ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०११

Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राफाचा क्लोन बनवण्यात आलाय. फरक एवढाच की तो उजव्या हाताने खेळतोय आणि आज उजवाही ठरवतोय.
पहिल्या सेटमधला दुसरा गेम : राफाची सर्व्हिस पाहताना वाटत होते की ही फायनल पूर्वीची फायनल तर नाही?

Nadal said: God sent me on earth to show how to play tennis...

.

.

.

.

.

.

Federer: What?...I didn't send anyone !!

Lol Lol Lol

Go Fede Go!!!

आयला.. डेहिड फेररने नदालला सरळ सेटमध्ये हरवलं. Sad एकदम धक्कादायक निकाल. पुन्हा एकदा फेडी नदाल ग्रँडस्लॅम फायनलची संधी गेली. सध्या नियतीला ही फायनल मंजूर नाहीये असं दिसतय. Sad

अरेरे सचिन पाँटिंगवरचा जोक फिरवायला लागतोय का? >>

मी नाही फिरवला बुवा... सापडला कुठेतरी... ढापला आणि टाकला इथे... Wink

नदाल गेला!!!
Go Fede Go.... Happy

हरला नदाल. नेहमीप्रमाणे दुखापत झालेली आहे. कर म्हणावं अजून कोर्टवर मरमर धावाधाव!

तो डोल्गोपोलोव चांगला आहे, पण मागे सुमंगलताई रॉडिकला जे म्हणाल्या, ते आहे तो- चंचल. Proud
मध्येच चांगले शॉट मारत होता, मध्येच अत्यंत वाईट. अपेक्षेप्रमाणे हरला.

आता फेडरर-जोकोविच ही सगळ्यात चांगली मॅच राहिली आहे. बाकी पब्लिक बोर आहे.

नदाल गेला.. Sad
पुन्हा एकदा फेडररचा नदाल ला हारवण्याचा चान्स गेला.

>>तो डोल्गोपोलोव चांगला आहे,
सहमत. मरे ने पहील्या सेट नन्तर गेम बदलला म्हणुन जिन्कला.

>>आता फेडरर-जोकोविच ही सगळ्यात चांगली मॅच राहिली आहे. बाकी पब्लिक बोर आहे.
अजुन एकदा सहमत.

नादालची खेळायची शैली त्याच्या शरिरासाठी पनिशिंग ठरतेय. फेडररचे तसे नाही. तो सहज खेळतो म्हणून ओळीने २७ वेळा ग्रँड स्लॅमच्या सेमी पर्यंत पोचलाय.

नादालची चारही स्लॅम एकाच वेळेला ताब्यात असायची संधी गेली. आता पुन्हा येईल असे वाटत नाही. त्याच्या फिटनेस मुळे.

नादाल पूर्ण फिट नाही हे दिसत होत. पण फेरर चांगलाच खेळला. मरेला तो हरवू शकतो.

अरेरे..मी इथे काही लिहायच्या आधीच राफा बाहेर..! Sad

पराग.. मी बहुतेक क्वार्टरफायनलनंतरच्याच मॅचेस बघतो.. म्हणून इथे लिहीले नव्हते अजुनपर्यंत.. आणी आता राफा बाहेर पडल्यामुळे मयुरेश म्हणतो त्याच्याशी सहमत.. फेडरर सोडुन बाकी सगळ्यांचा खेळ बघण्यात मजा येत नाही.. त्या अँडी मरेचा तर नाहीच नाही..आणी जाकोव्हिक टॅलंटेड आहे पण त्याच्या खेळात एक बेफिकीरपणा जाणवतो... आपण जिंकायचेच किंवा चँपिअनशिप जिंकायचीच अशी इर्षा त्याच्या खेळात कधीच दिसत नाही..(पण दुसर्‍या खेळाडुंची नक्कल करण्यात तो अव्वल आहे.. बेकर व नादालची नक्कल तर हुबेहुब करतो तो..)

आता फक्त एवढेच बघायचे की फेडरर अजुन एकदा इथे जिंकुन (म्हणजे पाच वेळा)..रॉय इमर्सनच्या ६ ऑस्ट्रेलियन चँपिअनशिपच्या रेकॉर्डच्या जवळ जातो की नाही..

वॉझ्नियाकी बाहेर. ना ली फायनल मध्ये.
मी जोकोने केलेली शारापोव्हाची नक्कल पाहिली होती. अगदी हुबेहूब. बाई चिडल्या होत्या. या ऑओ मध्ये तो सलमान खान स्टाइल्(शर्ट उअतरवून) कुणा महिला खेळाडूसोबत कोर्टवर नृत्य करताना दाखविला होता. मॅच चालू असतानाही तो चालणारा खेळ एंजॉय अरत असतो . भर मॅचमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळाला दाद देतो! एक ऑओ आहे त्याच्या नावे.
फेरर की फरेर (विजय अमृतराज) तर छान खेळतोय की.

ली ना... जबरी खेळली... पहिला सेट हारल्यानंतर आणि दुसर्‍या सेट मध्ये पण ५ - ३ मागे असताना जबरदस्त खेळून तिने मॅच खेचून आणली... तिच्यात आणि किम मध्येच फायनल होईल बहुतेक.. वॉझ्नियाकीला प्रचंड दमवलं ली नानी... नुसती क्रॉसकोर्ट हाणत होती...

नदाल गेला... ये ये ये.. फेडेक्स ला अजून एका विजेतेपदाची नक्की संधी...

क्वार्टर आणि सेमीज् लाईन-अप बघायला ऑस्ट्रेलियन ओपनची साईट उघडली तर नदाल हरल्याचीच बातमी !!
हरला तो हरला तो ही स्ट्रेट सेट्स् मधे !! Uhoh

ली ना सही खेळली. मी शेवटचा सेट पाहिला. Happy दुसर्‍या सेटमधे ती मॅचपॉईंट डाऊन होती !!

ललिता.. नदाल आजारी होता.. पण तरीही त्याला वॉकओव्हर द्यायचा नव्हता म्हणून खेळत होता..

फेडेक्स पहिला सेट तर हारलाय.. दुसर्‍या सेट मध्ये गेम ब्रेक झालच होता पण पुढचा गेम ब्रेक केल्यामुळे वाचालाय सध्या तरी..

फेडेक्स हारतोय बहुतेक थेट ३ सेटमध्ये.. डबल्स मध्ये भुपती-पेस त्यांना अजुन न मिळालेल्या ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये Happy

आनंदयात्री तो पाँटिंग सचिन जोक जरा समजावून सांगा हो. फेडररला पण दुखापत ,आजारपण काही होतं की काय?
मला फरेर - जोको फायनल बघायला आवडेल.
किमसमोर चिनी भिंत आहे.

हे तुमचं -
अरेरे सचिन पाँटिंगवरचा जोक फिरवायला लागतोय का?
आणि हे पण??-

आनंदयात्री तो पाँटिंग सचिन जोक जरा समजावून सांगा हो.

मला वाटलं तुम्हाला तो सचिन पाँटिंगचा जोक माहीत आहे...
आपल्याला नाही बुवा माहित तो जोक!!

Go Fede Go... Happy

येस फेडी हॅज गॉन्....गॉन ......गॉन.......
सचिनच्या जागी फेडी चालेल, पण पाँटिंगच्या जागी राफा? दोघांच्या अ‍ॅटिट्युड मध्ये १८० चा फरक आहे.

अरारारा.. फेडरर हरला. तरी मला वाटतंच होतं की जोको हरवेल त्याला म्हणून.
आता प्लीज मर्‍याला हरवा रे कोणीतरी. तो जिंकला तर फार वाईट वाटेल.

५ तरी खेळा! लवकर उठल्याचे सार्थक होईल.>> Lol लालू, मी तर डायरेक्ट सकाळी उठून स्कोर पाहिला. मला वाटले ही मॅच आधी असेल, तर नेमकं त्या महिलांच्या मॅचेस आधी होत्या.

ती ना ली मस्त खेळली. पिछाडीवरून येऊन जिंकली. ग्रॅन्ड्स्लॅमच्या फायनलमध्ये जाणारी ती पहिली चीनी टेनिसपटू आहे. ह्याला म्हणतात 'दिवे लावणे'. आणि आपल्या बाई पहा. छे, छे! तुलनाच करवत नाही.

(सिंडे, घरगुती शेरा Proud ) आता तर नवरा आणि बायको दोघेही घरचेच दिवे लावत बसणार आहेत. बाई पहिल्याच फेरीत हरतात, नवर्‍याला पाकिस्तानच्या वन-डे स्क्वॉड्मधून हाकलून दिले आहे. त्यामुळे तो वर्ल्ड्कपमध्येही नाहीये.

indian express ची आता ब्रायन्स बरोबर लढत असणार आहे ..

Pages