मोडी लिपी

Submitted by अवल on 27 January, 2011 - 23:34

मोडी लिपीबद्दल आपल्याला माहिती असते पण ती नक्की कशी होती हे आपल्यातल्या नव्या पिढीतील काहींना माहिती नसते. तिची तोंड ओळख करून देण्याचा हा माझ्या अल्पमतीचा प्रयत्न. तज्ज्ञ यात अजून प्रकाश टाकतीलच.
मोडी ही एका अर्थाने मराठीची शॉर्ट हँड लिपी... खरं तर धावती लिपी ( रनिंग लिपी) . प्रामुख्याने कारभारी मंडळी ही वापरत. सरकारी कागदपत्रे राजे लोक/ वरिष्ठ कारभारी सांगत अन हाताखालील कारकून ते मोडी लिपीत भराभर लिहून काढत. शिवकाळापासून पेशवाई पर्यंतची बहुतांशी कागदपत्र मोडी लिपीत आहेत. मी एम. ए. करताना त्यातली अनेक वाहीली, वाचली. त्या वेळेस शिकलेल्या मोडी लिपीवरची थोडी माहिती आपणाशी शेअर करतेय.
ही मोडी लिपीतली बेसिक अक्षरे : पहिल्या ओळीत मोडी अक्षरे, त्याच्या खाली देवनागरी अक्षरे.


यातली शेवटच्या ओळीत मुदाहून ककाकीकुकेकैकोकौकंकः संपूर्ण लिहिली आहे. त्यावरून समजेल की ही किती क्लिष्ट लिपी आहे ते... प्रत्येक अक्षर त्याच्या आकार,इकार, उकार... इ. मध्ये बदलत जाते. त्यामुळे ही लिपी वाचणे अन लिहिणेही अनोळख्याला खुप अवघड जाते... किंबहूना वाचायची नेहमी सवय असेल तरच ती नीट वाचता येते.
तशात त्यातली काही अक्षरे अतिशय गोंधळात टाकणाती आहेत जसे कु आणि मु यात फार कमी फरक आहे. अशी अनेक अक्षरे आहेत.
तसेच ही लिपी एकाला जोडून एक अक्षरे लिहिली जात असल्याने अनेकदा दोन अक्षरे एकात एक मिसळून जातात. अन मग ती वाचणे अवघड होते.
तशात प्रत्येकाच्या अक्षरानुसार, त्याच्या वलणानुसारही ही लिपी बदलत जाते. उदा माझे आरती खोपकर हे नाव असे लिहिले जाईल :
ack.jpg
अजून माहिती हळूहळू लिहीन.

{मोडी लिपीचा इतिहास http://www.maayboli.com/node/22813 इथे आहेच, म्हणून वर नाही लिहिला :)}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल,
सही!!!, मी तयार आहे शिकायला. मला अजुन पुढे शिकायची आहे, पण काम जास्त असल्यामुळे जमत नाही आहे.

मझ्या वाचनात आले की मोडीची चिटणिसी, फडणवीसी, कुलकर्णी ... अशी वेगवेगळी वळणे होती. ती कशी होती याबद्द्ल माहीती मिळेल का?

Pages