, मुंबईच्या किनारी...

"सण आयलाय गो नारली पुनवेचा" ,
"गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाल कोंकण दाखवा...",
"वादळ वारा सुटला ग,"
"मी डोलकर दर्याचा राजा "
अशा एकसोएक गीतांनी मैफिलीत अजुन रंग भरले.

या आजीसुद्धा नाचात दंग झाल्या.

खरच ही लोककला पाहिल्यावर अनोखी उर्जा संचारते ना....

हे एक कोकणी मंदिर....

आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची गाडी हाकणारी स्त्री.....

कोकणखजिना या दालनात मसाल्यांपासुन कोकम सरबतापर्यंत असा बराच खजिना होता.पण येथे बरीच गर्दी असल्याकारणाने तो टिपता आला नाही.

कोकण विकासाची वाटचाल,पर्यटन,कृषी व मत्स्योद्योग,पायाभुत सुविधांचा विकास आणि पुढच्या पंधरा वर्षात कोकण कसा असेल अशा विविध विषयांवरती परिसंवाद सुद्धा आयोजित केले होते.पण नुसती चर्चा करण्यापेक्षा या प्रत्येक विषयातील आजची स्थिती, नीट नियोजन केले तर काम होऊ शकेल.उद्याचा प्रगत कोकण उभा राहु शकेल.
निसर्गसमृद्ध कोकणचा निसर्ग टिकवून आथिर्क समृद्धता आणने हेच या महोत्सवाचे खरे उद्दिष्ट होते.
ते सफल झाले तर ठिक नाही तर...

जर खरा कोकण अनुभवायचा असेल तर कोकणातच जावे लागेल.
येवा कोकण आपलाच असा....
पुन्हा भेटुया...

--- रोहित ..एक मावळा
गुलमोहर: 

.

धन्यवाद .... स्मितहास्य,दादाश्री ,यो,जिप्सी,डॉक,दिनेशदा....

झब्बु द्यावेसे वाटतायंत>> अरे जिप्सी दे ना.... Happy

पालकी नाचवताना बघायला मिळाली का ?>> नाही दिनेशदा...

मस्त रे मित्रा...
शेवटुन दुसरा फोटो. पीपी मध्ये बॅकग्राऊंड ब्लर करण्याचा प्रयत्न केला आहे काय?

धन्यवाद .. चातक,इंद्रा,मार्को पोलो..

शेवटुन दुसरा फोटो. पीपी मध्ये बॅकग्राऊंड ब्लर करण्याचा प्रयत्न केला आहे काय?>> हो रे चंदन ..तुझ्या चाणाक्ष नजरेने बरोबर ओळखल. तेव्हढासा क्लिअर आला नाही ना पण ...

धन्यवाद नादखुळा... आभारी आहे Happy

रोहित मस्तच. लहानपणी रात्र रात्र जागून (अर्धवट झोपेत)पाहिलेले दशावतार आठवले.
पालखीचा आकार जरा वेगळा वाट्तोय का?
धन्यवाद.

धन्यवाद ... शोभा१२३,सचिन राव.... Happy
पालखीचा आकार जरा वेगळा वाट्तोय का?>>शोभाजी .... खरच मला काही कल्पना नाही.पण साधारणतः पालखी दोन्ही बाजुंनी देवदर्शन घेण्यासाठी उघड्या असतात.यावर माबोवरचे जाणकार सांगतीलच...