पाटिया - पारसी पद्धतीची ग्रेव्ही असलेली भाजी - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 13 February, 2011 - 14:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतीय भाजी. त्या बरोबर असलेला भात पण खुप छान दिसतो आहे (जिरा राईस आहे का?)
पोळी पेक्षा भात जास्ती प्रिय आहे त्यामुळे ही भाजी भाता बरोबर खायला नक्की करुन बघेन.

दिनेशदा, भाजी एकदम झक्कास....

नक्कीच करणार Happy फोटो तर एकदमच तोंपासु Happy

भात/पुलाव्/राईस कुठला आहे? लगे हाथो त्याची पण पाकृ टाका Happy

काजु किंवा/आणि पनीर पण मस्त लागेल की Happy

छान

आभार दोस्तानो. नवीन काहि केलं तर इथे नेवैद्य दाखवल्याशिवाय मला घास जात नाही.
लाजो, तो भात काहि खास नाही. तूपाची फोडणी करुन त्यात मिरि, जिरे, हळद आणि हिंग घालायचा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे. ते उकळले कि धुवून निथळलेले तांदूळ टाकायचे. मग मीठ टाकायचे. १० मिनिटात भात तयार.

या पाककृतीचा स्रोतही लिहा ना... मूळ पाककृती मिळाली की त्यात वैयक्तिक चवीप्रमाणे फेरबदल करता येतील. Happy

मंजूडी, नेटवरचे व्हर्जन विचित्र आहे. ही एका पारसी कलिगला विचारून घेतलेली होती. तीसुद्धा मी चाखलेली नव्हती कारण त्यात मासे होते. ती विचारली होती, त्यालापण बरीच वर्षे झाली (पारसी कलिग्ज असण्याचा काळ किती जूना !! ) आठवून आठवून मीच जून्या मायबोलीवर लिहिली होती आणि परत विसरलो. ती लालूनी शोधून दिली. मग परत ट्राय केली.

दिनेशदा,
वाह ! एकदा करुन बघायलाच पाहिजे !
नवीन काहि केलं तर इथे नेवैद्य दाखवल्याशिवाय मला घास जात नाही.
पण नेवैद्य "दाखवल्याशिवाय" ऐवजी "खायला घातल्याशिवाय" असं असतं तर आणखी मजा आली असती !
Happy

आजच ट्राय केली.. एकदम तोंपासु झाल्ती बर्का!!! Happy

bhaji.jpg

इकडले टोमॅटो लालबुंद नसल्याने भाजी जरा अ‍ॅनिमिक दिसत होती म्हणून थोडासा रंग घातला.. बाकी काहीच बदल केला नाहीये ओरिजिनल दिनेश दांच्या रेसिपीत..तशीच्यातशी केली.

वेगळीच रेसिपी. नक्की करुन बघणार.
मूळ पाककॄती मासे वापरुन करतात असं तुम्ही लिहिलं आहे. मग बहुतेक मी कोलंबी घालूनच करेन. काजूऐवजी कोलंबी घालायची का ? म्हणजे मासे घातले तरी मटारही घालायचे ना ?

अगो, नाही कोलंबी नुसतीच घालायची. आधी कांदा टोमॅटो नीट शिजवून घ्यायचा, आणि मग कोलंबी टाकून एक उकळी आणायची. मटार आणि काजू नको.

Pages