आस

Submitted by चाऊ on 4 February, 2011 - 09:13

मन आलेलं भरुन
अन रितेची हात
जसं उभं एक रोप
जणू उन्हा-पावसात

किती गेले दिस वर्ष
पाय उगाच चालत
नाही दिशा नाही वाट
काही आस नाही आत

आता अडखळे श्वास
आणी गिळवेना घास
सावळसंध्या डोळ्यामधी
दिसे अथांग ती रात

काय केले कुणासाठी
काय गेले की राहुन
सारं आयुष्य जगलो
पाणी जावं जणू वाहून

कधी वाटलं थांबावं
फुला-मुलांत रमावं
सख्या-सोयर्‍यांच्या संग
आपणही हसावं

पण संसाराचा भार
सदा उद्याचा विचार
सय पायांना चालीची
पुढे जाण्याचा आधार

रहाटाच्या बैलाजसे
गोल फीरत रहालो
जागी फिरवे चकवा
वाटे फार दुर आलो

विसावलो तेव्हा वाटे
हा उगाच प्रवास
आता येरे, ये माधवा
तुझ्या भेटीचीच आस

गुलमोहर: 

चाऊ: तुसी ग्रेट हो.फार छान.
रहाटाच्या बैलाजसे
गोल फीरत रहालो
जागी फिरवे चकवा
वाटे फार दुर आलो
विसावलो तेव्हा वाटे
हा उगाच प्रवास
आता येरे, ये माधवा
तुझ्या भेटीचीच आस

अप्रतिम लिहिलस.

या कवितेच्या आषयाशी मिळती जुळती जाईल अशी मी 'त्यांचं काय होईल' नावाची कविता लिहिली होती.आणी मुक्तछंदातली माझी कविता पाल्हाळ वाटू लागली माझी मलाच.

लयीत लिहिणं खरेच अवघड आहे,तेही नेमक्या शब्दात्.कसे जमते ते?

खूप छान्,माझ्या निवडक दहा मध्ये या कवितेची एंट्री पहिली.

रहाटाच्या बैलाजसे
गोल फीरत रहालो
जागी फिरवे चकवा
वाटे फार दुर आलो

विसावलो तेव्हा वाटे
हा उगाच प्रवास

छान. लय पण छान जमलीय.