Submitted by sachinkakade on 2 February, 2011 - 04:11
तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले
अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे
दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या
मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा
तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?
कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला ?
–एस. के.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अनाम तु,अनाम मी, अनाम हाक
अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे>>>>
अप्रतिम!
काय अप्रतिम लिहिले आहे ! यावर
काय अप्रतिम लिहिले आहे !
यावर एकच प्रतिक्रिया ?
रसिक मनाचा अंदाजच कधी येत नाही ..........
सचिनदा ......सलाम तुमच्या या रचनेला....
मस्त रे..
मस्त रे..
एकदम मस्त ..!!
एकदम मस्त ..!!