ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०११

Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण सानियाबद्दल पुन्हा पुन्हा असल्याच पोस्ट येत रहातात.
>>
आज्जे, अगं खेळाडूच तशी आहे तर त्याला कोण काय करणार? Proud

(लकी) ड्रॉ निघून हेनीन बरोबर पहिल्याच राऊंडमध्ये खेळायला मिळालं ह्यात मिर्झाबाईंनी आनंदच मानायला हवा, उगीच तिच्याशी खेळायला मरमर करत फायनल-सेमीफायनल पर्यंत जाण्याची कटकट वाचली.
वर एक सेट जिंकायलाही मिळाला हे म्हणजे मेगामिलिअन्स बक्षीस टॅक्स फ्री झाल्याच्या आनंदाएवढं आहे.

मला अजूनही झिशान अली आठवतो कारण त्याने सँप्रासविरुद्ध एकदा लवगेम केला होता. (त्या मॅच मध्ये फक्त तेवढाच एक गेम तो जिंकला)

२७ वरून १४५ वर घसरली सानिया, २००७ नंतर एकाही स्लँमचा दुसरा राऊंडसुद्धा पार केला नाही की कुठली लोकल टुर्नामेंटही जिंकली नाही. मनगटाच्या दुखापतीनंतरपासून बहूतेक तिच्या खेळात कुठलाच स्पार्क, ग्रेस, चार्म काहीही म्हणा पण काहीच दिसत नाही. अगदी सुधारणा सुद्धा नाही.

चमन.. Happy

हेनीन, वोझनीयाकी फारच किरकोळीत जिंकल्या... त्यांचे आधीचे स्टॅट्स बघता पुढे जाऊन बराच उजेड पाडतील असं वाटतय.. Proud

मार्डी फिशची मॅच चांगली चालू आहे. दुसर्‍या सेटमध्ये रोब्रॅडो चांगला खेळायला लागलाय...

आता रॉडीक आणि व्हर्डास्कोच्या मॅचेस सुरु होतील.. . त्या झाल्या की शारापोव्हा आणि व्हिनस...

फेडेक्सची मॅच जबरी झाली... ५ सेटर.... सिमॉननी आधी झालेल्या प्रत्येक मॅच मध्ये त्याला हरवले होते.. पहिल्यांदाच फेडेक्स जिंकला त्याच्या विरुद्ध... पहिले दोन सेट जिंकल्यानंतर पुढचे दोन हारल्यावर मग फायनल सेट फेडेक्स जिंकला..

व्हर्डास्कोची पण सहीच मॅच... ती पण ५ सेटर. त्यात व्हर्डास्कोनी शेवटचा सेट किरकोळीत जिंकला पण ६-०..

बाकी व्हिनस बाईंना पण घाम गाळावा लागलाच... पहिला सेट हारल्यावर पुढचे दोन सेट जिंकले...

हो.. बघितली फेडररची मॅच सक्काळी सक्काळी.. मस्त झाली एकदम..
सिमॉन पण मस्त खेळला.. ५ मॅच पॉईंट्स वाचवले..
व्हर्डास्कोचे पहिले ३ सेट पाहिले होते काल...
शारापोव्हा गेली पुढे काल..

>>व्हर्डास्कोची पण सहीच मॅच
व्हर्डास्कोची मॅच पाहीली, जिन्कला. पण तिस्परोविच जिन्कायला हवा होता.(हार्ड लक). शेवटचा सेट तर त्याने सोडुन दिला. बहुधा शारिरिक आणि मानसिकरीत्या ४ थ्या सेट्मधेच हारला होता.

फेडेक्सची मॅच नाही पाहिली :(.

फेडेक्सला दुसर्‍या फेरीतच घाम गाळावा लागलाय. पाचव्या सेट पर्यंत मॅच खेळली गेली. सिमॉन का कुणीतरी होता, त्याने भरपूर दमवलय. सहज ड्रॉ कडे पाहिले असता, ४थ्या फेरीत फेडेक्सचा सामना कदाचित मॉनफ्लिस किंवा रॉडिक बरोबर होऊ शकतो आणि सेमी / क्वार्टरफायनल मध्ये वर्डास्को बरोबर सामना होऊ शकतो.

इकडे ठोसुरबाई पण पुढे चालल्यात.

टिपसर्व्हिक्/च ला सीडिंग का नाही? किंवा त्याचे र्रॅकिंग इतके खाली कसे की दुसर्‍याच फेरीत व्हर्डास्कोशी सामना व्हावा? मला पहाय्ला मिळालेल्या सामन्यांत उत्कृष्टच खेळला होता तो.

सकाळी किम क्लायस्टरची मॅच पहात होतो.. सही खेळत होती.. एकदम फॉर्मात.

पण तिस्परोविच जिन्कायला हवा होता....>>> खरच... मस्त खेळत होता काल तो.. त्याने २ की ३ मॅच पॉईंटस गमावले स्वतःच्या सर्व्हिसवर..

४थ्या फेरीत फेडेक्सचा सामना कदाचित मॉनफ्लिस किंवा रॉडिक बरोबर होऊ शकतो... >>>नाही.टॉमी रॉब्रेडो असु शकतो चौथ्या फेरीत फेडीचा प्रतीस्पर्धी. मॉनफ्लिस आणि रॉडिक एकमेकांसमोर येऊ शकतील चौथ्या फेरीत. यातला एक जण फेडीचा उपांत्यपूर्व फेरीचा प्रतीस्पर्धी असु शकतो.उपांत्य फेरीत व्हर्दास्को किंवा बर्डीच किंवा जोकोविच पैकी एखादा असु शकतो.

जर कोणी मोती मधेच गळले नाहीत तर क्वार्टर फायनल्सचे लाइन-अप
राफा वि डेव्हिड फेरर (अरेरे). सिलिच, लोपेझ आणि नालबांडियन पण याच भागात.
सोडर्लंग वि अँडी मरे (इथे त्सोंगा आणि बघदातिस आहेत)
थॉमस बर्डिच वि नोव्हाक डिकोव्हिक (इथे व्हर्डास्को, अल्मेग्रो आहेत).
अँडि रॉडिक वि रॉजर फेडरर.

ड्रॉ निघून हेनीन बरोबर पहिल्याच राऊंडमध्ये खेळायला मिळालं ह्यात मिर्झाबाईंनी आनंदच मानायला हवा, उगीच तिच्याशी खेळायला मरमर करत फायनल-सेमीफायनल पर्यंत जाण्याची कटकट वाचली. >>> Lol

वर एक सेट जिंकायलाही 'मिळाला' >>> Rofl

काही वर्षांपूर्वी तिने सेरिनाविरुध्द ०-१ पिछाडीवर असताना सेट घेतला होता. (बहुतेक ऑस्ट्रेलियन ओपनलाच) त्यावेळी तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं होतं. तेव्हाचे तिच्या चेहर्‍यावरचे भाव अजूनही आठवतात.

सोडर्लंग वि अँडी मरे >>> त्याआधी चौथ्या फेरीत मरेला डेल पोट्रोच्या आव्हानाला सामोरे जावे लागु शकते.. ही मॅचही मस्त होईल जर डेलपोट्रो आता पूर्ण फिट असेल तर.

डेलपोट्रो आणि बगदातीस हे दोघे दुसर्‍या फेरीत समोरासमोर आहेत. आज असेल ती मॅच.

नदाल सहज जिंकला दुसरी फेरी.

ली हेश आणि बोपन्ना कुरेशी पुरुष दुहेरीच्या पुढल्या फेरीत पोचले. ली हेश ना तीन सेट खेळावे लागले. पहिला गमावला. दोन्ही जोड्या एकाच हाफ मध्ये आहेत.

काल किमची मॅच पाहिली.. जोरदार फॉर्ममध्ये दिसत्ये... सहज जिंकली अगदी.
तिस्परोविचची मॅच परवा मधे मधे पहात होतो.. तो सही खेळत होता एकदम.. मला वाटलं नव्हतं तो हरेल म्हणून.. शेवटच्या सेटमध्ये ताकद कमी पडली बहूतेक..
नदालची पण कालची मॅच मस्त झाली...

बगदातीसने डेल पोट्रोला हरवले.. बाकी त्सोंगा,सोड्या,मरे,बर्डीच जिंकले दुसर्‍या फेरीत.

वोझनीयाकी जिंकली एकदाची. फारच पाट्या टाकल्या आज.. सिबुलकोव्हा (?) च्या भरमसाठ चूकांमुळे बरेच पाँईट्स मिळाले..
जोको गेला पुढच्या फेरीत... रॉडीक मागे होता मघाशी..

हेनीन आणि कुझनेत्सोवाची मॅच चांगली चाललीये..

हेनीन हरली.. Sad
काल तिचा आणि कुझेनेत्सोवाचा दुसरा सेट म्हणजे "जी कमी वाईट खेळेल ती जिंकणार" टाईप होता.. दोघींनीही भरपूर चूका केल्या... हेनीनला तिच्या हक्काच्या बॅकहँडनेही साथ दिली नाही...

पोव्हा जिंकली तीन सेटर...

फेडरर पण मधे मधे फार नेटमध्ये मारत होता..

व्हिनसला काय झालं काय माहित.. पाहिल्याच गेमनंतर मॅच सोडली..

व्हिनस हारली?? डेल पोट्रो आणि बगतातिसची मॅच मस्त झाली.
फेडी आणि नदाल, जोकर आणि रॉडिक यांना निदान ४थ्या फेरी पर्यंत तरी काही अडथळा येणार नाही, असं वाटतयं. Happy

चौथ्या फेरीतल्या पुरूषांच्या चार प्रतीस्पर्धी जोड्या:
रॉब्रेडो आणि फेडरर
रॉडीक आणि वॉवरिंका
अल्माग्रो आणि जोकोवीच
बर्डीच आणि व्हर्दास्को
उरलेल्या चार जोड्या उद्या ठरतील.

मरे-लोपेझ ची मॅच खुपच कन्टाळवानी चालु आहे. Sad
लोपेझ खुप चुका करतो आहे. मरे ला काही फारसे करावे लागतच नाही.

ई.एस.पी.न. वर आता एक मतचाचणी घेत आहेत.

कोर्ट वर सगळ्यात छान पदलालित्य कोणाचे आहे
१. जोको
२. गेल मोफीस
३. मरे
४. नदाल

५ वा (वरील सगळे) पर्याय नाहीये. Happy

>>५ वा (वरील सगळे) पर्याय नाहीये.<< Happy

फेडीभाउंना रॉब्रेडोविरुध्दच्या सामन्यासाठी शुभेच्छा. बर्डीच आणी व्हर्डास्को सामनाही मस्त होईल असं वाटतय.

मरेची मॅच पाहिली. अगदीच एकतर्फी..
काल किमची मॅच ठिक झाली.. किमने बरेच नेटमध्ये मारले.. पण जिंकली शेवटी..
ठोसरबाई आणि इसनर हरले काल... इसनर चांगला खेळत होता खरं... खूपच अटीतटीची लढत झाली...
आता पुढच्या फेरीत राफा वि. चिलीच..
पुरुषांच्या चौथ्या फेरीत.. बरेच मानांकित खेळाडू आहेत.. चांगल्या मॅचेस व्हाव्या अशी अपेक्षा आहे.

सहज म्हणून महिलांच्या चौथ्या फेरीचा ड्रॉ पाहिला. तर त्यात अर्ध्या बायका 'वा'कारान्त आडनाव असलेल्या आहेत. शारापोवा, सेवास्तोवा, मकारोवा, ही वा, ती वा..
'अरे देवा' असं झालं मला ते पाहून.. Proud

पुरुषांच्या चौथ्या फेरीपासून मस्त सामने आहेत.

Pages