सायटीका वर उपाय सुचवा

Submitted by बाटेल बामन on 20 January, 2011 - 02:33

एका डोक्टरकडे गेलेलो. अनेक तपासन्या व भरमसाठ फी उकळून त्याने काही व्यायाम सांगितले. वज्रासनात बसुन पुधे वाकायचे असे व्यायाम होते. ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या फिजिओथेरपिस्टला गाठा बरं आधी!>>>>> + कितीतरी.याने बराच फरक पडतो.ते व्यायाम नेहमी करायचे आहेत. जोडीला डॉ.च्या सल्ल्यानेच औषधे घ्या.डो.च्या सल्ल्याने व्यायाम करा.याने आपल्या शरीरात
काही हार्मोन्स (?) तयार होतात,जे पेनकिलरप्रमाणे काम करतात.(माझी फिजिओ+स्वानुभव)

त्याने नश्वर शरीराची चिंता सोड असे सांगितले होते. >>>>. आपण सर्वसामान्य आहोत.जोपर्यंत ,हा देह वागवायचा असेल तोपर्यंत त्याची डागडुगी केलीच पाहिजे.

छान माहिती, मलाही हा त्रास सुरु झालाय. पण सहन करण्यासारखा आहे अजून तरी, फक्त जास्त वेळ उभा रहता येत नाही तसेच 10 मिनिट पेक्षा जास्त चाललं तर दुखु लागतं.
Physiotherapy try करेल, डिरेक्ट physio कडे जावं कि आधी टेस्ट वगैरे करून मग जावं.?

इथे मुंबईत तरी सायाटिका साठी भुजंगासन आणि उभे राहून खांदे आणि पाठीचा वरचा भाग शक्य तितका मागे नेणे हे दोन व्यायाम प्रामुख्याने सांगतात.

चांगल्या physio ला दाखवा. त्यांना दुखीवर हाताने स्पर्श करून समजते कोणता मणका सरकलाय आणि दुखापत कितपत आहे ते. जास्त displacement असेल तर x ray सांगतील. वेदना असह्य असतील तर व्यायाम शक्य होत नाही. मग सौम्य steroids देऊन व्यायाम घडवतात. दोन तीन दिवसात वेदना कमी होऊन stetoids शिवाय व्यायाम करू शकाल. प्रथम माकडहाडाकडे दुखते मग वेदना सरकत खाली कुल्ल्यामधे येते आणि पुढे मांडीच्या आतल्या बाजूने गुढग्यापर्यंत पोटरीपर्यंत पोचते. तीव्र होते. व्यायामामुळे ह्याच उलट क्रमाने ती मागे मागे जाते आणि शमते. सरकलेला मणक्याचा भाग पूर्व स्थितीत येऊन नर्व मोकळी होते.
आपल्यालाही दुखरा भाग गरम जाणवतो. सुजेमुळे किंचित लिबलिबीत लागतो हाताला. थंड आणि गरम शेक हाही उपाय सांगतात. पण तो तात्पुरता असतो. मात्र व्यायामापुरती सुटका मिळते वेदनेतून. आणि सूजही उतरते.

Pages