Ball games...........

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

( Francesca Bardsley ची ही छोटीशी कथा वाचल्यावर आवडली म्हणुन अनुवादाचा पहिलाच प्रयत्न....)

अमिराला कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलायला घरुन अजिबात परवानगी नव्हती.तसे हिवाळ्यातल्या त्या अंधा-या दिवसात ते शहर भितीदायकच होते, निदान ९ वर्षाच्या मुली साठी तरी... जरी एखाद्याला कुठे जाणे सेफ आहे किंवा काहि झाले तर लपायचे कुठे आणि पळायचे कुठे हे माहित असले तरी ....
पण खालीद काही अनोळखी नव्हता. सगळेच तर त्याला ओळखत होते. त्याचे हसणे , ऐट्बाज बोलणे.. तोंडात एका कोप्-यात सिगारेट धरणे. तो तीच्या वडिलांशी विनोद करुन बोलु शकायचा , तीच्या आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करायचा. त्यामुळे अमिराला खालिद बरोबर असतांना अजिबात भिती वाटायची नाही.
एके दिवशी ती मित्र मैत्रिणि सोबत खेळत असतांना , खेळ थांबायच्या वेळी खालीद तीथे आला आणि सगळ्यांना समोरच्या भिंतीवरच्या रिंग मधुन कोण दगड टाकुन दाखवते म्हणुन त्याने challenge च केले.
अमिराचे डोळे आंनदाने चमकले, तीने टाळ्या वाजवल्या खुप खुष झाली. पहिल्याच प्रयत्नात तीचा दगड सरळ रींग मधुन गेला होता आणि बाकी कुणालाच हे जमले नव्हते..
"वा मेरी नन्ही गुडिया... सगळ्या या मोठ्या मुलांपेक्षा तर तु कमाल आहेस " खालिद ने कौतुक करता करता sticky pastries ची खाकी पेपर bag तीच्या हातात बक्षिस म्हणून ठेवली.

त्यनंतर अमिराला खालिद खुपदा तीच्या शाळेच्या ground जवळ भेटु लागला, ती त्याला रिंग मधुन ball टाकुन दाखवायची आणि प्रत्येक वेळी तीने आता जास्त चांगली प्रगती केलिये म्हणून ती आनंदाने म्हणायची "आता छान टाकते ना मी चेंडु".. तोही तीला ती आता खुपच व्यवस्थीत ball टाकु शकते म्हणून कौतुकाने प्रत्येक वेळी काहि ना काही द्यायचाच. कधी आईला द्यायला तांदुळ ,कधी मसाले, कधी तीला खाऊ.. चोकोलेट, गोळ्या कधि काय .. शिवाय तो तीला अजुन व्यवस्थीत आणि अचुक पणे ball रिंग मधुन कसा जाइल या बद्दल थोडे शिकवु पण लागला. 'हात मागे करुन आधी नेम कसा धरायचा ' अशा सारख्या सुचना ही देवु लागला. आता ती ball टाकतांना अजिबात चुकत नसे. मग खालिद तीला अजुन नविन नविन लक्ष देत असे.
आता ती दोघं रोजच सोबत जवळच्या ओळखिच्या आणि सुरक्षीत पटांगणावर practise करु लागले होते आणि खालिद चांगला ओळखीचा असल्याने कुणाला त्यात गैर वाटण्याचे ही कारण नव्हते.. तीलाही त्याची भिती वाटत नव्हती. आणि त्याने तीचे कौतुकही केले होते ना की तीच सगळ्या सगळ्या मुलान्पेक्षा ball टाकण्यात जास्त अचुक आहे .
कधी कधी खालीद जमिनिवर किंवा भिंतीवर खुणा करी मग अमिरा बरोबर त्या खुणेवर ball किंवा दगड जे सापडेल ते मारुन दाखवायची आणि अचुक निशाणा लावयची. एके दिवशी त्यांना एक जळालेला ट्रक दिसला. खालिद म्हणाला चला याचाही उपयोग शिकण्यासाठी करुन घेऊ ,अमिरा घाबरली . पण खालिद म्हणाला "त्यात घाबरण्या सारखे काय आहे? चल निशाणा लाव पाहु, त्या तुटलेल्या खिडकितुन बरोबर आत दगड टाकुन दाखव . " ती ट्रक् जरा लांब असल्याने तीला काही सुरवातीला जमेना पण काही प्रय्त्नांनंतर तीने तेही अत्म्मसात केले. ती आता व्यवस्थीत त्या तुटलेल्या काचेच्या खिडकितुन दगड आत टाकु लागली.

एके दिवशी खालिद तीच्या घरी आला आणि म्हणाला "चल पाहु आज नविन उद्देश देतो तुला नेम धरायला . तीथुन टाकुन दाखव मला ball.. तु इतकी हुषार आहेस की तुला नक्की जमेल..." खालिदला घरी पाहुन अमिराला अश्चर्य वाटले कारण तो नेहमी शाळेच्या पटांगणावरच भेटायचा. . आणि कालच तर त्याने एक नविन खुण करुन प्रक्टीस घेतली होती.
ती त्याच्या मागे चालु लागली. पण जेव्हा रोजचा रस्ता सोडुन खालिद वेगळ्या भागाकडे चालु लागला तेव्हा मात्र ती जरा घाबरली. खालिदच्या ते लक्षात येवुन तो म्हणाला " अग भित्री भागुबाई..... घाबरु नकोस तु खालिद सोबत आहेस.".. ती मग तशीच त्याच्या मागोमाग चालत राहिली.. तीने तीचे हात मागे घट्ट बांधले आणि अल्लाची प्रार्थना करु लागली की अम्मी अब्बांनी सांगितले तसे वाइट लोक नको भेटु देवु अल्ला..
ते थोड्याच वेळात एका गल्ली पाशी आले. ती नेहमी सारखी वाटत नव्हती . काहितरी विचित्र तणाव वाटत होत तीथे. पण तीने मनातुन भिती झटकुन टाकली.. "खालिद ने आणले ना आपल्याला इथे मग व्यवस्थीतच असेल सगळं".
" ते बघ समोर बरोबर तीथे हे फेकुन दाखव बघु,...." म्हणून खालिद ने तीच्या हातात एक छोटी शी, कठिण गोल वस्तु दीली, ते नेहमिच्या दगडापेक्षा आणि ball पेक्षा वेगळे लागले तीच्या हाताला पण.. तीला काय त्याने सांगितले की चॅलेंज पुर्ण करुन दाखव की फेकाय्चे.. तीने फेकण्यासाठी चित्त एकाग्र केले. डोळे बारिक केले आणि समोरच्या खिडकिवर लक्ष केंद्रित केले. खालिद तीच्या मागे काही अंतरावर एका मोठ्या खांबाजवळ उभा होता, तीने जेव्हा ती हातातली गडद रंगाची धातुची वस्तु नेम धरुन फेकण्यासाठी हात मागे केला तेव्हा त्याच्या चेह-यावर मंद स्मित आले.... ती वस्तु तीच्या नेहमिच्या practise च्या ball पेक्षा आणि दगडांपेक्षा नक्किच जड होती .
पण तरी तीचा नेम काहि चुकला नाही अगदी अचुकपणे तीने त्या खिडकीतुन ती वस्तु आत फेकली. आणि काही सेकंदातच तेथुन आलेल्या उष्ण मोठ्या ज्वाळांनी आमिराच्या छोट्याशा शरिराला वेगाने फेकले... ती पाठीवर मागे फेकली गेली. काळ्या कुट्ट धुराने परीसर भरुन गेला. त्यात तीला श्वास घेणे अशक्य होवु लागले.....धुराने डोळे चुर चुरु लागले त्यातुन पाणी गळु लागले .. चेह-यावर जखमा झाल्या त्यातुन रक्त ठिबकु लागले.. तीचे हात पाय बधिर झाले.. तीच्या आस पास च्या त्या इमारतीचा भाग तीच्या भोवती कोसळु लागला... पण तीला कसलाच आवाज ऐकु येत नव्हता नुसते काहितरी कानात जोरात वाजल्यासारखे वाटत होते. हळु हळु तेही बंद झाले आता तीला कोणत्याच वेदनाही जाणवत नव्ह्त्या. काहिहि नाही सगळच लांब जात होते फक्त मरण जवळ येत होते..
खालिद मागच्या मागे सटकला होता. कुणाला न दिसता, कुणाला काही ऐकु यायच्या आत.. तीथे फक्त एक चुरगळलेले तपकिरी रंगाचे सिगारेटचे थोटुक त्याच्या ओठाच्या कोप-यातुन निसटुन पडले होते. जसा जसा तो त्या भयानक रक्त पाताच्या दृष्या पासुन लांब जावु लागला तस तसे त्याच्या गालात हसु खुलत गेले.. त्याने रायफल खांद्यावर लटकवली आणि नविन सिगारेट पेटवली...
(समाप्त)

विषय: 
प्रकार: 

आई गं. खूपच स्फोटक आहे गं कथा.
अनुवादाचा प्रयत्न छान. अजून मन सुन्नच आहे.

बाप रे.... Sad कठीण आहे............

बापरे, केवळ भयंकर.. सुरुवातीपासून वाटतच होते काहीतरी वाईट होईल पण इतके भयानक अस्सेल असे नाही वाटले. Sad

बापरे! काय क्रौर्य! Sad
अनुवाद वाटत नाहीये, इतका चांगला अनुवाद लोपा Happy
पण प्रॅक्टिस ती बॉलने करत होती की दगडाने, की दोन्हीने हे नेमके कळले नाही..

कधी कधी खालीद जमिनीवर किंवा भिंतीवर खुणा करी मग अमिरा बरोबर त्या खुणेवर ball किंवा दगड जे सापडेल ते मारुन दाखवाय्ची .>>>. पूनम काहि ठिकाणि असा उल्लेख केलाय..
thank you very much मंडळी......

लोपा, सुंदर अनुवाद.... खालिदनेही अचूक निशाणा साधला. आमिराची निरागसता पणाला लावली...

अनुवाद वाटत नाहीये, इतका चांगला अनुवाद लोपा >>>> पूनम तुला आणि इतरांंना ती मी खरी लिहिलेली कथा वाटली यातच भरुन पावले..(याच साठी केला होता अट्टाहास :)..) ही कथा Get Britain Reading compitition मध्ये निवडली गेलेली आहे.
मंजु धन्स..

लोपा, मस्त जमलीय कथा!! आणि स्पर्धे मध्ये कथेची निवड झाल्याबद्दल अभिनंदन!!

उफ्फ.... कसला भयाण शेवट आहे... सुन्न व्हायला झालं वाचुन.
तुझे लिखाण नेहमीप्रमाणेच सुरेख. खरच अनुवाद आहे हे जाणवतच नाहीये.
-प्रिन्सेस...

अनुवाद वाटतच नाहीये. खूपच सोपी आणि सऱळ भाषा. एक प्रकारचा सलगपणा आहे. कुठेही तुटकपणा जाणवत नाही.
छान कथा निवडलीस अनुवादासाठी Happy अभिनंदन
_______________________________________
|| व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रुव: || परर्द्धि परमस्पष्टस्तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण: ||

लोपा,

छान जमलाय अनुवाद. कथाही भावली मनाला.

जबरदस्त लघूकथा लोपा

सुन्न करणार्‍या कथेचा सुरेख अनुवाद!

thank you very much abhee ,poonam, महेश, केदार, लक्ष्मीकांत,Mrinmayee...

लोपा अनुवाद मस्तच जमलाय ! मुळात यात आपले भाषाप्रभुत्व कसाला लागते त्यामुळे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही ती. छानच आहे !

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

लोपा, अनुवाद झकास जमला आहे.

उत्तम अनुवाद. भयानक शेवट

दीपक
Ability is what will get u to the top...if the boss has no daughter.... Happy