आपण आग्रही ग्राहक

Submitted by मामी on 20 January, 2011 - 10:27

बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई लोकल तिकिट वापरण्याचे संपुर्ण नियम कुठे वाचायला मिळतील? किंवा कोणी जाणकार असतील तर क्रुपया सांगा.

मी स्टेशन१ साठी एकाच बाजुचे (Single) तिकिट द्या म्हणुन सांगुनही खिडकीवरच्या माणसाने स्टेशन१ च्या लगेच पुढचे एक स्टेशन स्टेशन२ तिकिटावर छापुन दिले. कारण सुरुवातीचे स्टेशन ते स्टेशन१ आणि सुरुवातीचे स्टेशन ते स्टेशन२ यांचा तिकिट दर एकच आहे.

मी स्टेशन१ वर उतरल्यानंतर 'काही कारणास्तव' दुसर्या फलाटावर गेलो (लगेच - आणि रुळ न ओलांडता). स्टेशन१ वर दोनच फलाट आहेत. मला तिकिट मास्तरांनी पकडले आणि दंड भरण्यास सांगीतला आणि सिनियर टिसी कडे नेले. सिनियर टिसी ने मला सांगितले की माझ्याकडे स्टेशन२ साठीचे एकाच बाजुचे तिकिट आहे आणि मला परतीच्या प्रवासाच्या फलाटावर पकडले आहे. म्हणजेच मी स्टेशन२ ला जाउन परत येतो आहे ज्यासाठी हे तिकिट लागू नाही.
मी त्यांना सांगीतले की - तिकिट किती वाजता काढले आहे ती वेळ बघा, या नंतर मी सुरुवातीच्या सटेशन वरुन स्टेशन२ वर जाउन जर परत आलो असतो तर तुम्ही मला किती वाजता प़कडले असते ते बघा - त्यानंतर सिनियर टिसी ने मला सोडुन दिले. परंतु यात माझी बाजु पटवुन देण्यात माझा खुप वेळ गेला आणि आधितर सिनियर टिसी पावती फाडण्यावर अडुन बसला होता.

१. तर लोकलचे हे तिकिट असे - Platform wise - असते का?

२. ज्या स्टेशनवर संपुर्ण फालाट हे एकच युनिट असुन त्याची डावी बाजुन म्हणजे फलाट १ आणि उजवी बाजु म्हणजे फलाट २ असे समजले जाते त्या स्टेशन्सवर वरील नियम - ज्यासाठी मला पकडले - कसा लागु करतात?

३. मुंबइ लोकलचे प्रवास खंडीत (Journey Break) करण्याबद्दल काय नियम आहेत?

४. ज्या स्टेशनवर उतरण्यासाठी आपण एकाच बाजुचे (Single) तिकिट काढले आहे - ते तिकिट - त्या स्टेशनवर - किती वेळेपर्यंत चालते? समजा मला कोणाचीतरी वाट बघायची असेल तर मी किती वेळ त्या तिकिटावर त्या स्टेशनवर थांबु शकतो?

५. एकाचा बाजुच्या (Single) तिकिटावर मी सगळ्या फलाटांवर - फक्त लोकलच्या; बाहेरगावच्या गाड्यांच्या फलाटावर नाही - जाउ शकतो की नाही?

१. तर लोकलचे हे तिकिट असे - Platform wise - असते का? > नाही. स्टेशन १ ते स्टेशन २ असेच असते.

२. ज्या स्टेशनवर संपुर्ण फालाट हे एकच युनिट असुन त्याची डावी बाजुन म्हणजे फलाट १ आणि उजवी बाजु म्हणजे फलाट २ असे समजले जाते त्या स्टेशन्सवर वरील नियम - ज्यासाठी मला पकडले - कसा लागु करतात? >>> जर का तुम्ही सिंगल तिकिट काढले असेल आणि काही कारणासाठी प्लॅटफॉर्म १ वरुन प्लॅटफॉर्म २ वर गेला असाल आणि त्याच वेळी प्लॅटफॉर्म २ वरुन ट्रेन पास झाली असेल तर टिसी तुम्हाला प्लॅटफॉर्म २ चे उतारु समजून तुमच्या कडून योग्य तिकिटाची मागणी करु शकतात.

३. मुंबइ लोकलचे प्रवास खंडीत (Journey Break) करण्याबद्दल काय नियम आहेत? > परतीच्या तिकिटावर बर्‍याच वेळा खंडीत प्रवास करतात. पण खंडित प्रवासाच्या वेळी जर का टिसीने टिकिट चेक केलं तर मात्र ते तिकिट ग्राह्य धरल जात नाही. नविन तिकिट घेऊन उरलेला प्रवास करावा लागतो.

४. ज्या स्टेशनवर उतरण्यासाठी आपण एकाच बाजुचे (Single) तिकिट काढले आहे - ते तिकिट - त्या स्टेशनवर - किती वेळेपर्यंत चालते? >> प्रवास साधारणतः एका तासाच्या आत सुरु करावा अशी तिकिटा वर नोंद असते.
समजा मला कोणाचीतरी वाट बघायची असेल तर मी किती वेळ त्या तिकिटावर त्या स्टेशनवर थांबु शकतो? >> त्या साठी फ्लॅटफॉर्म टिकिटाची सोय आहे.

५. एकाचा बाजुच्या (Single) तिकिटावर मी सगळ्या फलाटांवर - फक्त लोकलच्या; बाहेरगावच्या गाड्यांच्या फलाटावर नाही - जाउ शकतो की नाही? > नाही.

परतीचे टिकिट त्या दिवशीच्या मध्यरात्री पर्यंत ग्राह्य धरले जाते. तसेच जर शनिवारी परतीचे टिकिट काढले असेल तर ते सोमवरच्या मध्यरात्री पर्यंत फक्त परतीच्या मार्गासाठी ग्राह्य असते. तशी नोंद तिकिटावर केलेली असते.

कन्झ्युमर कोर्टात तक्रार नोंदवायची असेल तर त्याकरता वकिलांची नावं कोणी सुचवू शकेल का? इथे एक लिस्ट करून टाकायला हरकत नाही.

कन्झ्युमर कोर्टात तक्रार नोंदवण्यासाठी वकीलाची गरज नसते. मार्गदर्शन हवेच आहे असे वाटले तर ग्राहक पंचायतीकडे जाता येईल.
http://www.mumbaigrahakpanchayat.org/index.asp?msgid=activities#.UifnqX8...

मामी, ग्राहक न्यायालयासंबंधी विचारणा केली होतीस, काही झाले का पुढे?

माझ्याकडचे ग्राहकसहनशीलतेचे एक गळू अगदी फुटायला आले आहे. म्हणून मीही ऑनलाईन चौकशी करत होतो. तर मला हे वर रूनीने दिलेले संकेतस्थळ सापडले. http://www.consumergrievance.com/index.htm

ही शासकीय सेवा नाही. (International Consumer Rights Protection Council (ICRPC) is a registered, non-profit, non-political, Non Government Organization (NGO) working for the benefit and welfare of consumers in distress.) यात वर्षाची ३०० रू. फी भरून सदस्यत्व मिळते, असं दिसतंय. इथल्या कोणाला अनुभव आहे का?

माझ्या एचपी कॉम्प्युटरनं अगदी वात आणला होता .... तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आजच जरावेळापूर्वी जरा ठीक झालाय अशी शंका येतेय. एलसीडी पॅनेल आणि मदरबोर्ड बदलावा लागला. पण त्याकरता असंख्य फोन करावे लागले. निदान १० वेळा आमचा प्रॉब्लेम दहा वेगवेगळ्या व्यक्तींना सांगावा लागला. ६-७ बाजारबुणग्या इंजिनियर्सनी घरी येऊन कॉप्यु तपासला. सर्व्हिस सेंटरच्या हेडला अनेक फोन करून अनेक निरोप ठेऊनही कधीही त्यानं फोन करायचे कष्ट घेतले नाहीत. सतत मिटिंगमध्ये असायचा.

शेवटी मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून एक जयंत नावाचा चांगला इंजिनियर आला आमच्या नशिबी. त्यानं येऊन सिन्सिअरली काम करून कॉप्यु ठीक केला. आता चालावा अशी अपेक्षा.

वॉरंटीमध्ये प्रॉडक्ट असेल तर सर्व्हिसमध्ये जास्त दिरंगाई केली जाते का?

अच्छा. माझं MTNL नेट चालत नव्हतं. आज चालू झालं! अगदी कसोटी घेतली हो MTNL ने संयमाची.

वॉरंटीमध्ये प्रॉडक्ट असेल तर सर्व्हिसमध्ये जास्त दिरंगाई केली जाते का? <<< हो, मला सोनीकडून असा अनुभव आला होता.

सध्या डोंबिवलीत घरोघरी 'गैस कार्ड' विकायला येत आहेत .गैसच्या तक्रारी केल्या की कंपनीचा मैकेनिक येवून वॉल्व /पाईप इ०बदलून साडेसातशेला रुपयांना फोडणी लावतो ।तसे होऊ नये म्हणून हे गैसकार्ड शंभर रुपयात घ्यायचं आणि मैकेनिक आला तर त्याच्यासमोर धरायचं की त्याचा ऱ्हुदय पालट/परिवर्तन का काय होतं म्हणे आणि तो निमूटपणे फुकटात काम करून देतो वगैरे अशी योजना आहे .

गैस दुकानदार पूर्वी पगारी मैकेनिक ठेवत ते लगेच येत नसत परंतू वॉल्व /बटण यातून गैस गळत असल्यास तो काढून साफ करून मेलिकोट ग्राफाईट ग्रीस लावून चालू करून द्यायचे .आता दुकानदारांनी हे काम आउटसोर्सवाल्यांना पंचवीसेक लाखांना ठेक्याने दिले आहे .त्यांचे मैकेनिक फोन केल्यावर पंधरा मिनीटात येतात आणि झटपट दोन्ही वॉल्वझ बदलूनच टाकतात .रोज अशा वीसतरी ऑर्डर (!)पुऱ्या करतात .हासुध्दा रीतसर स्कैमच आहे .

(बाफ क्र node 50223 वरून कॉपि पेस्ट केले .)

याच आठवड्याच्या पेपरमध्ये वाचले की आता दुकानदारांना 'एकदा विकलेली वस्तू परत घेणार नाही' असे म्हणता येणार नाही. दोन केसेसमध्ये ग्राहक न्यायालयाने असा निर्णय दिला आहे. कोणाकडे ती बातमी असल्यास कृपया इथे टाका.

धन्यवाद मामी .बाफ वाचला .
दोन वर्षाँपूर्वी मेकैनिकला सांगितले की ग्रीसिंग करून दे वॉल्व बदलू नको .तर म्हणाला पासष्ट रुपये सर्विस चार्ज लागेल गैरंटी नाही .करून घेतले अजून ठीक आहे .सर्विसिंगच्या पावत्या ठेवायच्या .दाखवल्या की गपचिप काम करतात .असो थोडे विषयांतर झाले इकडे .

बाफ क्र node 50223 वरून कॉपी पेस्ट केले .

मला दोन चांगले अनुभव लिहायचे आहेत. छोट्या दुकानदारांचे आहेत.
१) कुकर रिपेअरः दोन प्रेशर कुकर. एक कुकर व एक पॅन चे हॅंडल तुट्णे व्हाल्व जाणे इत्यादी बारीक तक्रारी होत्या. मुंलुंड अंबाजी धाम शेजारी एक बारके दुकान आहे तिथे दिल्यावर मला तीन आठवडे तिथे जायलाच झाले नाही. मग गेल्यावर् पॅन स्टीलचा का अल्युमिनिअमचा ते लक्षात येइना. ते लोक्स चिठ्ठी लावोन ठेवतात भांड्यावर. त्यांनी शोधले. व दुसर्‍या कुकरचे पण रिपेअर करून दिले लगेच. व्हाल्व ठीक आहे म्हणून सांगितले. एक नव्या डिझायनचा लायटर दिला. अगदी वाजवी दर. बट व्हॉट रिअली थ्रू मी ऑफ वॉज दुकानदाराने माझ्या मोठ्या बॅगेत दोन्ही कुकर, सामान पर्स इतर सामान असे नीट ठेवून मला दिले.

स्कूटर वर अशीकामे करायची म्हणजे सामान फार नीट पॅक करून त्यासकट आपण कसे जायचे ते सोचून जायला लागते माझी बॅग मोठ्ठी जिम बॅग होती त्याने नीट पॅक केल्याने माझे काम परफेक्ट झाले. सच अ स्वीट पर्सन.

दुसरे एम जेथवा टेलर. माझ्याकडील एक दिल्लीचा महाग टॉप होता तो फाटला, तो प्याट र्न कॉपी करण्यासाठी टेलरकडे दिला होता. त्याने वेळेवर काम करून पिकप करण्यासाठी मला फोन केला व
नाहीतर होम डिलीवरी देतो म्हणून सांगितले. अगेन सो स्वीट! Happy

जर तुमची इच्छा असेल तर आता सबसिडाईज्ड गॅस सिलिंडर न वापरता पूर्ण पैसे देऊन सिलिंडर वापरता येतो. गॅस सिलिंडरवर खूप सबसिडी दिली जाते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पैसे देऊन सिलिंडर घ्यावा असं आवाहन सरकारने केले आहे.

याकरता, तुमच्या गॅसकंपनीच्या वेबसाईटवर अकाउंट असेल तर एका क्लिकनिशी हे काम होईल. नाहीतर एक अ‍ॅप्लिकेशन लिहून तुमच्या गॅस एजन्सीत द्या. तुम्हाला जर पुन्हा सबसिडाईज्ड सिलिंडर हवा असेल तर एक वर्षानंतर पुन्हा ऑप्ट करता येतं.

१२ सप्टेंबरला मी सेलफोन ऑनलाईन बुक केला.तो एका दिवसात मिळावा म्हणून ९०/- इतके एक्स्ट्रा भरले. मला १३/९/२०१४ ला मिळणार अशा संदेशाची मेल आली.पण डिलिव्हरी नाही मिळाली.दुसर्‍या दिवशी रविवार होता.संध्याकाळी मी वैतागून मेल पाठवली की माझी ऑर्डर रद्द करा.त्यावर २ मेल आल्या की१) तुमची ऑर्डर रद्द करत आहे २) ऑर्डर आधीच कुरियर केली आहे.त्यावर मी काही रिप्लाय दिला नाही.मला वाटलं की ऑर्डर खरच कॅन्सल झाली आहे.
पण १५/९/ला दुपारी ३.३० वाजता डिलिव्हरी मिळाली. मला ना मेसेज आला ना आपणहून त्यांची मेल आली .(की१४/९ ला रविवार असल्यामुळे ,१५/९ ला डिलिव्हरी मिळेल अशा अर्थाची). रात्री मी मेल टाकला की माझे एक्स्ट्रा भरलेले रु.९०/-मला परत करा.तेव्हा दुसर्‍या दिवशी मेल आली की तुमचे २७०/-आम्ही क्रेडीटमधे ठेवतो आहे.तेव्हा त्या किंमतीची वस्तू विकत घ्या.

मला खरंतर फक्त निषेध नोंदवायचा होता.फक्त एक मेसेज / मेल/ फोनकॉल अपेक्षित होता.

You should soon get an email asking for your feedback about the product. You can write about the delay in delivery.

You can write about the delay in delivery.>>>> हो दिला मी फीडबॅक.फ्लिपकार्टच्या विक्रेत्याची/ कुरियरसेवेची त्रुटी असेलही.शिवाय मधे रविवार होता.माझी फक्त अपेक्षा होती की मधे रविवार असल्यामुळे सोमवारी दिलिव्हर्र मिळेल अशा अर्थाचा मेसेज / मेल/ फोनकॉल आला पाहिजे होता.त्यामुळे माझ्या स्वभावाविरुद्ध मी रिफंडसाठीचा मेल केला.आता मलाच अवघड वाटतंय.

ऑर्डर डिस्पॅच केली की फ्लिपकार्ट (बहुतेक ऑनलाइन ट्रेडर्सही ) कुरियरचा ट्रॅकिंग आयडी कळवतं. त्यावरून आपलं पॅकेज कुठवर पोचलं आहे हे पाहता येतं. पण जर तुम्ही सेम डे डिलिव्हरी ऑप्ट केली असेल आणि त्यांना शक्य नसेल तर त्यांनी कळवायला हवंच होतं.

त्यांना शक्य नसेल तर त्यांनी कळवायला हवंच होतं.>>>एवढंच माझंही म्हणणे होते.बाकी त्यांनी कुरियरचा ट्रॅकिंग आयडी कळवला होता.
नकळवल्याचा निषेध म्हणूनच मी रिफंडचा मेल टाकला होता.मला वाटलं की फ्लिपकार्ट ,रिफंड न देण्याबाबत व उशीर झाल्याबाबत दिलगिरी फक्त व्यक्त करेल.पण ३ दिवस उशीर झाल्याबद्दल २७०/- ची वस्तू खरेदी करण्यासाठी,
The Wallet is used to hold refund balance or promotional credit associated अशी मेल आली आहे.

मामी खूपच छान धागा आहे.

तुम्ही रेग्युलर दुधाची पिशवी घेत असाल तर त्यावर खालील माहिती आहे का चेक करा आणि त्या माहितीचा वापर करा.

मध्यंतरी आमच्या घरी वारणा दूध भेसळ मिळाल होत. दुसर्‍या दिवशी पप्पांनी दूधाची पिशवी नीट वाचली. त्यावर लिहिल आहे की जर तुमच दूध खराब झाल तर फेकू नका तसच ठेवा आणि त्यांनी एक फोन नंबर दिला आहे त्यावर फोन करा, त्यांची माणस येऊन दुधाच सँपल टेस्टिंगसाठि घेऊन जातील.

Pages