चैत्रवैभव

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2011 - 00:47

चैत्र - वैभव

ही उजाड दिसती राने भूमीही चिराळलेली
चैत्राची येता साद झाडे ही पालवलेली

निष्पर्ण रानातून ही गुलमोहर फुलारलेला
सोनसळ लेऊन अंगी बहावा रसरसलेला

स्वागत या ऋतुराजाचे होतसे पक्षीगणात
कोकिळ तो उच्चरवाने साद घाली पंचमात

तिन्हीसांजा टाकी मोहून मोगरा शुभ्र कळ्यांचा
कृष्णवस्त्री शोभे कशिदा गंधितसा काय हिर्‍यांचा

चैत्रवेल राती दिसते आकाशी बहारलेली
चांदण्यातून ओघळलेली शीतलता दयाघनाची

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"तिन्हीसांजा टाकी मोहून मोगरा शुभ्र कळयांचा
अवचित वर्षला जणू की पाऊस नक्षत्र फुलांचा"

... छान

----------------------------------------------------------------------
लय, मात्रा इ. कडे लक्ष पुरवणे अत्यावश्यक.

छान आहे

तिन्हीसांजा टाकी मोहून मोगरा शुभ्र कळ्यांचा
कृष्णवस्त्री शोभे कशिदा गंघितसा काय हिर्‍यांचा

सुरेख चित्रदर्शी वर्णन!

शशांक पुरंदरे,

क्रान्ती यांच्याशी सहमत! चित्रदर्शीच आहे. पण मला एक विचारायचे आहे. हीकविता लिहिण्याचा आपला हेतू काय होता? हा प्रश्न प्रामाणिक व शुद्ध हेतूचा आहे याची खात्री बाळगावीत.

धन्यवाद!

छान आहे.
(गेल्या पंधरा दिवसात इथे छान चमचमतं ऊन पडत आहे,आणी आजू बाजूच्या चेरिच्या झाडाना इतका सुन्दर गुलाबी अन फिका जांभळा फुलांचा बहर आला आहे.सकाळी बाहेर पडलं की सोनेरी उन्हात तो बहर स्वर्गीय दिसतो.)

सर्व दिग्गजांचे मनापासून आभार.
बेफिकीर - निसर्गवर्णन एवढाच हेतू -वसंतपंचमी निमित्त - आता यापुढेच वसंताची खरी जादू सुरु होणार ! मोकळेपणाने विचारल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.