सायटीका वर उपाय सुचवा

Submitted by बाटेल बामन on 20 January, 2011 - 02:33

एका डोक्टरकडे गेलेलो. अनेक तपासन्या व भरमसाठ फी उकळून त्याने काही व्यायाम सांगितले. वज्रासनात बसुन पुधे वाकायचे असे व्यायाम होते. ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MRI of lumbar region L1-L5 काढून पाहिलाय का? बोन कॅलशियम किती आहे पाहिलेत का? मला हे सयाटिका टाईप वाटते. मसल स्पाज्म वाटते का त्या भागात तर सुद्धा असे दुखते.
तुम्हाला वाकण्यास मनाई असली तरी काही स्ट्रेचेस करा. एक चांगला थेरपिस्ट/डॉक्टर बघा.

थंड व गरम अशी थेरपी असते. आधी थंड टबात बसायचे मग गरम मग पुन्हा थंड. असे जमेल तितके करा दिवसातून. सध्या जड काहि उचलु नका.

चालायचे व स्ट्रेचेस करायचे. प्राणायाम करा. फरक निश्चित पडेल. शुभेच्छा.

मी पण सायटिकाचंच लिहायला आले होते Happy मणका किंचीत सरकून आतली नस दबली जाते आणि खूप दुखतं. थोडे दिवसं कंप्लिट रेस्ट आणि ट्रॅक्शन सांगतात डॉक्टर.

ह्या त्रासासाठी पुढे झुकायचे व्यायाम अजिबातच चुकीचे आहेत. डॉक्टर बदला.
चांगला फिजिओथेरपीस्ट शोधा.
रामदेवबाबांचे स्पायनल कॉलम च्या प्रॉब्लेम्स साठीचे एक रेजिम आहे योगासनांचे ते करा.
मला हाच प्रॉब्लेम होता/ आहे. सायटिका नर्व्ह दुखत रहायची. अर्थात इंटेसिटी सहन करण्याइतपत होती. पण या ठराविक योगासनांच्यामुळे आता प्रचंड रिलीफ आहे.

मनक्याचा एक्सरे काढला आहे. डोक्टरने मनक्यात गेप नाही म्हटले. वजन उचलावेच लागते. पत्नीचे ओपरेशन झाल्यामुले मला पाणी भरावे लगते.
प्राणायाम, स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यावर तात्पुरते बरे वाटते. परत येरे माज्या मागल्या चालु.
सायटीका काय आहे

मग सतत जड वजनं उचलल्याने तुम्हाला हा त्रास होत असेल. बादल्या, कळशा उचलून पाणी भरण्यापेक्षा नळी लावून पाणी भरा. त्याने फरक पडला तर नक्की तेच कारण आहे.

पत्नीलाही रोज पाणी नळीनेच भरायला सांगा कारण जसा तुम्हाला पाणी भरण्याने त्रास होतो तसा त्यांनाही होतच असेल.

अश्वे, मी पण हेच लिहायला आले इथे.

मंगेश, वेदना होतात म्हणजे कळ येतेय की कंटीन्युअस दुखतंय? मुंग्या वगैरे येतायत का?

माझ्या बाबांना असा डाव्या पायाला मुंग्या यायचा त्रास व्हायचा. ३ वर्षांपुर्वी त्यांचं सायटीकाचं ऑपरेशन केलं. आता काही त्रास नाहीय.

सायटीका काय आहे
>>
मणक्यात जी हाडं असतात ती लगोरीवर दगड ठेवले की जसं वाटतं तशी असतात. ह्या हाडांच्या बाजुला नसा असतात. ह्या हाडातली एखादी वाटी सरकुन त्या नसेवर आली तर पायाला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे पायाला मुंग्या येतात. (मला नक्की माहीत नाही ऑपरेशनमध्ये काय करतात ते. बाबांचं ऑपरेशन झालं तेव्हा ती वाटी थोडीशी कापली होती. )

कळ येत नाही. सारखे दुखते. मला ओपरेशनची भिती वाटते. १९८९ ला टायफोईड झाला होता. त्यावेळेस इंजेक्षन घेतले होते त्यांनंतर अध्यापपर्यंत नाही. कंपनीचे वेक्षीनेशन असते प्रत्येक वरशी मी घेत नाही.
त्यामुळे ओपरेशन ला काट.

प्रत्येक सयाटिकाला ऑपरेशन लागत नाही. मुळात ती वाटी/डिस्क किती प्रमाणात सरकली आहे ते पहावे लागते म्हणून MRI लागतो. ती आतल्या बाजूला सरकली की बाहेर ते ही पहा.

मग किती प्रमाणात बाहेर्/आत डोकावते व कुठल्या नसीवर दाब देतेय तसे ठरवता येते.
ऑपरेशन सगळ्यात शेवटचा उपाय. Wink

सर्वात स्वस्त उपाय रोज थंड-गरम-थंड पाण्याची थेरपी व प्राणायाम तीन महिने करा.
गावातल्या भाजीवाल्या बाया असतात ना त्या बघा कसे भाजीचा टोपला उचलतात तशी पद्धत वापरून वजन उचलायचे.(टक लावून पाहू नका, मार खाल. फक्त युक्ती साठी सांगतेय).

मग सांगा कसे वाटते ते.

सुजोग म्ह ण जे तळ हाता व र accupressure method

सुजोग उपाया विषयी माहिती गोळा करा उपयोगात आणा

सुजोगचे सर्व उपाय अपल्या तळ हाता वरील पोईन्ट प्रेस करुन करता येतात यात काहीही खर्च येत नाही

सुजोग बद्दल मी ईथे लिहीण्या पेक्षा तुम्हा ला व री ल उ पा य सु च व ला आहे राग मानु नका

वजन उचलताना गुढघ्यात वाकुन उचला.
सायटीकाचा त्रास 'शलभासन' करुन जातो असे योग सांगतो.. तज्ञ प्रशिक्षकाच्या देखरेखिखाली करा.
निराश होऊ नका, मनाचे संतुलन ढळु देऊ नका.

@
तुम्ही भारतात असता का?>>> होय.

बोन कॅलशियम किती आहे पाहिलेत का?>>> नाही.

(टक लावून पाहू नका, मार खाल. फक्त युक्ती साठी सांगतेय).>>> Biggrin

निराश होऊ नका, मनाचे संतुलन ढळु देऊ नका.> >>>
सतत वेदनांमुळे कशातही लक्ष लागत नाही. चिडचिड होते. चेहर्‍यावर नेहमी थकवा दिसतो.
मन थार्‍यावर नाही.

मंगेश, धीर धरा. वर सर्वांनी वेगवेगळे उपाय तर सांगितले आहेतच. चांगल्या फिजिओथेरपिस्टला गाठा बरं आधी!

वरील सर्व उपाय तर कराच, शिवाय सायटिका, पाठदुखी, कंबरदुखी, पायदुखीसाठी काही विशिष्ट आरोग्यमुद्रा आहेत. घरी टीव्ही बघताना, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या, बस/ लोकलचा प्रवास करताना इत्यादी वेळेसही तुम्ही त्या करू शकता.
त्या आरोग्यमुद्रा म्हणजे दोन्ही हातांनी करावयाच्या मुद्रा : १. वायुमुद्रा २. अपान मुद्रा ३. प्राण मुद्रा ४. अपान वायु मुद्रा.

१. वायुमुद्रा : तर्जनी (हाताच्या अंगठ्याशेजारील बोट) मुडपून त्याचे टोक अंगठ्याच्या तळाला - मुळाला चिकटवा. अंगठा त्या बोटावर ठेवा. इतर बोटे सरळ ठेवा. ही मुद्रा दिवसातून १५ - १५ मिनिटे अशी तीनदा करा.

२. अपान मुद्रा : हाताचे मधले बोट व अनामिका (करंगळी शेजारील बोट) ह्यांची टोके अंगठ्याच्या टोकाला जुळविणे. बाकी बोटे सरळ ठेवणे. ही मुद्रा जाता-येता, बसताना इत्यादी वेळेसही करता येते. जेवल्यावर तर ही मुद्रा कराच. ही मुद्रा कितीही वेळ केली तरी चालते. पण दिवसातून दोनदा तरी १०-१५ मिनिटे ही मुद्रा करा.

३. प्राण मुद्रा : हाताची तर्जनी (अंगठ्याशेजारील बोट) व मधले बोट सरळ ठेवून अंगठा, अनामिका (करंगळी शेजारील बोट) व करंगळी ह्यांची टोके एकमेकांना जुळविणे. ही मुद्राही कितीही वेळ करा. जेवल्यानंतर/ खाल्ल्यानंतर तर कराच!

४. अपान वायु मुद्रा : हाताच्या तर्जनीचे टोक (अंगठ्याशेजारचे बोट) अंगठ्याच्या मुळाशी चिकटवा. अंगठा, मधले बोट व अनामिका (करंगळीशेजारचे बोट) ह्यांची टोके एकमेकांना जुळवा. करंगळी सरळ ठेवा. ही झाली अपान वायु मुद्रा. हीदेखील जेवल्यानंतर केल्याने फायदा होतो. किमान १० ते १५ मिनिटे ही मुद्रा जेवल्यानंतर करत जा.

ह्या मुद्रा झटपट रिलीफ देणार्‍या नाहीत. पण रोज यांचा सराव इतर उपचारांच्या जोडीला केल्यास फरक नक्कीच पडेल. तुम्हाला शुभेच्छा! Happy

@ध्वनि,

MRI of lumbar region L1-L5 काढून पाहिलाय का? बोन कॅलशियम किती आहे पाहिलेत का?

या तपासण्या करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो?

मंगेश, माझ्या माहितीत तीन केसेस आहेत ज्यांना असा त्रास झाला होता. फार भयंकर त्रास झाला होता. मुंबई मध्ये एक डॉक्टर आहेत त्याचा पत्ता देतो आहे. नक्की जा. या डॉक्टर ने विशिष्ठ मसाज करून कसेस बऱ्या केल्या आहेत. केसेस बद्दल अधिक महिती हवी असेल तर मला सम्पर्क कर. ते सर्व फोरम वर लिहीत नाही मी.

डॉ जयेश व्ही पटेल ( Neurotherapist )
Mobile Tel 31029995
20583002
98201 92537

Email address : - drjayeshpatel@hotmail.com
Address of Hospital

Shah Polyclinic
Matrusmurti 2nd Tilak Road
Behind Swami Narayan Mandir
Dadar East Mumbai - 400 014
Tel 24145545 & 24163873
Tuesday Thursday saturday 11 am to 1 pm

प्रतिसादातुन कळकळीने मदत करणार्या सर्वांना धन्यवाद म्हणतो. Happy

एका अध्यात्मिक गुरुला शारीरीक व्याधींबद्दल विचारले असता. त्याने नश्वर शरीराची चिंता सोड असे सांगितले होते. पुधे ह्या दुखःद संवेदना आहेत तशाच सुखद संवेदनाही असतात. संवेदना येत जात राहतील. त्यांच्याकडे समत्व/त्रयस्थ भावाने बघ, वेदना जाणवणार नाहीत म्हटले. पण अध्याप मला हा भाव काही जमला नाही. कितीही प्रयत्न केला तरी वेदना उफाळुन डोके वर काढतातच. याबद्दल जाणकार प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे.

http://www.niramaymedicalyog.com/ ह्या वेबसाईट वर तुमच्या जवळच्या केंद्राची माहिती मिळेल. माझ्या डाव्या घोट्याला 'ligament tear' झाला होता. एक वर्षभर मांडी घालता येत नव्हती पण इथल्या उपचारांचा फायदा झाला. ३-४ वर्षात माझ्या ओळखीच्या खुप जणांचा चांगला अनुभव आहे. मनोबल सुधारण्यासाठी ते प्राणायाम करुन घेतात. तुम्हाला कसलाही असाध्य रोग नाही असा विचार करा आणि निराश नक्किच होऊ नका. फक्त जे उपाय कराल त्यावर आणि करणार्यावर विश्वास ठेवा. थोडे दिवसात बरे झालात की आयुष्य नव्याने आवडायला लागेल.

खरच तुझ्या झुंजार वृत्तीचं कौतुक करायला हवं.

मला यातलं काहीच कळत नाही. इथं जाणकारांनी छान सल्ले दिलेले आहेतच.
माझ्या ऐकण्यात काही केसेस अशा आहेत ज्या निसर्गोपचाराने ब-या झाल्यात. पुण्यात रेल्वे स्टेशनजवळ लडतकवाडी ( ताडीवाला रस्ता ) इथं एक केंद्र आहे आणि मांजरीला दुसरं एक केंद्र आहे. साईड इफेक्टस नाहीत असही ऐकलय.

फिजिओला गाठणं तर केव्हाही चांगलच..

जे काही करायच ते लवकर सुरू कर हा एकमेव सल्ला मात्र मला देता येईल

.

मला असाच त्रास गेल्या वर्षी झाला होता. x-rayमधे मणक्यात गॅप आहे असे सांगितले. नंतर मी डॉ. शारंगपाणींकडे गेले. त्यांच्या ट्रीटमेंटचा मला खूपच फायदा झाला.

सायटीका हा विकार झाला असेल असे नक्की करण्यासाठी " आपले आरोग्य आपल्या हातात" हे पुस्तक विकत आणावे. त्यांत दिल्याप्रमाणे रोगाची परीक्षा व उपचार करावेत.

खाण्यातुन रताळे, पावटा, मटार इ वातुळ पदार्थ वर्ज करावेत.

लसुण खाण्यात ठेवावा.

<<लसुण खाण्यात ठेवावा.<<<
अगदी बरोब्बर! भरपुर लसुण खावा ...अगदी कच्चासुद्धा! माज्या सास-यांना 'सायटिका' होता. वातुळ पदार्थ एकदम वर्ज्य आणि रोजच्या आहारात लसुण्-खोब-याची चटणी !!

बाराक्षारामधे यावर उपाय मिळू शकेल प्रयत्न करावा. आणि थोडं आशावादी पण राहा मित्रा. हे तर किरकोळ दुखणे आहे. देवाने दुखण्यासाठी का होईना पाय तर दिलेत. ज्याना ते पण नाहीत त्यांचे काय?

बराच जुना विषय आहे पण आणखी कुणाकडे काही माहिती आहे का या विषयावर??? म्हणजे जनरली कंबरदुखी आणि त्यासाठी पोश्चर सांभाळायचे असेल तर काही टिपा इ.
डिस्क हर्नियेशन नंतर फिजिओथेरपी घेतली तरी काही वेळा त्रास पुन्हा उद्भवतोच...यावर तेलाचे उपाय (कटी) करतात असं ऐकलंय..मुंबईत कुणी माहितीतलं आहे का हे उपचार करायचे असल्यास...जमल्यास करून पाहायचं आहे...बाकी फिजिओ ने सांगितलेले स्ट्रेचेस इ. करते आहे पण शेवटी कधी न कधी ते दुखणं वर येतंच....

एम आर आय करवून घ्या. मणक्यात कदाचित स्लिप्ड डिस्क ( हर्नीयेटेड डिस्क) असु शकेल. त्यामुळे सायटीका नस दबल्या जाते आणि त्रास होतो. एकदा काय आहे ते कळलं की पुढची ट्रीटमेण्ट काय ते तुमचे डॉक्टर ठरवू शकतील. सायटीका मधे फिज़िकल थेरेपि अतिशय उपयुक्त असते.

Pages