मुगाचं बिरडं

Submitted by मृण्मयी on 9 June, 2008 - 19:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कडधान्य (मुग, उडिद किंवा चणे), मोड आणून सोलून
हळद चिमुटभर
तिखट अर्धा चमचा
मीठ
१ पळी तेल
हिंग
१ छोटा कांदा
आलं, लसूण, हिरवी मिरची, ओला नाराळ एकत्र वाटून. (नारळ्: वाटून १डाव होईल इतपत आणि आलं लसूण १ TBsp , हिरव्या मिरच्या तिखट जसं हवं त्या प्रमाणे)
कोथिंबीर्-धूउन चिरलेली
गरम मसाला (घरी असेल तो घालावा. वेगळा करून वाटायला नको)
आंबटपणाला टोमॅटो. (नसल्यास कोकम. पण चिंच किंवा कैरी नको)

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून हिंग घालावा.
चिरलेला कांदा आणि सोललेलं कडधान्य घालावं
कांदा पारदर्शक झाला की हळद तिखट मीठ घालून परतावं.
यावर आलं लसूण मिरची खोबर्‍याची गोळी घालावी.
भरपूर कलसल्यावर आधणाचं पाणी घालावं. (साधारण अडीच वाट्या)

वाढणी/प्रमाण: 
१ माणसापुरती
अधिक टिपा: 

** उकळी आल्यावर टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.
कडधान्य मऊ शिजेपर्यंत बिरडं ताटली ठेवून उकळू द्यावं.

माहितीचा स्रोत: 
आईची पध्दत
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज आयुष्यात पहिल्यांदा केलं मुगाचं बिरडं. पण मी ही आणि शोनूची एकत्र पद्धत वापरली. म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मूग आणि कांदा एकत्र भाजला. वाटण पण याच पद्धतीने (हिरव्या मिरची व्यतिरिक) केले. पण लाल तिखट आणि गरम मसाला वगळून मालवणी मसाला घातला.

मॄ, आईला खूप खूप धन्यवाद!!! खाल्ल्यावर हाताचा वास पण घेत रहावा वाटतेय इतके अप्रतीम झालेय Happy फोटो टाकू?

आज करून पाहिलं बिरडं. मस्तच झालयं.
हा आजचा बेत. बिरडं, पोळ्या, पोह्याची मिरगुंडं आणि लसूण्-सांडगी मिरची तळून आणि सोलकढी.

phpQ0AYTFPM.jpg

आर्च, बेत माझ्याकडे होता ग तो. Happy
रस्सा होताच बिरड्याला पण वाढताना कमी वाढलाय नं म्हणून दिसत नाहीये Happy

करुन पाहते उद्याच. मूग आणि कांदा एकत्र कधी भाजला नाहिये. इंट्रेस्टिंग वाटतय.
धन्यवाद मृ.

मिनोती/सावनी- दोघींचेही फोटु मस्त. Happy

मी काल या पद्धतीचा मसाला वापरून अख्ख्या मुगाची उसळ केली. सोबत भाजलेले पाव नि शेव, कोथिंबीर, कांदा. अप्रतिम लागत होती खरंच. धन्स मृ. फोटो टाकलाय.

party 040.JPG