डाएट रेसिपीज

Submitted by दक्षिणा on 11 January, 2011 - 23:55

अलिकडे बर्‍याच मैत्रिणींनी शंका उपस्थित केली की वजन कमी करताना खायचं किती आणि नक्की काय? कशात फॅट्स जास्त? कशात कमी? मग कोणता लो कॅलरी पदार्थ खाल्ला तर पोटभर होईल? याची चर्चा करता करता रमा ने सुचवलं की एक डाएट रेसिपीजचा बीबी सर्वांसाठीच उघडू.
अखेर आज मुहुर्त लागला...

या बीबी वर तुम्ही केलेली/तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी, लो फॅट, लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा. ब्रेकफास्ट/लंच्/डिनर्/स्नॅक्स्/वन डिश मिल... काहीही चालेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे ओटमीलची उकड करायची का? Wink

साबुंसाठी मी ओटमील ताकात शिजवायचे, पण फोडणी नसल्यामुळे खुमारी येत नव्हती. आता फोडणीत घालून बघेन नक्की.

chinese beans :

मोठ्या भांड्यात पाणी घेऊन उकळवावे. त्यात धुतलेल्या फरसबीच्या शेंगा घालून ५-७ मिनीटे शिजवाव्यात - अर्ध्या कच्च्या असू द्याव्यात. पाणी निथळून घ्यावे.
मोठ्या non-stick pan मध्ये ०.५ टे. स्पून तेलावर किसलेले आलं-लसूण घालून परतावे. त्यावर उकडलेल्या फरसबीच्या शेंगा घालून परताव्यात. हवी असल्यास हिरवी मिरची बारीक वाटून घालावी. मीठ घालावे. व फरसबी झाकण ठेवून शिजून द्यावी. ५ एक मिनिटाने गॅस बंद करून मग लगेच त्यावर १/२ टे. स्पून सॉय सॉस घालावा नी परतून गरम्-गरम खाव्या. फार मस्त लागतात.

आमच्या कंपनीमधे HSE फार स्ट्राँग आणि अलर्ट आहे. दर आठवड्याला HSE communication, दर महिन्यात एक HSE Event, शिवाय सेफ्टी विक, हेल्थ चेकअप किंवा पर्यावरण दिन असे वेगवेगळे कार्यक्रम चालु असतात. आता त्यांना डाएट रेसिपी लाइव डेमो हवे आहेत.
तर पुण्यात कोणाला अशी/असा कोणी डाएटिशिअन माहित आहे का? ज्याला/जिला इंग्लीशमधे प्रेझेंटेशन देता येणं, थोडी माहिती, आजुबाजुचं बोलणं, रेसिपीजचे करुन दाखवणं हे सगळं स्मार्टली करता यायला हवं. थोडक्यात प्रोफेशनल व्यक्ती.

मला प्लीज नाव आणि नंबर हवे आहेत. चार्जेस माहित नाहीत, ते HSE मॅनेजरशी बोलावं लागेल. हे फेब्.साठी आहे, त्यामुळे लवकरात लवकर माहिती हवी आहे.

मी मंचिंगसाठी आळशी खाते त्यात ओवा, तिळ, आल, जिरेपुड, लिंबु आणि काळ मिठ घातल आहे. मस्त चव येते. आळशीने वजन पण कमी होते.

सध्या हे एक माझं पट्टसॅलड झालं आहे. आईसबर्ग लेटस मोठे तुकडे करून, काकडी सोलून मोठे तुकडे करून एकत्र करायचं. यात मग रंगित ढब्बु मिर्च्या कापून घाला, टोमॅटो घाला, संत्र्याचे तुकडे, द्राक्षं, आक्रोडाचे तुकडे, स्ट्रॉबेरीज अर्ध्या कापून असं काहीबाही मिसळायचं. मग त्यात थोडं ऑलिव्ह ऑईल आणि डॉमिनोज पिझ्झ्याबरोबर मिळणारं ओरेगानो सिझनिंग मिक्स करून खायचं. यम्मी!!!! Happy

माझेही दोन शब्द...

एका वाटीत अर्धी वाटी ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यात बारीक केलेला लसूण (शक्य झाल्यास गार्लिक प्रेस मधून काढलेला), अर्ध्या लिंबाचा रस, आवडीप्रमाणे मीठ व मिरपूड घाला. हे सगळे कच्चेच ठेवायचे आहे. वाटी झाकून १५/२० मिनिटे मुरू द्या.
मग आवडीचा ब्रेड घेऊन त्याचे त्रिकोणी तूकडे करा. ते तेल, तूप वा बटर न लावता, गुलाबी रंगावर भाजून घ्या. ते तूकडे वाटीतील मिश्रणात बूडवून खा. एखादा चीजचा क्यूब सोबत घ्या.

ही माझी लाडकी रेसिपी- वन डिश मील म्हणूनही खाता येते.

एक कॅन ब्लॅक बीन्स- लो सोडियम
एक कॅन छोले- भिजत घालून, शिजवून पण घेता येतील
एक वाटीभर पांढरा मका (स्वीट कॉर्न अज्जिबात नको)

हे सारं एकत्र करून मावे मधे फक्त गरम करायचे. शिजवायचे नाही. मग यात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची. आवडीप्रमाणे साल्सा- थोडा जास्तच- घालायचा. थोडे मीठ व भाजलेली जिरेपूड घालायची.

वाटल्यास प्लेटमधे थोडे बेक्ड टॉर्टिया चिप्स पसरून, त्यावर घालून खायची किंवा फॅट फ्री हवी असेल तर चिप्स शिवायही सुरेख लागते. अगदी पोटभरीचे डायेट सॅलड होते.

मला सध्या उकडलेल्या ब्रॉकोलीचं आणि कच्च्या गाजराचे तुकडे करुन रॅन्चमध्ये बुडवून खायचं व्यसन लागलंय. ब्रॉकोली तशीही प्रचंड आवडती असल्याने कधीही चालते.

I was quiet serious about my gaining weight. Suddenly 1 morning I decided to avoid rice and chappati completely. Foe 10 days I was having only cooked veg./ salad and buttermilk. 11 th day I passed blood in toilet. Consulted Dr.She fired and advised for some tablets and THAT was the END of my Diet.
Amen.

घरच्या घरी प्रोटिनशेक : ब्लेंडरमध्ये मूठभर भाजलेले शेंगदाणे (सालासकट घातले तरी चालतील), एक पिकलेलं केळं (किंवा / आणि अंजिर, चिकू, सीताफळ पैकी एखादं फळ), आवडत आणि चालत असेल तर एक कच्चं अंडं फोडून आणि एक कप दूध घालावं. आणि हे छानपैकी ब्लेंड करून प्यावं. फारच यम्मी लागतो. हवा असल्यास थोडा मध घालावा.

दाणे, केळ (किंवा कुठलही फळ) आणि कच्चे अंडे!!! मामी, डेंजर आहात तुम्ही. मला एकदम तुम्ही रॉकी सारख्या सकाळी चार गजराला उठून हा पेशल शेक एक दमात गटकावून पळायला वगैरे निघालेल्या डोळ्यासमोर आलं. Proud
मी अर्ध केळ, दोन स्ट्रॉबेर्‍या, मुठभर ब्लुबेर्‍या, ग्राऊंड फ्लॅक्स सीड्स, थोडे बदाम, थोडे अक्रोड असं टाकून बनवतो.

जोशिबाई, खुपच जोशात सुरवात केलीत! थोडी सावकाश सुरवत करा. Happy

बुवा ..... Proud
प्रोटिनशेक मध्ये अंडं पण अ‍ॅड करून पहा. अंड्याची चव अजिबात येत नाही, वासही येत नाही. कच्चं अंडं पचायला सगळ्यात सोपं असतं.

कच्चं अंड पचायला सोप? आज सकाळ पासून खुपच नवीन ज्ञान मिळतय. मला तर वाटलं होत पचायला सरवात जड असणार कच्च अंड. तुम्ही वाचलं तिथे "गिळायला" च्या ऐवेजी चुकून पचायला नव्हत ना लिहीलेल? Proud
मी घालतो तेच भरपूर होत हो, १२ वाजे पर्यंत भूक लागत नाही. आणि एर्वीच क्च्च अंड वगैरे झेपत नाही.

मामी , तुमचं फोडणीचं ओटमील हिट आहे आमच्याकडे बर्का.
धन्यवाद.

( मी कधी कधी आलं, हि मि, कडिपत्ता अन उडदाची डाळ असं घालते फोडणीत )

बुवा, तुम्ही जर ११ वाजता हा शेक प्यायला तर १२ ला कशी भूक लागणार? आँ? Wink Proud

असो. मी हा शेक जेमतेम दोन महिन्यांतून फारतर एकदा वगैरे चवीकरता पीते. अजून पर्यंत तरी कच्ची अंडी पचवलेत. कच्ची अंडी पचायला सोपी हे मी मागे कुठेतरी वाचलं होतं त्यामुळे तेच गृहित धरलं. आता लेटेस्ट रीसर्च काय सांगतोय? Proud

हो ना मेधा? धन्यवाद. ही ओटमीलची रेस्पी मला माझ्या शेजारणीनं सांगितली होती. तेव्हा पासून आमच्याकडेही हिट्टंच.

अरे वा. या रेस्पीला युनिव्हर्सल अपील आहे की. छान छान.
अ‍ॅक्च्युअली, एकदा ही खाल्ली की चटक लागल्यासारखं ओटमील खाल्लं जातं.

मामी, अहो इथे ८.००-८.३० ला हापिसात पोहोचावे लागते. ११ ला इथे जेवायच्या सुटीला फक्त १च तास उरलेला असतो. Proud (माझे झक्की झालेत आज)

मामींच चविष्ट ओटमील एकदम हिट्ट! पोर "ओट्मील उपमा" ओरपून खातात. खूप खूप धन्यवाद. उद्या "चवीष्ट कॉर्न ग्रीट्स" मामींची रेसिपी वापरून करुन बघणार आहे. अंदाज आहे की..छान लागेल.

झटपट चविष्ट ओट्मील किंवा ग्रीटससाठी ते पाण्यात मायक्रोवेव्हमधे १-२ ठेऊन शिजवुन घ्यावे. त्यात मग चिली फ्लेक्स, मीठ टाकुन गरम गरम ओरपावे Happy पाहिजे असल्यास बटर टाकुन मिक्स करुन खावे.

वजन १० किलो कमी करायला सांगितले आहे . ओटमील हा पर्याय भात अणि पोळ्या साठी योग्य
वाटला . पण ओटमील दूधा बरोबर जात नाही . मग ओटमील खाण्याचा एक सोपा मार्ग सापडला
वजनकाटा थोडा हलायला लागला आहे . आम्बाडी भाजी पण ओटमील घालून
१.२ जुड्या आम्बाडी निवडून ठेवणे ( मेथी , कोथिम्बिर , दुध्या ) चालेल.
२. रोज थोड़ी आम्बाडी चिरून उकलुन घ्या पाणी काढून घ्या
३. ओटमील प्रेशर कुकर मध्ये १ शीटी पर्यंत शिजवून घ्या
४. मेथीची फोडणी करून त्यात ओटमील घाला किंचित गुळ मीठ घाला
रोज थोड़ी आम्बाडी वापरली तर २ जुड्या ५ /६ दिवस पुरतात.
दुध्या अणि ओटमील
दुध्या बारीक़ चिरून ओटमील मध्ये घालणे अणि कुकरची १ शीटी झाल्यानंतर
मेथीची फोडणी देणे.वरतून सेलरी , चिरलेली कोबी घालावी .ही डीश पोटभारिची होते . महत्वाचे
शुगर वाढत नाही अणि वजन कमी होते .रोज सकाळी मी कुकरच्या दोन
भांड्यात वेरिअशन करून ठेवते. मुले अणि नवरा जेवायला बसले की
दूर डीश घेवुन जाते .त्यामुले इतर अन्नावर दृष्टी जात नाही . असे
५ किलो वजन कमी केले आहे . उरलेले दूध अणि फल खाते.

प्रिति बटर घालायचं आणि "पेशल डाएट्चं" म्हणून ओरपायचं Wink

मी शिल्लक राहिलेल्या अंडाकरीत वगैरे ओट्स घालून एखादं मिनिट माय्क्रोवेव्हला शिजवून खाते कधी कधी (डाएट नाही असंच ;)) ती करी पण नुस्तीच उरत नाही आणि साध्या भातापेक्षा थोडं फायबरी पोटात ़जातं. हा प्रकार ज्यांनी मट्ण-पोहे खाल्लेत त्यांना आवडेल Proud

Pages