गौरी देशपांडेंच्या एका कवितेचा स्वैर अनुवाद!
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांच्या एका कवितेचा मी माझ्या आकलनानुसार स्वैर अनुवाद केला आहे. तो इथे मुळ कवितेसह लिहितो आहे. हीचं कविता निवडण्याचे तीन कारणे १) संयुक्तामधे फक्त स्त्रिया आहेत म्हणून त्याच्या आदरार्थ, २) येणार्या जागतिक स्त्रि दिनानिमित्त ३) ही माझी एक आवडती कविता आहे म्हणूनः
The Female Of The Species
Sometimes you want to talk
about love and despair
and the ungratefulness of children.
A man is no use whatever then.
You want then your mother
or sister
or the girl with whom you went through school,
and your first love, and her
first child - a girl
and your second.
You sit with them and talk.
She sews and you sit and sip
and speak of the rate of rice
and the price of tea
and the scarcity of cheese.
You know both that you've spoken
of love and despair and the ungratefulness of children.
Gauri Deshpande
बाईची जात..
कधीतरी बाईला वाटतं
मन थोड हलकं करावं
आयुष्यातील प्रेम, भ्रमनिरास
दुरावलेल्या मुलांची खंत
हे सार कुणापाशी बोलावं.
पुरुषाला उमगतील अशा
नसतातचं तिच्या भावना
तेंव्हा तिला हवी असते
समजून घेणारी आई
नाहीतर सख्खी बहिण
शाळेतील जिवलग मैत्रिण
तिचं पहिल्यांदा प्रेमात पडण,
तर हिचं पहिलं बाळ -
लाडाची लेक जन्माला येण -
तर तिचं दुसरं बाळ..
यांच्या सहवासात बसून
समरस होऊन बोलताना
ती उसवलेलं धडं करते,
निवांत घोट चाखताना
मधेचं थांबवून सांगते
तांदळाचे वाढलेले भाव,
चहासाखरेच्या किमती,
तिला करावी लागणारी
तेलातुपाची काटकसर.
असं बोलता बोलताचं
वाट्याला आलेलं प्रेम,
झालेले कैक भ्रमनिरास,
दुरावलेल्या मुलांची खंत
हे सारं मनमोकळे बोलून
नकळत त्या दोघींच मन
कसं हलकं होऊन जात...
-बी
छान आहे अनुवाद. मला आवडला.
छान आहे अनुवाद. मला आवडला.
शीर्षकावरुन मला वाटले गौरी देशपांडेंच्या मराठीत लिहिलेल्या कवितेचा परत मराठीत अनुवाद कसा काय केला बुवा. त्या इंग्रजीतही लिहित होत्या हे माहित नव्हते.
शीर्षकावरुन मला वाटले गौरी
शीर्षकावरुन मला वाटले गौरी देशपांडेंच्या मराठीत लिहिलेल्या कवितेचा परत मराठीत अनुवाद कसा काय केला बुवा. त्या इंग्रजीतही लिहित होत्या हे माहित नव्हते.>>
मला पण हेच वाटले
अनुवाद छान आहे.
छान अनुवाद!
छान अनुवाद!
मला वाटते ही कविता बीटवीन दी
मला वाटते ही कविता बीटवीन दी बर्थ ह्या काव्यसंग्रहातली आहे. आणखी एक संग्रह आहे त्यांचा नाव स्मरत नाहीये.
अनुवाद आवडला.
अनुवाद आवडला.
छान झालय अनुवाद, बी.
छान झालय अनुवाद, बी.
छान.
छान.
छान अनुवाद. आवडली
छान अनुवाद. आवडली
छान
छान
धन्यवाद सर्वांचे! कविताचं
धन्यवाद सर्वांचे! कविताचं इतकी सुंदर आहे की अनुवाद करायला मजा आली अगदी.
वा! छान! 'तेलातूपाची काटकसर'
वा! छान! 'तेलातूपाची काटकसर' पर्फेक्ट!
अतिशय चपखल!
छान अनुवाद, आवडला.
छान अनुवाद, आवडला.
आवडला अनुवाद!
आवडला अनुवाद!
अनुवाद आवडला बी. शेवटचं कडवं
अनुवाद आवडला बी. शेवटचं कडवं चपखल अगदी.
छान !!
बी माझी पण अगदी आवड्ती कविता.
बी माझी पण अगदी आवड्ती कविता. छानच केले आहे भाषांतर.
बी, गौरी देशपांड्यांची ही
बी,
गौरी देशपांड्यांची ही कविता प्रताधिकारमुक्त आहे का?
तोच प्रश्न. गौरी
तोच प्रश्न.
गौरी देशपांड्यांची मूळ कविता इथे उतरवण्याची परवानगी घेण्यात आली होती काय ?
(No subject)
चिन्मय, संकल्प - मला माहिती
चिन्मय, संकल्प - मला माहिती नाही ही गौरीची ही कविता प्रताधिकारमुक्त आहे की नाही. चिन्मय, तुझी साहित्य जगतात इतकी ओळख आहे तू काढ ना माहिती वेळ असेल तर. माझी कुणाशीच या पातळीवर ओळख नाही. ही कविता इथे तिथे खूप ठिकाणी वाचली आहे. जुन्या मायबोलिवार अनेक कवींच्या कविता मायबोलिकरानी लिहिल्या आहेत. ते पाहून प्रताधिकारचं भय, त्याचं महत्त्व कितपत आपण बाळगायचं माहिती नाही. शिवाय आता इथे मायबोलिवर जे भाषांतरीत साहित्य येत आहे त्यात त्यांनी कुठेच असे नमुद केलेले नाही की त्यांनी अनुवाद केलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे की नाही? त्यांनी प्रकाशकाची अनुमती घेतली होती की नाही. तुमचा या मागचा उद्देश कळतो आहे.
छान अनुवाद!
छान अनुवाद!
बी.. मस्तच अर्थपूर्ण अनुवाद !
बी.. मस्तच अर्थपूर्ण अनुवाद !
बी, "केल्याने भाषांतर"च्या
बी,
"केल्याने भाषांतर"च्या घोषणेत लिहिलेले आहे "ज्या साहित्याचे भाषांतर केले जाणार आहे ते प्रताधिकारमुक्त असावे. इंग्रजी भाषेतील असे काही साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची अथवा प्रकाशकांची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल" तसेच असे साहित्य कुठे मिळेल याचे दुवेही दिले होते.
जुन्या मायबोलीवर कविता आहेत हे मान्य पण त्या विषयाची अधीक माहिती तेव्हा नसल्याने त्या लिहिल्या गेल्या होत्या. आता यासंबंधी जर माहिती झाली आहे तर प्रताधिकार कायद्याचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. लवकरच यासंबंधी सविस्तर माहितीही देण्यात येईल.
छान स्वैर अनुवाद !
छान स्वैर अनुवाद !
मस्तच झालाय अनुवाद. अन कविता
मस्तच झालाय अनुवाद. अन कविता आणि अनुवाद - दोन्ही भावले.
बी ने शीर्षकात 'केल्याने
बी ने शीर्षकात 'केल्याने भाषांतर' लिहिले आहे पण हे मराठी भाषा दिवसाच्या 'केल्याने भाषांतर' कार्यक्रमातले भाषांतर नाही. बी ने हे त्याच्या रंगीबेरंगी पानावर लिहिलेले आहे.
-संयोजक
बी, अनुवाद चांगला आहे. कालच
बी, अनुवाद चांगला आहे.
कालच जेव्हा केल्याने भाषांतर असं अनुवादाचं शिर्षक वाचलं तेव्हा बीला 'शिर्षक बदल' असं सांगावं असं मनात आलेलं, कारण मभादिच्या उपक्रमातली कविता वाटू शकते पण नंतर लिहू म्हणत ते राहून गेलं.
बी, कृपया योग्य शिर्षक दे.
धन्यवाद सर्वांचे. प्रशासक
धन्यवाद सर्वांचे. प्रशासक धन्यवाद.
सायो, केल्याने भाषांतरासाठी हा अनुवाद केला होता म्हणून मी ते नाव ठेवले. पार्ल्याच्या बीबीवर, शिवाय संयोजकांना विपूमधे आणि ईमेल करुनही कळवले होते की मी केल्यानी भाषांतरसाठी अनुवाद करीत आहे.
संयोजक, फार खेद वाटतो मला हे लिहायला की तुम्ही माझ्या विपूला आणि ईमेल उत्तर दिले नाही. कुठेतरी तुमचीही वाईट जाहिरात होतेचं की यांनी उत्तर दिले नाही.
मस्त!
मस्त!
धन्यवाद आगाऊ.
धन्यवाद आगाऊ.
Pages