त थ द ध न पासून सुरू होणारे शब्द

Submitted by webmaster on 19 June, 2008 - 20:26

त थ द ध न पासून सुरू होणारे शब्द

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तडका म्हणजे वरून घातलेली फोडणी- हिंदीत.
मराठीत तडका देणे / तडकवणे म्हणजे काठी वगैरेने चोपणे.
तडकून बोलणे म्हण्जे तिरसटून रागाने बोलणे.
तडकणे म्हणजे काच/ प्लॅस्टिक/ कचकडी/ स्टीलची भांडी वगैरे एका रेषेत तुटणे.

मला सध्या या शब्दांची उत्पत्ती हवी आहे.

सांग
ऐक
कुलूप
जेवण
झोप
डोळे
ससा
आंबट
गोड
तहान

ऐकणे - आकर्णनम्
डोळा - डोल्
ससा - शश असावं
आंबट - आम्लशी साधर्म्य आहे.
पहिले दौन मराठी शब्दरत्नाकरातून

झोप हा स्वप् वरून आला आहे.
डोळे कदाचित 'दल' वरून आलेला असू शकतो. 'तव नयनांचे दल हलले ग' असे काहीसे गाणे ऐकल्याचे आठवते. ते दल आहे की जल आहे? चूभूद्याघ्या. शिवाय नयनपाकळ्या हा शब्द आहेच. दल म्हणचे अर्धा भाग,उदा. डाळ .म्हणून पापण्यांना दलें म्हणत असावेत. अर्थात हा माझा अंदाज. 'दल' म्हणजे अर्थात चमू, टोळी, पथक वगैरेसुद्धा.
त्रिनिशा हे त्रिसंध्यासारखे काहीतरी असावे.

हीरा, 'तव नयनांचे दल हलले गं' अशी बोरकरांची कविता आहे, पण इथे दल=डोळे नाहीत. सुनिताबाई देशपांड्यांच्या मते हे दल (या कवितेत) म्हणजे पाकळी, पान ह्या अर्थाने नसून पापण्यांचे शस्त्रसज्ज दल (सैन्य) या अर्थाने असावे. पुढच्या कडव्यांतले वर्णन या अर्थाशी सुसंगत आहे.

शंतनू, सैन्याचे दल त्या बहुतेक गंमतीत बोलल्या आहेत असं मला वाटलं. आनंदयात्रा कवितेची या कार्यक्रमातच म्हणताय ना?
दल म्हणजे पाकळी का? कमलदल म्हणजे कमळाची पाकळी ना? एकदल आणि द्विदल धान्ये या शब्दात दल म्हणजे एक भाग असा अर्थ असेल ना?

वावे, बरोबर, त्या कार्यक्रमात तर आहेच, पण यूट्यूबवर एकट्या सुनिताबाईंचा पण एक कार्यक्रम आहे, आणि त्यातही त्यांनी तोच अर्थ घेतला आहे. (त्यात हिवटीचा निळा आणि धुवटीचा निळा - याचा अर्थ त्यांनी पुलंपेक्षा जरा वेगळा घेतला आहे हे विशेष. असो, हे अवांतर झाले).

Pages