Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडी, पन्ना, सँटी, लालू,
सिंडी, पन्ना, सँटी, लालू, मुकुंद, मयुरेश, रंगासेठ, मयेकर, सिद्धार्थ, राज, हिम्या, सुमंगल ताई, त्रिविक्रम आणि इतर सगळेच टेनीस फॅन्स हजेरी लावा !! आत्तापर्यंत गेल्या युएस ओपनला सर्वात जास्त म्हणजे २०० पोस्टी पडल्या होत्या.. तर यंदा तो रेकॉर्ड मोडूया..
धाग्याबद्दल धन्यवाद. लिंक
धाग्याबद्दल धन्यवाद.
लिंक घ्या- http://www.australianopen.com/en_AU/index.html
आठवणीने धागा काढल्याबद्दल
आठवणीने धागा काढल्याबद्दल धन्यवाद अडमा
adm धागा काढल्याबद्दल आणि
adm धागा काढल्याबद्दल आणि पराग आठवण काढल्याबद्दल
यंदा ऑओ मध्ये इंडियन एक्स्प्रेस - पेस भूपती आपल्या शिरपेचातले मिसिंग फेदर मिळवण्यासाठी एकत्र खेळातायत. आज चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत खेळतील.
आता कोण कोण(दुखापतीमुळे) आधीच गळलेय ते कळेल का? सेरेनाताई फिट झाल्या का?
आलो रे आदमा.. .. धन्स रे हा
आलो रे आदमा.. :).. धन्स रे हा बाफ चालु केल्याबद्दल.. आता जोरदार चर्चा करूयात इथे..
फेडीने डेव्हियांकोला सरळ सेटमध्ये हरवुन कतार ओपन जिंकली आहे. तेव्हा तो फुल फॉर्ममध्ये आणि आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरेल असं दिसतय.
डेव्हियांकोने सेमीजमध्ये नदालला सरळ सेटमध्ये हरवलं होतं.
नवीन वर्ष फेडररला ऑस्ट्रेलिया
नवीन वर्ष फेडररला ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यु.एस. ओपनचे विजेतेपदाचे जावो
यंदा सोमदेवला संधी दिलीय ऐकल्यावर आनंद झाला. त्याला वाव मिळतोय आणि तो त्या संधीचे चीज करो ही प्रार्थना.
आज रॉडिक वि. सोड्याची ब्रिस्बेन मध्ये सुरू असलेला ATP सामना पाहत होतो. रॉडिक जबरदस्त खेळत होता. सोड्याने पहिला सेट जिंकला होता. आत्ता काय झालं ते महिती नाही.
पेस भुपती ऑस्ट्रेलियन
पेस भुपती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र खेळतायत का? हे माहित नव्हतं.. जिंकले पाहिजेत आता...
ऑलिंपीकच्या दृष्टीनेही ते आत्तापासून एकत्र खेळत असतील तर बरं होईल..
सेरेना नाही खेळणारे असं मध्यंतरी वाचलं होतं.. लेटेस्ट खबर माहित नाही पण..
आडम हा धागा काढल्याबद्दल
आडम हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद :). पराग आठवण काढल्याबद्दल धन्यवाद :).
नदाल वि. फेडरर अतिम सामना. २००९चे उट्टे काढण्यासाठी फेडरर विजयी ह्यायला पाहीजे.
कतार ओपनच्या आधी नदाल आजारी होता असे वाचले होते. ऑस्ट्रेलियन ओपन मधे चान्गला खेळणार.
दुसरी फळी - डेव्हियांको, रॉडिक, सोड्या, जोकोविच, मरे, त्सोन्गा आहेच.
सोमदेव कडुन अपेक्शा आहेतच. अशियन गेम्स मधे चान्गला खेळला होता पण सातत्याचा अभाव आहे.
पेस-भुपती जिंकले पाहिजेत.
<<नवीन वर्ष फेडररला
<<नवीन वर्ष फेडररला ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यु.एस. ओपनचे विजेतेपदाचे जावो >>
हे राफाला साकडं घातलंय की काय?:)
>>हे राफाला साकडं घातलंय की
>>हे राफाला साकडं घातलंय की काय?<< अशीच वेळ आणलेला त्याने गतवर्षी
अरेच्चा! ऑस्ट्रेलिया ओपन सुरु
अरेच्चा! ऑस्ट्रेलिया ओपन सुरु देखिल झाले. पराग आठवण करुन दिल्याबद्दल आभार. येथे नक्किच हजेरी लाविन (किंवा लावेन).
<<आडम हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद . पराग आठवण काढल्याबद्दल धन्यवाद .>>
एडिएम म्हणजेच पराग ना?
फेडररचा दुसर्या फेरीत
फेडररचा दुसर्या फेरीत प्रवेश. ६-१,६-१, ६-३ ने जिंकला मॅच.
आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा धूमाकूळ
आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा धूमाकूळ चालू झालेला आहे.. पहिल्याच दिवशी डेवडेंको आणि क्य्वेरेरी बाहेर....
सानिया मुख्य स्पर्धेत आहे पण पहिलाच सामना जस्टीन हेनीनशी... आणि देवबर्मनचा सामना टॉमी रॉब्रेडो बरोबर..
देवबर्मन २ सेट हारलेला आहे.. अर्थात पहिल्या सेट मध्ये टायब्रेकर झाला. आणि दुसरा सेट ६-३ नी हारला आहे.. देवबर्मननी एक सेट जिंकला तरी त्याच्या दृष्टीने ते खूपच भारी असेल..
सोमदेव गेला. सानियाने पहिला
सोमदेव गेला. सानियाने पहिला सेट ७-५ असा घेतला. जस्टिनची सर्व्ह ४ वेळा तर सानियाची ३ वेळा ब्रेक. दुसर्या सेट मध्ये जस्टिन एक ब्रेक घेऊन २-१ अशी पुढे
मिर्झा - हेनीन मॅच टिपीकल
मिर्झा - हेनीन मॅच टिपीकल लेडीज मॅच चालू आहे.. फक्त सर्व्हिस ब्रेक्स.... दुसर्या सेट मध्ये पण तेच चालू आहे..
कालच्या मॅचेस पाहिल्या का
कालच्या मॅचेस पाहिल्या का ?
शारापोव्हा वि तानासुगार्न अत्यंत थकेली मॅच झाली.. !! दोघीही जेमतेम बॉलपर्यंत पोचत होत्या.... शारापोव्हाने सुरुवातच दोन डबाल फॉल्टनी केली..पण नंतर सर्व्हिस बरी करत होती.. सर्व्हिसवरच्या चूक टाळल्या तरच खरं आहे बाईंचं...
वोझनियाकीची मॅच छान झाली.. दोघीही खूप चांगल्या टेक्नीकने खेळत होत्या... बेशिस्त आणि बेजवाबदार फटके बर्यापैकी कमी मारले गेले... वोझनियाकीने मोक्याच्या वेळी पॉईंट्स मिळवत मॅच जिंकली...
रॉडीक ठिक ठाक.. दुसरा आणि तिसरा सेट पाहिला.. तिसरा सेट टिपीकल रॉडीक.. !
आपल्या बाईंनी पहिला सेट जिंकला म्हणे.. !!! बरं झालं हरल्या पण.. तसाही पुढे जाऊन फार काही उजेड पाडला नसता.. हेनीन काहितरी करण्याचे चान्सेस नक्कीच जास्त आहेत..
व्हिनस, फेडरर आपल्या लौकीकास साजेसे..
आज किम वि. साफिना आहे.. साफिना इतकी खाली कशी घसरली ?
सुरू झाली ऑस्ट्रेलिअन ओपन..
सुरू झाली ऑस्ट्रेलिअन ओपन.. बघायला पाहिजे. पराग, तू धागा काढल्यामुळे कळलं मला..
आपल्या बाईंनी पहिला सेट जिंकला म्हणे.. !!! बरं झालं हरल्या पण.. तसाही पुढे जाऊन फार काही उजेड पाडला नसता..
>>
वरचे हिमांशुचे पोस्ट्स वाचताना वाटलं की बाई जिंकल्या की काय चक्क.
पण परागशी सहमत.
बाइ पहिला सेट जिंकल्यावर दमून
बाइ पहिला सेट जिंकल्यावर दमून जातात.. आणि बाकी सेट हरतात... त्यांचं बर्याच वेळा असं होतं... त्या जिंकल्या असत्या तरच आश्चर्य वाटलं असतं..
आपल्या (?) बाइ हारल्या ते
आपल्या (?) बाइ हारल्या ते बरेच झाले. देवबर्मन हम्म, अजुन खुप वेळ आहे ह्या लेवल वर चान्ग्ली कामगिरी करायला.
डेविडेंको कसा काय हरला .
नदालला बाय मिळाला. मार्को डॅनियलने मॅच सोडुन दिली. नदाल ६-०,५-० जिन्कला.
गेला नदाल पुढच्या
गेला नदाल पुढच्या फेरीत..
झ्वोनारेव्हा पण जिंकली...
<<आज किम वि. साफिना आहे..
<<आज किम वि. साफिना आहे.. साफिना इतकी खाली कशी घसरली >>
साफिनाबाईंचे बंधुराज रिटायर झाल्यापासून त्याच टेनिस विसरल्यात. एकही स्लॅम न जिंकता टॉप रँक्ड रहायचा कंटाळा आला त्यांना.
परागा नमस्कार, तुमच्या साठी
परागा नमस्कार,
तुमच्या साठी चांगली बातमी.
नाडाल जिंकल्यास त्याच्या कडे एकाच वेळी चारही स्लॅमची टायटल्स असतील. त्याला ग्रँड स्लॅम नाही पण नाडाल स्लॅम असे यापुढे ओळखले जाईल.
तुमच्यासाठी वाईट बातमी.
असे होणार नाही. .
त्रिविक्रमाक्रा, आपल्य
त्रिविक्रमाक्रा, आपल्य म्हणण्याची आणि आपण उडवीत असलेल्या अफवेची नोंद घेतली आहे:)
ऑस्ट्रेलिया खरेच स्पोर्ट्स (स्पोर्टिंग आहे की नाही माहित नाही) नेशन दिसतेय. पहिल्या फेरीला पण बाकं भरलीत. अॅना अॅह्ह इव्हानोविच आणि अंअ मॅकारोव्हा मधली मॅच पाहिली. अॅनाला पहिल्याच फेरीत इतकं झगडताना पाहून वाईट वाटलं. गेली बिचारी.
साफिना.. नुसतीच घसरली
साफिना.. नुसतीच घसरली नाहीये.. चांगलीच घसरलीये.. किमनी व्हाईट वॉश दिलाय तिला...
बरं झालं हरल्या पण.. तसाही
बरं झालं हरल्या पण.. तसाही पुढे जाऊन फार काही उजेड पाडला नसता.. >>> ते का ? तुम्ही इथे तोंडाची वाफ दडवून काय उजेड पाडताय म्हणे ?
<<साफिना इतकी खाली कशी घसरली
<<साफिना इतकी खाली कशी घसरली >>
पराग, तुला आठवतंय ना मी मागे महिला टेनिसबद्दल काय लिहिलं होतं.. तेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं..
साफिनाचा भाऊ कोण म्हणे? साफिन का?
ते का ? तुम्ही इथे तोंडाची
ते का ? तुम्ही इथे तोंडाची वाफ दडवून काय उजेड पाडताय म्हणे ? >>>>>>> आम्हांला उजेड पाडायला वाफ दवडायची आवश्यकता नाही.. तो अपोआपच पडतो....
वेल, एखादा खेळाडू मला आवडत नसेल तर त्याच्यावर टिका करण्यासाठी मला विंबल्डन जिंकायची गरज नाही.. ! मी खेळाचा एक चाहता म्हणून टीका करू शकतो.. पुढच्यावेळी हा मुद्दा परत काढण्याआधी इथलं हे उत्तर वाच.. म्हणजे टायपायचे आणि तिच ती चर्चा करायचे कष्ट वाचतील..
एखादा खेळाडू आवडत नसेल तर
एखादा खेळाडू आवडत नसेल तर त्याच्या खेळाबद्दल बोला, चर्चा/टिका करा. 'बाई हरल्या ते बरं झालं पुढे काय उजेड पाडणार होत्या' ह्यातनं तुला त्या खेळाडुबद्दल आकस आहे एवढच कळतं. खेळाबद्दल काहीच स्टेटमेंट येत नाही.
वेल, एखादा खेळाडू मला आवडत नसेल तर त्याच्यावर टिका करण्यासाठी मला विंबल्डन जिंकायची गरज नाही.. ! >>> विंबल्डन जिंकायची गरज अजिबात नाही. थोडा फार खेळ कळत असेल तर तेव्हढं पुरेसं आहे एखाद्या खेळाडुच्या "खेळा"बद्दल बोलायला.
माझा मुद्दा पुन्हा काढणारच. कारण सानियाबद्दल पुन्हा पुन्हा असल्याच पोस्ट येत रहातात.
बाई हरल्या ते बरं झालं पुढे
बाई हरल्या ते बरं झालं पुढे काय उजेड पाडणार होत्या >>>> ह्यात मला सानियाच्या "खेळात" उजेड पाडण्याबद्दलच म्हणायचं होतं.. पर्सनल आयुष्यात नक्कीच नाही...
थोडा फार खेळ कळत असेल तर तेव्हढं पुरेसं आहे एखाद्या खेळाडुच्या "खेळा"बद्दल बोलायला. >>> पुन्हा तेच.. खेळ सोडून कश्याबद्दलच कोणी काही बोलत नाहिये.
माझा मुद्दा पुन्हा काढणारच. >>>>> Get well soon..
सिंडरेला अनुमोदन. वर आपली(?)
सिंडरेला अनुमोदन. वर आपली(?) सानिया असाही एक उल्लेख वाचला.
सानिया स्लॅम जिंकेल असे कुणी म्हणणार नाही, पण तिने पुढल्या फेरीत प्रवेश करून रँकिंग सुधारले तरी आनंद आहे. अर्थात मला जस्टिन हरली असती तर जास्त वाईट वाटले असते.
Pages