बन-फुल्ल... (फोटो सहित)

Submitted by लाजो on 28 February, 2011 - 22:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण:

यासाठी काही प्रमाण नाही. आपल्या आवडीप्रमाणे.

सारण प्रकार १ - मिक्स भाजी:

कांदा - बारीक चिरुन
लसुण - बारीक चिरुन
लाल आणि हिरव्या कॅप्सीकमचे बारीक तुकडे
गाजर - बारीक चिरुन
मटार (फ्रोजन चालतिल)
कॉर्न चे दाणे (फ्रोजन चालतिल)
स्वीट चिली/हॉट चिली सॉस /टोमेटो सॉस / पास्ता सॉस - आवडी प्रमाणे.
कोथोंबीर/पार्सली - आवडी प्रमाणे
गरम मसाला/हरीसा/इटालियन मिक्स्ड ड्राय हर्ब्ज - आवडी प्रमाणे
मीठ चवीप्रमाणे.

*****
सारण प्रकार २: मॅश्ड पोटॅटो

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
बटर
दूध
इटालियन मिक्स्ड ड्राय हर्ब्ज - आवडी प्रमाणे आणि ऐच्छिक
मीठ, मिरेपुड चवीला.

*****

सारण प्रकार ३: अंडा भुर्जी

अंडी,
चिरलेला कांदा
चिरलेला टॉमेटो आवडत असल्यास
कोथिंबीर/पार्सली - आवडीप्रमाणे
मीठ, मिरेपुड - चवी प्रमाणे

*****
इतर पदार्थ:

बन्स किंवा ब्रेड रोल्स
किसलेले चीज
बटर

roll1.jpg

क्रमवार पाककृती: 

सारण प्रकार १: मिक्स भाजी:

- पॅनमधे थोड्या तेलावर/बटरवर लसुण थोडी परतुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला.
- कांदा मऊ होत आला की त्यात चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, कॉर्न, लाल + हिरवा कॅप्सिकम)
- भाज्या शिजत आल्या की आपल्या आवडीनुसार सॉस, मसाले, कोथिंबीर/पार्सली, मीठ घाला अणि मिक्स करुन गॅस बंद करा.
- भाजी एका बोलमधे काढुन ठेवा आणि त्यात थोडे किसलेले चीज घालुन मिक्स करा.

*****

सारण प्रकार २: मॅश्ड पोटॅटो

- पॅन मधे थोडे बटर घालुन त्यात उकडलेल बटाटे घाला. वरतुन अर्धाकप कोमट दुध घाला.
- मंद गॅससवर हे मिश्रण डावाने किंवा पावभाजी च्या मॅशर ने मॅश करा, लागेल तसे दुध घाला.
- मिश्रण नीट एकजीव झाले की त्यात अजुन थोडे बटर, आवडीप्रमाणे चीज, मीठ आणि मिरेपुड किंवा इटालियन हर्ब्ज घाला.
- मिश्रण फार घट्ट किंवा पातळ नको.

*****
सारण प्रकार ३: अंडा भुर्जी:

- अंडी थोड दुध, मीठ, मिरेपुड घालुन फेसुन घ्या.
- पेन मधे तेल्/बटर घालुन कांदा मऊसर होईतोवर फ्राय करा. आवडत असल्यास टॉमेटोचे चे तुकडे घाला.
- फेसलेली अंडी घालुन भुर्जी बनवा.
- वरतुन कोथिंबीर/पार्सली घाला.

******

असेंब्ली करता:

१. बन्स/ब्रेड रोल्स चा वरचा भाग धारधार सुरीने कापुन घ्या... ह्या टोप्या बाजुला ठेवा.
२. रोल्सचा आतला भाग फोटोत दाखवल्याप्रमाणे चमच्याने खरवडुन काढुन घ्या - बन आता वाटीसारखा दिसेल ... काढलेला भाग बाजुला ठेवा (टिप नं ६ बघा).

roll2.jpg

३. आतल्या भागाला थोडे बटर लावुन त्यात आपल्या आवडीचे सारण भरा.

roll3.jpg

४. वरतुन किसलेले चीज घालुन हे तयार रोल्स ओव्हन मधे/ग्रीलखाली ठेवा.
५. वरचं चीज मेल्ट झाली की त्यावर त्या त्या ब्रेडरोल्सच्या टोप्या लावुन बंद करा.
६. चीज गरम असल्याने टोप्या चिकटतिल.
७. प्रत्येक रोल सिल्वर फॉईलमधे गुंडाळुन थोडावेळ ५-७ मिनीटं ओव्हनमधे ठेवा.
८. सर्व्ह करताना प्लेटमधे सॅलड घालुन त्यावर फॉईलमधुन काढलेला रोल ठेवा.
९. सुरीने मधे कापुन आवडत्या सॉस बरोबर गरम गरम खा Happy

roll5.jpgroll4.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे, आवडेल तेव्हढे
अधिक टिपा: 

१. हा प्रकार झटपट होणारा आहे. सारणं आधी करुन ठेवता येतात. आयत्यावेळेला फक्त रोल्स स्टफ करायचे, गरम करायचे आणि सर्व्ह करायचे.
२. कुठल्याही भाज्या वापरता येतिल.
३. सारणाचे पण विविध प्रकार करता येतिल. व्हेज्/नॉन व्हेज कुठलेही.. फक्त चीज आणि त्याचे कॉम्बो चांगले लागले पाहिजे Happy
४. रोल्स खुप मऊ असतिल तर टोप्या नीट कापल्या जाणार नाहित. त्यासाठी रोल्स अगदी २-३ मिनीट ओव्हन मधे गरम करुन घ्या. आणि मग टोप्या कापा.
५. ओव्हनमधे रोल्स जास्तवेळ राहिले तर बाहेरुन कुरकुरीत्/कडक होतिल आणि कापताना क्रम्ब्स पडतिल.
६. ब्रेडचा आतला काढलेला चुरा, उरलेले मॅश्ड पोटॅटो, भाजी वगैरे घालुन दुसर्‍या दिवशी कटलेट्स करा Happy नाहीतर ब्रेडचा चुरा ओव्हन मधे गरम करुन ब्रेड क्रम्ब्स म्हणुन वापरा. किंवा ह्यात बटर + चीज आणि थोडी साखर किंवा मीठ घालुन छोटे छोटे लाडु वळा आणि खा. हेच लाडु तळुन्/बेक करुन ग्रेव्हीत घालुन खा....

*****

वैधानिक इशारा: या प्रकारात चीज चा सढळ हाताने वापर केलेला आहे. तरी डाएट कॉन्शस मंडळींनी लांबुनच बघावा अथवा आपल्या जबाबदारीवर अर्धाच बन्/रोल खावा Happy

माहितीचा स्रोत: 
नेट वर मोठ्या कॉब मधे सूप सर्व्ह केलेला फोटो बघितला होता त्यावरुन केलेल माझे प्रयोग :)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो मस्त रेसिपी............. Happy
नाव झकास आहे
फोटो पण एकदम छान आले आहेत. नक्की करुन बघेन.

छान आहे रेसिपी लाजो. इथे अश्या ब्रेड बोलमध्ये डिप्स भरुन देतात चिप्ससाठी किंवा सूप.
कालच तुझी आठवण काढली होती. कुल्फी केली तुझ्या रेसिपीने. Happy

छान रेसिपी Happy
सजावट, मांडणी, त्यांचे फोटो.... पेशन्सची कमाल !!<<<<<<<अनुमोदन
तु केलीस तर मी येतोच फडशा पाडायला Proud

मस्त!! एकदम छान आलेत फोटो Happy

शीर्षक वाचल्यावर 'बन्फूल... आयुर्वेदिक तेल...बन्फूल' ही जाहिरात कानात वाजायला लागली. Sad Proud

मस्त प्रकार. मफिन्सच्या आकाराचे पण बन्सपेक्षा कडक असे पाव मिळतात. (त्याला काहितरी खास नाव आहे.) ते पोखरुन पण हे सारण भरता येईल.
रच्याकने. बनफूल नावाचा एक सिनेमा होता, त्यात जितेंद्र आणि बबिता (!!??) होते.

धन्यवाद मंडळी Happy

अनु ३ Happy

जो Happy

दिनेशदा, बन-फुल्ल हे त्या सिनेमातल्या गाण्यावरुनच सुचलं... परवाच गाणं ऐकलं....म्हणुन बनफुल आणि बन-फुल्ल अशी कोटी Happy

लाजो, छान आहे रेसेपी. समर पार्टीसाठीपण चालेल. भाज्या किंवा मीट ग्रिल करून बन मधे भरता येईल.

Pages