केरळ प्रवास

Submitted by शर्मिला फडके on 4 February, 2011 - 07:14

केरळमधे स्वतंत्रपणे प्रवास करायचा आहे. दहा ते बारा दिवस.
हा प्रवास कसा प्लॅन करावा याबद्दल काही मार्गदर्शन कोणी करु शकेल का?
काय काय अगदी पाहिलच पाहिजे? कुठून कसं जाणं सोयिस्कर पडेल? खाणंपिणं, खरेदीबद्दल काही टीप्स? केरळमधल्या इकोटुरिझमचा काय अनुभव?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोची किंवा त्रिवेंद्रम पासून सुरु करता येईल ट्रीप..

नक्की बघण्यासारखे त्रिवेंद्रम, कन्याकुमारी(तामिळनाडूत आहे पण त्रिवेंद्रमहून अगदीच जवळ आहे), आलेप्पी बॅकवॉटर, मुन्नार, वरथला किंवा वरकला (इथे बहुतेक इको टुरिझमचे रिसॉर्ट आहे.. आणि चांगले आहे)

रस्ते चांगले आहेत त्यामुळे सगळा प्रवास गाडीने करता येईल..

खरेदीसाठी.. त्रिवेंद्रम मध्ये करलकडा म्हणून दुकान आहे.. केरळमधले ऑथेंटीक सगळे वस्त्र प्रकार मिळतात. बाहेर पेक्षा थोडे महाग आहेत पण वर्थ आहेत..

सगळ्यात महत्त्वाचे.. तुम्ही जाणार आहात त्याच्या आसपास चुकूनही कुठला संप वगैरे नाही आहे हे बघून घ्या.. कारण त्यादिवशी रस्त्यावर अक्षरशः चिटपाखरुही नजरेस पडत नाही. तो दिवस फक्त हॉटेलमध्ये बसून काढावा लागतो..

ट्रीपसाठी शुभेच्छा.. ट्रीपचं वर्णन आलं की झब्बू देतोच.. Happy

शर्मिला, नेमके कशात स्वारस्य आहे ते सांगीतल्यास जास्त मदत करता येईल (खरेदी, निसर्ग, खाणे). मी कालच ४ आठवडे केरळात घालवुन आलो (त्रीवेंद्रम, कोट्टयम, कोचीन, कॅलिकट, वायनाड, मुन्नार, थेकड्डी).

संपांचे आधी सांगता येत नाही Sad
मी असतांना एकही झाला नाही.

ताशी ३० ते मॅक्स ४० किमि या गतीने रस्त्यांवरुन गाड्या जातात.

जमल्यास नारळाचे काहिही न खाता राहुन दाखवा. मी प्रयत्न करायचा प्रयत्न केला. वायनाड ला नारळाच्या तेलात केलेला उपमा उकडलेल्या केळ्याबरोबर कालवुन खाल्ला (तीच पद्धत आहे).

हिमांशू थॅन्क्स! तुझं केरळ वर्णन आधीच टाक की मग. कसा गेलास, काय पाहिलस वगैरे.

आश्चिग- स्वारस्य केरळ पहाण्यात. निसर्ग आणि माणसं. खाद्ययात्रा-खरेदी त्यासोबत होईल तशी.

मला अगदी बेसिकपासून माहिती हवीय. मुंबईहून ट्रेनने जाणार आणि येताना प्लेनने येणार इतकंच ठरलय. ट्रेनने जाताना कोणत्या रेल्वेस्टेशनपासून प्रवासाला सुरुवात करणं सोयिस्कर? कोची का त्रिवेंद्रम? त्यानंतर बाय रोड प्रवास करताना कोणती वहानं उपलब्ध असतात? रहाण्याच्या सोयी काय? बुकिंग आधीच ऑनलाइन करणार शक्यतो. कोणती गावं-शहरं पहाणं मस्ट? त्रीवेंद्रम, कोट्टयम, कोचीन, कॅलिकट, वायनाड, मुन्नार, थेकड्डी, आलेप्पी बॅकवॉटर,वरथला किंवा वरकला आणि यासोबत मला किलिमानूरलाही जायचय. ते जमवता येईल का? कसं?

केरळबद्दल नाहीये तरी उपयोगी पडेल अशी माहिती >>

केसरीसारख्या कंपन्या तूमची स्वतंत्र सहलही आखून देतात असे ऐकलंय.

माझा एक (बराच फिरणारा) भाऊ भारतातल्या गोष्टी पहाण्यासाठीही लोनली प्लॅनेटचे पुस्तक वापरतो. http://shop.lonelyplanet.com/india तिथेही माहिती मिळु शकेल.

http://www.indiamike.com/ या साईट वर माहिती मिळेल. तीथे प्रश्न पोस्ट केलेत तर किंवा सर्च केलेत तर हवी ती माहिती मिळेल

हल्ली बर्‍याच कंपन्या कस्टमाईज पॅकेज करून देतात... तसेच केरळ टुरिझम कडूनही तशी व्यवस्था केली जाते.

बॅकवॉटरचा स्टे महाग असतो... त्यापेक्षा २-३ तासाचे वॅकबॉटर परवडणारे असते.

बॅकवाटर स्टे कराच, worth it!
तिथे फिरायला एखादी क्वालिस किंवा तसलीच भरभक्कम गाडी बुक करा. बर्‍याच ठिकाणी कच्चे नाहीतर चढ असणारे रस्तेही असतात.
प्लॅन पूर्ण फायनल करूनच जा. जास्त ठिकाणं पहायची तर खिसा आणि वेळ दोन्ही भरधाव सोडले पाहीजेत. निसर्ग डोळ्याचे आणि मनाचे पारणे फिटेल असाच आहे तिथे. मुन्नार, टेक्कडी, पेरियार फॉरेस्ट बघण्यालायक.

शर्मिला, छान आहे हा बाफ. मुन्नारच्या कॉफी मळ्याबद्दल फार ऐकल आहे मी. केरळी स्त्रियांचे पिवळसार पांढरे एकदम सुती सलवार आणि साड्या मिळतात. सणाच्या दिवशी तोच त्यांचा पोषाख असतो. ते तुला विकत घेता येईल तिथे.

बॅक वॉटर म्हणजे नक्की काय?

बॅकवॉटर - हाउस बोट अनुभव न्हणुन ठिक आहे मात्र मच्छरांचा त्रास होतो, त्यापेक्षा तीथे बर्‍याच चांगल्या प्रॉपेर्टीज आहेत , ताज पासुन जवळच कोकोबे रीसॉर्ट आहे मात्र तुलनेने परवडण्या सारखे आहे
http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g678552-d640500-Reviews-Cocobay_R...,
बॅकवॉटर फिरुन अशा ठिक्कणी राहणे जास्त सोईस्कर.

त्रीवेंद्रम ला राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी आणि झु येकमेका लगत आहेत, बरेच जण झु मधे जास्त रेंगाळतात आणि ही गॅलरी घाईत उरकतात. शक्य असेल तर आधी हि गॅलरी बघुन घ्या, रवी वर्मांबरोबर राजा राजा वर्मा आणि त्यावेळच्या काही ब्रिटीश आर्टीस्ट ची काही सुंदर चित्र आहेत.

मुन्नार ला टी फॅक्टरी मधे टी प्लँट्शन च्या हिस्टरी वर येक चांगली डॉक्युमेंटरी बघायला मिळते, चुकव नका.
सगळे कार ड्राय्व्हर्स शिकलेले आणि बर्‍यापैकी इंग्रजी बोलणारे असतात त्यांच्याकडुन जास्त माहिती मिळते.

ओके थॅन्क्स सगळ्यांना. रवीवर्मा आर्ट गॅलरी बघायचीच आहे. किलीमानूरला सुद्धा त्यासाठीच जायचय. तिथे रवीवर्माचं खाजगी संग्रहालय आणि घर आहे.
नात्या- लोनली प्लॅनेटचा खरंच होतो उपयोग भारतात फिरतानाही. घुमक्कर साईटही छान आहे याबाबतीत.
मी वरच्या सूचना आणि इतर गोष्टी जमेस धरुन टूर प्लॅन केली की त्याचे तपशिल टाकीन.
मला वाटतं जे कोणी मोठ्या टूर्सना (देशात किंवा परदेशात) स्वतंत्र जातात त्या सर्वांनी आपापल्या अनुभवांना आणि प्लॅन्सना शेअर केलं तर खूप उपयोग होऊ शकेल इतरांना. जुन्या मायबोलीवर असा एक धागा होता बहुतेक. शोधून पहाते.

मला वाटतं जे कोणी मोठ्या टूर्सना (देशात किंवा परदेशात) स्वतंत्र जातात त्या सर्वांनी आपापल्या अनुभवांना आणि प्लॅन्सना शेअर केलं तर खूप उपयोग होऊ शकेल इतरांना.>>> +१. अ‍ॅडमिनना विचारुन धागा काढायचा का असा.