गंध

Submitted by दिनेश. on 30 January, 2011 - 23:48

यावेळेस भारतातून येताना, गंध चित्रपटाची सिडी घेऊन आलो. गंध या कल्पनेशी निगडीत ३ वेगवेगळ्या कथा आहेत. एकंदर मला आवडला.

पहिला भाग आहेत तो, वयात आलेली मुलगी. यात ज्योति सुभाष, चंद्रकांत काळे, अमृता
सुभाष आणि गिरिश कुलकर्णी आहेत. कथेची गरज म्हणून थोडी ओव्हर अ‍ॅक्टिंग हवीच
होती आणि ती अमृताने भागवली. यातला काळ बहुतेक १९९३ नंतरचा असावा, कारण
दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, मधले गाणे वापरलेय. पण त्या काळात, टाईपरायटर
वापरात होते का याबद्दल मला खात्री नाही. ज्योति सुभाष आणि चंद्रकांत काळे, सहज
वावरलेत.

दुसर्‍या भागात (औषध घेणारा माणूस ) मिलिंद सोमण, सोनाली कुलकर्णी आणि लिना
भागवत आहे. काहि मिनिटापुरती असणारी, लिना भागवत अगदी सहज वावरते. सोनाली
नेहमीप्रमाणेच सहज. कौतूक आहे ते मिलिंद सोमणचे. सहसा मॉडेल्स, चांगला अभिनय करु
शकत नाहीत, असा अनुभव आहे. पण त्याने अवघड भुमिका चांगली निभावलीय. मराठी
अगदी सहज बोललाय. खरे तर त्याने आधीच चित्रपटात यायला हवे होते, म्हणजे आपल्याला
तेच ते, रेकीव आवाज ऐकावे लागले नसते.
याबाबत पण काही ढोबळ चुका झाल्यात. ज्या ग्लासात लिना औषधाच्या गोळ्या भरते,
त्यावरचे तासांचे आकडे, प्रे़क्षकांच्या बाजूला आहेत. तसेच ती ज्या पिशवीतून गोळ्या
काढून भरते, ती हाताळणी एच आय व्ही पॉझिटीव्ह असणार्‍या माणसाच्या औषधासाठी
योग्य वाटत नाही.
ती घरातील मोलकरीण म्हणजे लादी पुसत असणारच. तिला मेलेला उंदीर दिसत नाही
वा त्याचा वास येत नाही हे पटत नाही. एच आय व्ही पॉझिटीव्ह असणार्‍या माणसाला
कसलाच वास येत नाही का ? (माझ्या एका शिक्षिकेला, अपघात होऊन, डोक्याला मार
बसल्याने, असे झाले होते.)

तिसरा भाग आहे, बाजूला बसलेली बाई. यात नीना कुलकर्णी, प्रेमा साखरदांडे, यतीन
कार्येकर आहेत. नीनाचा सहजसुंदर अभिनय आहे यात. प्रेमा साखरदांडे, थेट कोकणातल्या
आज्जी दिसतात. (पण कथेत हव्या तितक्या खडूस वाटत नाहीत.) सूईणबाई पण अस्सल.
यात काहि चुका, म्हणजे बाजूला बसलेल्या बाईच्या, अंथरुणावर मूलांना बसायची परवानगी
नसे. तसेच दिवसभर ते अंथरुण पसरुन ठेवलेले नसे. ज्या काळात कंदील वापरात होते
(तसे ते अजून आहेत) त्या काळात, साड्यांमधे हिरव्या रंगाची पॅरट ग्रीन हि छटा अजिबात
नसे, असे मला वाटते. लाइट गेल्यावर देव्हार्‍यात भगभगीत पांढरा उजेड दिसतो. कोकणात
भर तेलात पापड तळायची प्रथा नव्हती, ते तव्यात तळले जात. एवढे तेल वापरण्याइतकी
सुबत्ता, त्या घरात दिसत नाही. पितळेच्या ताटवाट्या, कंदील, साड्यांचे रंग, खेळण्यातला
बॉल एका काळातले वाटत नाहीत.

पण हे सगळे मला उगीचच जाणवलेले. एकंदर चित्रपट आणि त्यातल्या तांत्रिक बाजू
उत्तम आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंध पाहिला अखेर.
पुष्कळ म्हणजे पुष्कळ त्रुटी जाणवतात आख्ख्या सिनेमात पण तरीही पहावासा वाटतो शेवटपर्यंत यातच काय ते आले. ठरवून अतिस्टायलाईझ केले की कसे अनैसर्गिक वाटते ते या चित्रपटात कळले. पण वुडीअ‍ॅलन किंवा कुरोसावा तसेच करतात, मग फरक का जाणवतो पाहताना? असो.

नीना कुलकर्णी जरा त्या पात्रापेक्षा म्हातार्‍या वाटतात बॉ.. तरीही त्यांचे काम सुरेखच. आणि तो छोटा मुलगा राघव, त्याचे काम भारी आहे..
कविता काय सुरेख आहेत त्यातल्या.
'खूप या वाड्यास दारे, एक याया, कैक जाया
दो घडी येतात तेही, लावून जातात माया
पाखरांची मुक्त मांदी, गात ये आल्हाद नांदी
अंगणी तालात डोले, एक न्हाती शुभ्र फांदी
आणखी रात्री पहाटे चांदणे शेजेस येते
आणि फुले वेढुन माती स्वप्नीच्या राज्यात नेते
मी खरा तेथील वासी, हा न वाडा ही सराई
पाहुणा येथे जरी मी, जायची माते न घाई'

अमृतासुभाष चक्कं झेपली या चित्रपटात. त्यातल्या स्टॅकॅटो मुव्हमेंट्स आणि फिल्मी ट्रीटमेंट मस्त वाटते पहायला.
सोनालीकुलकर्णी केवढी जाड दिसते यात. मिलिंद सोमणचे काम पहिल्यांदा आवडले.

साजिर्‍या- मिलिंद नाही मंगेश !!

मी पण पाहिला अखेर.. आवडलाच.
दिनेशदांनी लिहिल्याप्रमाणे काही तृटी जाणवल्या पण तरी एक नविन (जमलेला) प्रयोग म्हणून आवडला.

अमृता सुभाषची कथा ९६ सालाच्या पुढची असावी (सं. दिदुलेजा) त्या काळात टाइपरायटर अन नऊवारी-धोतर वाले आई-बाबा जरा विचित्र वाटले.

औषधं घेणारा माणुस मला नीट कळलीच नव्हती. इथे वाचून जरा हिंट मिळाली. मिसो अन सोकुल फार भारी.लीना भागवत तर मला आवडतेच. असे चकाचक पिक्चर का येत नाही मराठीत? Sad नेहमीच काय ते ग्रामीण नायतर टिपिकल पुणेरी.. असो.

तिसरी कथा सगळ्यात जास्त आवडली. पण तिथेही नीना कुलकर्णी पात्राच्या वयापेक्षा फारच मोठ्या वाटल्या. त्यांचं काम सुंदरच झालंय पण ते वयाचं मिसमॅच खटकलंच. कोकण अन पाऊस याचं बॅकग्राउंड सही जमलंय.

नीना कुलकर्णी पात्राच्या वयापेक्षा फारच मोठ्या वाटल्या. >> +१

औषधं घेणारा माणुस मला नीट कळलीच नव्हती. इथे वाचून जरा हिंट मिळाली. >> +१
तसेच मलाही घरातल्या मोलकरणीला तरी मेलेल्या उंदराचा वास कळेल की, असे वाटूनच गेले होते.

अमृता सुभाष मलाही अभिनेत्री म्हणून कधीच आवडली नाही. पण लिहिते फार जबरदस्त! गेल्या वर्षापासून चतुरंग मध्ये एक कॉलम नियमित येतोय तिचा. ह्या वर्षी बाकी सगळे कॉलम्न्स बदललेत. तिचा कंटिन्यु राहिलाय. खूप सुंदर लिहिते. लेखिका म्हणून माझी तिला पसंती.

" गंध " चा पहिला भाग अमृता सुभाष वाला.. त्या एका भागावर तर आक्खा " अय्या " पिक्चर काढला आहे... तो नाही का कुणी पाहिला...
बकवास हा एकच शब्द असु शकतो ह्या पिक्चर साठी.

अच्छा त्या प्रेमा साखरदांडे नाही का! मला रेखा कामत वाटल्या.
पहिल्या कथेबद्दल मला एक कळत नाही, की अमृता सुभाषला त्या गिरीश कुलकर्णीचा सूक्ष्म गंध जाणवतो, हे दाखवलंय, तर तिला असे सूक्ष्म गंध जाणवतात हे आधी कुठेतरी दाखवायला नको का? की ही माझी अपेक्षा फारच ढोबळ आहे? मला तरी तिला असा हा सूक्ष्म गंध जाणवणं अविश्वसनीय वाटलं. पुढे ती त्याचा पाठलाग करते ते तर बोअर झालं. तिचा अभिनय लाऊड आहे हे तर झालंच.

दुसऱ्या भागात ( मला मि. सो. आवडतो, तरीही) पेशन्सच नाही राहिला शेवटपर्यंत पाहण्याचा.

तिसरा भाग चांगला आहे. नीना कुलकर्णी ग्रेट. " होच का? " च्या आधीचा मुद्राभिनय बेस्ट.

वावे,
अय्या बघ ☺️☺️☺️
त्यात रामुला बरेच गंध येतात.
मला अमृता सुभाष च्या पात्राचं तो झोपला असताना वास घेणं वगैरे भयंकर अती वाटलं.

गंध नाहीये बघितलेला, अय्या बघितला. भयाण अ आणि अ आहे.
ते सूक्ष्म गन्ध वगैरे जाणवण मलातरी PERFUME - A STORY OF MURDERER वरून उचललेलं वाटत.

अय्या बघितला. भयाण अ आणि अ आहे. >>>>>>>> ++++++++१११११११११

अय्या मध्येही रामु त्या हिरोचा पाठलाग करत असते, नन्तर तिला कळत की तो अगरबत्तीच्या फॅक्टरीत काम करतो म्हणून त्याच्या अन्गाला असा सुगन्ध येतो. अस काहीतरी दाखवल होत.

अय्याचा ट्रेलर बघूनच मी घाबरले Lol
ज्यांनी कुणी थिएटरमध्ये जाऊन पाहिला असेल त्यांचे काय हाल झाले असतील!!

अय्या मी पाहिलाय.मला शाल श्रीफळ द्या.
आता आठवत नाही पण बहुतेक तो मुलगा कापड रंगवणे की काय तरी धंद्यात असतो.

अय्या मी पण पाहिला आहे Happy
अय्या मध्येही रामु त्या हिरोचा पाठलाग करत असते, नन्तर तिला कळत की तो अगरबत्तीच्या फॅक्टरीत काम करतो म्हणून त्याच्या अन्गाला असा सुगन्ध येतो. अस काहीतरी दाखवल होत.>>+१

आता आठवत नाही पण बहुतेक तो मुलगा कापड रंगवणे की काय तरी धंद्यात असतो.>>> नाही. तो चित्रकार असतो म्हणून रंग दाखविले आहेत. पैसे कमवण्यासाठी तो रात्री अगरबत्ती बनवण्याचे काम करत असतो. म्हणून तो आला कि हिला तो सुगंध जाणवत असतो.

अनु, होता है, होता है! Happy
मीपण राजवाडे अॅंड सन्स पाहिलाय थिएटरमध्ये. मोठी नावं वाचून आपण जातो आणि अपेक्षाभंग होतो.

बहुतेक तो उदबत्त्या बनवतो हे कळायच्या स्टेज पर्यंत पिक्चर पोहचण्या आधी मी बेशुद्ध(निद्रिस्त) झाले असेन ☺️☺️☺️
गंध मध्ये तो इतर भाषेतले पिक्चर का बघत असतो म्हणे?
आणि सोकु अचानक आंघोळीला का जाते?

तो उदबत्त्या बनवतो हे कळायच्या स्टेज पर्यंत पिक्चर पोहचण्या आधी मी बेशुद्ध(निद्रिस्त) झाले असेन >> Lol
गंध मध्ये तो इतर भाषेतले पिक्चर का बघत असतो म्हणे?>> काय माहीत!

आणि सोकु अचानक आंघोळीला का जाते?>> मी तिथपर्यंत पोचलेच नाही. स्मिता पाटीलच्या गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या सुप्रसिद्ध फोटोवर ती बोट फिरवते तिथेच मला कंटाळा आला. पुढे फार तर ५ मिनिटं पाहिला असेल. शेवटी शेवटी असलेलं रावी के उस पार गाणं मात्र सुंदर आहे.

म्हणजे कल्पना करा:
1. आपला नवरा एडस पॉझिटिव्ह आहे
2. त्याने कारण सांगितलेलं नाही
3. हा कधी झाला माहीत नाही(आपल्याला झाला असेल का त्याच्या मुळे?)
4. त्याच्या घरात डिव्होर्स मागायला 1 वर्षांनी आले
5. घरात सारखा वास येतोय

या सगळ्या टेस्ट केस सिणारीओ मध्ये 'मस्त पैकी आंघोळ करावी बाई' कुठून आलं? एखादी बाई पटापट काम निपटून निघेल त्या वास वाल्या घरातून.

आणि ' वर पाहिजे' जाहिरात देताना नाव कुठे छापतात? गंध आणि अय्या दोन्हींमध्ये नाव पेपरात आलं असे डायलॉग आहेत.

mi_anu , ५ ही पॉईंट्स ला + १
त्या मोलकरणीला कसा काय वास येत नाही ते नाही कळाले.

पहिल्या 1 2 सीन मध्ये तिच्या फेशिअल एक्सप्रेशन्स नि तिला वास आलाय असे सूचित केले आहे,
पण ति तशीही कामे टाळणारी दाखवली आहे. त्यामुळे वास येतोय असे मुद्दामहून सांगून नवीन काम अंगावर का घ्या असा विचार करत असेल

Pages