एका सुजलेल्या शहरात...

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 13 January, 2011 - 07:31

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

प्रयत्नांचे सिग्नल तोडत
नशीबाला साथीला घेत
धूळभरल्या हवेत
अश्रू झालेत चिकार

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

एका सुजलेल्या शहरात
फ्ल्यायओव्हरचं काम
मूठभर कारवाल्यांसाठी
आयुष्याचं दाम

पिलर एखादा तुटू दे
इन्शुरन्स क्लेम मिळू दे
पांढर्‍याशुभ्र झब्ब्याखाली
फक्त मन नसू दे भिकार

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

परफ्यूम शिंपडून निघालो
घामाचा झाकायला वास
फुटलाच कुठे बॉम्ब तर
रक्ताचं करू काय

सुजट शहरावर धुळीचा लेप
धुळीच्या लेपावर दुःखाची भेग
जाणून बुजून आता
निर्ढावत जातोय खास

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

१०.३० सकाळ
१३ जाने १०

गुलमोहर: 

छान

छान Happy

सुजट शहरावर धुळीचा लेप
धुळीच्या लेपावर दुःखाची भेग
जाणून बुजून आता
निर्ढावत जातोय खास

छान आणि मस्त. आवडली कविता !!

माबोवर केलेलं पहिलंच लेखन...

धन्यवाद पुनश्च सर्व प्रतिक्रियाकारांचे आणि वाचकांचे!

ग्रामिण काय आनि शहरी काय सगळ्याच मुंबईकरांची ही अवस्ता होनार आहे.. ग्रामीन ची २०११ मध्ये तर लोकलवाल्यांची २०१३ मध्ये.. एवदाच काय तो फरक