अनेकदा आपण मित्रमंडळी/ कुटुंबियांसोबत जवळपास बाहेरगावी पिकनिक - देवदर्शन - स्थल दर्शनासाठी किंवा अन्य कार्यक्रमासाठी ट्रीप आखतो. जसजसे प्रवासी सदस्य वाढू लागतात तसतशी मोठ्या वाहनाची गरज भासू लागते.
मग प्रवासी कंपन्यांची किंवा खाजगी (भाड्याने) गाड्या देणार्या व्यावसायिकांची शोधाशोध सुरु होते.
मिनी बस/ तवेरा/ ट्रॅक्स/ इनोव्हा इत्यादीसारख्या गाड्या बुक केल्या जातात.
ठिकाण परिचित असेल असेच नाही. जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन झाल्यास त्याचा सर्वांना फायदाच होईल.
अनुभवी प्रवाशांना इथे आपल्याजवळच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आमंत्रण!
अकु आणि सगळ्यांनीच फार चांगले
अकु आणि सगळ्यांनीच फार चांगले मुद्दे मांडले आहेत.
प्रत्येक वेळी भाडोत्री वाहनाचा नविन अनुभव ठरलेलाच असतो...
१. वा.चा.चा स्वत:च्या कौशल्यावरचा अतिआत्मविश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. घाटात किंवा रात्रीच्या वेळचे Over takingचे किस्से सगळ्यांनाच माहित आहेत. त्या बद्दल वा.चा.ला आधीच समज देऊन ठेवणे.
२. खाजगी भाडोत्री वाहनांना चेकपोस्टवर परमिटचा अडथळा नेहमीच पार करावा लागतो... बहुतेक खाजगी भाडोत्री वाहनधारक हा नियम धाब्यावर बसवून चोकपोस्टवर चिरीमिरी देऊन सुटका करतात... जर तुमची सहल पुर्व नियोजी असेल तर सहलीतील किमान ५०% लोकांच्या नावाने परिमीट जरूर मिळवावे... त्या साठी थोडे पैसे खर्च होतात पण पुढिल त्रास टाळता येतो... (मुंबईतील बॉम्बस्फोट मालिके नंतर विना परवाना गाड्यांतून जाणार्या लोकांना द्राविडी प्राणायम करावा लागला होता.) तसेच परिमिटची वैधता ही २४ तासांची म्हणजेच रात्री १२ नंतर सुरू होते व संपते.
३. भाडोत्री वाहनांचा एका दिवसाचा Avg. साधारण २०० ते २५० किमी. असतो. सोबत वा.चा.चा रात्रीचा भत्ता वेगळा घेतला जातो. Parking Charges, Toll Charges, आगाऊ रक्कम ईत्यादी व्यवहाराच्या गोष्टी तपशीलवार विचारून घ्याव्यात.
४. भाडोत्री वाहन शक्यतो आपल्याच विभागातील पहावे... जेणे करून half returnचे पैसे वाचवता येतील. सुरवातीचे आणि शेवटचे कि.मी. वाहनचालका कडूनच लिहून घ्यावेत...
५. गाडीच्या Condition सोबत, जमल्यास गाडीची कागदपत्र नजरेखालून घालावित.
साधारणतः ज्या वाहतूकदारांचे
साधारणतः ज्या वाहतूकदारांचे व्यवहार नियमानुसार असतात व कागदपत्रे अप्डेट असतात, गाडी कंडीशनमध्ये असते, वाचा चांगला असतो त्यांचे दर जास्त असतात, . आपण दर ठरवताना त्यातल्य्त्यात स्वस्त पाहतो मग त्याची फळे भोगावी लागतात. वरील सन्दर्भात विंज रेडिओ क्लबचे दर १६ रु. किमी आहेत. (बाहेर ६-७ रु. किमी ने गाडी मिळते.)पण ते घेत असलेली काळजी पाहता त्याना तेवढे दर ठेवल्याशिवाय परवडत नाही.(उदा;ड्रायव्हरला एकापेक्शा अधिक वेळा वाहतूक नियमभंगाबद्दल दन्ड झाल्यास त्याला काढून टाकतात वगैरे)
इंद्रधनुष्य.... अगदी व्यवहारी
इंद्रधनुष्य.... अगदी व्यवहारी मुद्दे मांडलेत.
अजून एक : थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही, तुम्ही जर थोडा वेळ गाडीतील एसी चालवून नंतर तो बंद करायला सांगितलात, तरीही चार्ज फुल्ल एसीचा द्यायला लागतो. (उदा : नॉन एसी तवेराचा रेट जर ८ रुपये/ किमी असेल तर एसी तवेराचा रेट ९ रुपये/ किमी असतो.... आपण थोडा वेळ एसी चालू ठेवला तरी ९ रुपये प्रमाणे ३०० किमीचे एका दिवसाचे चार्जेस द्यावे लागतात.)
तसेच आपला १ दिवस व भाडोत्री गाड्यांच्या हिशेबातील १ दिवस ह्यात फरक असतो.
समजा, तुम्ही रात्री ९ वाजता निघालात, मुक्कामाच्या ठिकाणी रात्री १ - २ पर्यंत पोहोचलात, पहाटे ५ - ६ वाजता परत निघून सकाळी १० पर्यंत परत घरी आलात तरीही भाडोत्री वाहनांच्या दृष्टीने ते त्याचे दोन दिवसांचे चार्जेस लावतात. मला अजून हे फारसे झेपलेले नाहीए. पण नुकत्याच केलेल्या एका ट्रीपच्या अनुभवावरून, आणि त्या दरम्यान ३-४ वाहन व्यावसायिकांकडे केलेल्या चौकशीवरून हे सांगत आहे.
अजून एक : तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक एकत्र ग्रुपने बाहेरगावी कॅबने जात असाल व परत येताना प्रत्येकाला आपापल्या घरी अगदी दारात सोडायचे असेल तर तशी कल्पना कॅबवाल्याला आगाऊ देणे उत्तम! अन्यथा निष्कारण त्यावरून वादावादी होते.
K. K . travels चा माझा अनुभव
K. K . travels चा माझा अनुभव बहुतांशी चांगला आहे. गेली १२ वर्षे मी व माझे कुटुंबीय KK नेच पुणे-सहार एअर्पोर्ट वर जा-ये करत आहोत. - कसलाही त्रास अजुनतरी झालेला नाही. अगदी सेफ ड्रायव्हिंग व खात्रीशीर सेवा हे येथे मुदाम सांगावेसे वाटते.
रवि करंदीकर (मस्कत)
पुण्यातून बाहेर एक दोन
पुण्यातून बाहेर एक दोन दिवसाच्या ट्रिप्साठी चांगली सेवा देणारे ट्रावल एजन्ट कोण आहेत?
हल्ली हल्लीच असे ऐकले आहे
हल्ली हल्लीच असे ऐकले आहे गाडी अचानक थांबवण्यासाठी गाडीच्या समोरच्या काचेवर अंडे फेकून मारतात >>>
हो असे एकण्यात आले आहे ! पण माझ्या automotive knowledge प्रमाणे पटत नाहि. ताशी कमीतकमी ५०-६० किमी वेगाने धावणार्या कारच्या windshield वर मारणे सोपे नाहि. शिवाय hoax- slayer वर सापडले. (http://www.hoax-slayer.com/egg-windshield-robbery.shtml) यातील chris चा रिप्लाय जरुर वाचा.
सर्वात महत्वाचे म्हणजे -
सर्वात महत्वाचे म्हणजे - ड्रायवरला वहातुकिचे नियम पाळायला सांगा . थोडा उशीर झाला तरि हरकत नाहि. आणी कमाल speed ८० किमी ताशी जास्तित जास्त (खरेतर ६० च्या पुढे जाउ नये भारतात)
तसेच रात्री बेरात्री
तसेच रात्री बेरात्री भाड्याच्या गाडिने एकटी स्त्री जर प्रवास करणार असेल तर पेहराव ही फार उत्तान किंवा वा चा चे ड्रायव्हिंग वरील लक्ष उडेल असा असु नये..
>>
हे आक्षेपार्ह आहे. आपण कसेही कपडे घातले म्हणून ड्रायव्हरला काहीही करायचा परवाना मिळतो की काय? तसे कपडे घालण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि स्त्रीत्वाचा हा अपमान आणि संकोच आहे. ऑर्थोडॉक्स पद्धतीचे लोकच असे विचार मान्डू शकतात..
बाळू जोशी,
वरील मते कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही तर सावधानता बाळगता यावी म्हणुन लिहीले आहे. क्रुपया त्याला वेगळा रंग देऊ नका.
तुम्हांला असे अनुभव आले नसतील तरी असे बरेच किस्से आमच्या पहाण्यात आहे.
तुम्ही म्हणजे जग नव्हे.
जे पटत नसेल ते सोडुन द्या, पण कोणा बद्द्ल असली हीन मतप्रदर्शन करणे टाळता येईल तर बघा
अजुन एक महत्वाचा मुद्दा,
अजुन एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही राज्याची बॉर्डर क्रॉस करणार असाल तर तशी परवानगी तुम्ही नेत असलेल्या वहानासाठी आहे का आणि ती कागदपत्रे बरोबर अहेत का हे पाहुन घ्यावे. आम्ही बेळगावला नेहेमी जात असल्याने ही चौकशी करावीच लागते दरवेळी.
अरे बापरे गणू. केके चा माझा
अरे बापरे गणू.
केके चा माझा पुर्वीचा अनुभव बरा होता म्हणून लिहिले. पण अता सर्विस बिघडलेली दिसतेय.
धन्यवाद सांगितल्याबद्दल.
बेळगांव ला जाताना नॅशनल
बेळगांव ला जाताना नॅशनल ट्रॅवल चा बॉर्डेर वर पर्मिट नसल्याने खोळंबा होणे हा नेहेमीचा घोळ आहे.
तसेच रात्री बेरात्री
तसेच रात्री बेरात्री भाड्याच्या गाडिने एकटी स्त्री जर प्रवास करणार असेल तर पेहराव ही फार उत्तान किंवा वा चा चे ड्रायव्हिंग वरील लक्ष उडेल असा असु नये..
>>
हे आक्षेपार्ह आहे. आपण कसेही कपडे घातले म्हणून ड्रायव्हरला काहीही करायचा परवाना मिळतो की काय? तसे कपडे घालण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि स्त्रीत्वाचा हा अपमान आणि संकोच आहे. ऑर्थोडॉक्स पद्धतीचे लोकच असे विचार मान्डू शकतात..
बाळू जोशी,
वरील मते कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही तर सावधानता बाळगता यावी म्हणुन लिहीले आहे. क्रुपया त्याला वेगळा रंग देऊ नका.
तुम्हांला असे अनुभव आले नसतील तरी असे बरेच किस्से आमच्या पहाण्यात आहे.
तुम्ही म्हणजे जग नव्हे.
जे पटत नसेल ते सोडुन द्या, पण कोणा बद्द्ल असली हीन मतप्रदर्शन करणे टाळता येईल तर बघा
>>>
धन्यवाद prafullashimpi ...पण ही अशासारखी पोस्ट ही फक्त चर्चेला वेगळे वळण देणे किंवा काडी टाकणे प्रकारात मोडतात..तेव्हा सरळ इग्नोअर करा..मी ही तेच केले..
कारण आपण प्रत्युतर दिले की वणवा पेटलाच म्हणुन समजा ..
गणू, मी कायम ड्रायव्हरला
गणू, मी कायम ड्रायव्हरला कंटाळा येईल इतपत त्याला सांगत असते, ''सावकाश रे बाबा! कसलीही घाई नाहीए आपल्याला!'' (जरी घाई असली तरी.... कारण त्याला जोरात गाडी पळवायला लावणे म्हणजे अपघाताला निमंत्रण!)
एक्स्प्रेसवे ला ताशी ८० किमी वेगाने गाडी जात असते....तेव्हाच काय तो स्पीड जास्त असतो!
मिनोती, गुड पॉईन्ट!
बाजो, मृनिश, प्रफुल्लशिंपी.... कपड्यांचा विषयच वेगळा आहे.... सार्वजनिक ठिकाणी पाळायचे संकेत भाडोत्री वाहनातून प्रवास करतानाही पाळावेत हे सुरक्षेच्या दृष्टीने कधीही श्रेयस्कर! त्यात मतेमतांतरे असू शकतात.
बाजो, पुण्यात माझ्या माहितीत व अनुभवात अजय ट्रॅव्हल्सची सेवा चांगली आहे. एक-दोन अनुभव सोडता त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा माझा अनुभव तरी चांगला आहे. शिवाय बिर्ला आडनावाचे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांच्या मार्फत मी प्रवासासाठी गाडी बुक करते. त्यांचा अनुभवही चांगला आहे. ह्याखेरीज इतर काही चार - पाच छोटे छोटे वाहन व्यावसायिक आहेत. त्यांचा तो साईड बिझनेस आहे.
मिनीबस मी आजतागायत स्वतः बुक केलेली नाहीए, त्यामुळे त्याबद्दल लिहू शकत नाही. कोणाला माहितीत इतर कोणी चांगले ट्रॅव्हलवाले असतील तर लिहा हो!
सँडीज च्या वेबसाईटवर काल त्यांची कार रेंटल व बस रेंटल ही आहे हे वाचले. कोणाला अनुभव आहे का?
तसेच अमा, त्यांची लोहगाव एअरपोर्टला सोडण्यासाठी कॅब सर्व्हिसही आहे हो! पिक अप सर्व्हिस पण आहे. कोणाला त्यांचा पुण्याच्या कॅब सर्व्हिसचा अनुभव असला तर जरूर लिहा.
बरं, कोणाचा स्थानिक सेवेसाठी
बरं, कोणाचा स्थानिक सेवेसाठी (शटलिंग) बस भाड्याने घेण्याचा अनुभव असेल (पी एम टी जशी बसेस एखाद्या कार्यक्रमासाठी भाड्याने देते तसा), तर तो लिहा ना.... त्यासाठी काय करावे लागते, काय दक्षता घ्यायची इत्यादी.
तसेच बाहेरगावी खास करून लग्न-मुंजीसाठी जाताना आजही अनेकजण एस. टी. बुक करतात. त्यासंबंधी माहिती असेल तर तीही द्या इथे.
एस. टी. बुक करायला डिपोझिट
एस. टी. बुक करायला डिपोझिट द्यावे लागते. त्यांच्या बसेसहि जुन्या असतात. खाजगी सेवा त्यापेक्षा बरि आहे. मी पुर्वी ट्रेक घेउन जायचो तेव्हा नेलेल्या आहेत. पण हे १० वर्षापुर्वी . आता माहित नाहि.
एस टीच्या ह्या सेवेस सी सी
एस टीच्या ह्या सेवेस सी सी म्हण्जे कॅजुअल कॉन्ट्रॅक्ट अथवा प्रासंगिक करार म्हणतात्.त्यात भरघोस डिपॉझिट आधी भरावे लागते .बहुधा सर्वच्.शिवाय ते गाडी ज्या डेपोतून निघते तिथून चार्जेस लावतात. माझ्या माहिती नुसार आता एस टीत आठ वर्षांपेक्षा जुन्या गाड्या नाहीत. स्टंडिंग अथवा जादा पॅसेन्जर अलाऊड नसतात. मात्र सरकारी सेवा असल्याने जबाबदारीने दिली जाते. नादुरुस्तीच्या वेळी जवळच्या डेपोतून मदत अथवा बदली गाडी मिळते. स्टाफ जबाबदार असतो. विम्याचे संरक्षण आहे. सर्व सीट्स चे पैसे आगाऊ मिळत असल्याने उत्पन्नाची बाब म्हणून प्राधान्याने गाडी उपल्ब्ध केली जाते.
ओक्के. थँक्स गणू, रॉबिनहूड.
ओक्के. थँक्स गणू, रॉबिनहूड.
रॉबीन आणि गणूला अनुमोदन...
रॉबीन आणि गणूला अनुमोदन... महामंडळाच्या बसेस फक्त एका दिवसाच्या ट्रिप साठीच परवडतात... त्यांचा सगळा कारभार दिवसावर चालतो... तुम्हाला थांबायचे असेल तर जरूर थांबा... मात्र गाडी परत डेपो कडे जाते.
रॉबिन लहानपणी शाळेतून
रॉबिन लहानपणी शाळेतून पिकनिकला न्यायचे त्या एस्टी गाड्यांवर प्रासंगिक करार असे लिहीलेले असे त्याची आठवण झाली. सरकारी गाड्यांचे चालक कंडकटर जास्त जबाबदार व वेल बिहेव्ड असतात. खाजगीत
ते कोणी ही असू शकतात. बॅक ग्राउंड चेक नसतो.
इथे वाचूनच यावेळी पुणे मुम्बई
इथे वाचूनच यावेळी पुणे मुम्बई प्रवसासाठी 'विंग्स रेडिओ कॅब' बूक केली होती. अतिशय उत्तम सर्विस मिळाली.
.
.
प्रासंगिक करार, नैमित्तिक
प्रासंगिक करार, नैमित्तिक करार.. म्हणजे म. रा. प. म.. आठवण झाली.
या गाड्यांना वाहक नसतो (नसायचा).
आणि सहलीला गेलो तर गाडी २/३ दिवस बरोबर असायची. (परत डेपोला गेलेली आठवत नाही).
इंद्रधनुष्य, तुम्ही उल्लेख वर
इंद्रधनुष्य, तुम्ही उल्लेख वर केल्याप्रमाणे हि परमिट ची भानगड काय आहे? आणि ते कोठून मिळवायचे हे सांगाल काय? तसेच भाड्याने गाडी घेताना चार्जेस बाबत काय काळजी घ्यावी तेहि सांगावे, म्हणजे अनेकता कॉन्ट्रॅक्ट मद्ये छुपे चार्जेस असतात ज्याची माहिती आधी नसांगता अचानक पिकनिक मध्ये सांगतात आणि वेळेवर गोची होते. (चार्जेस बाबत कोणती चौकशी करावी??)
मुंबई-पुणे वा याउलट आमचे
मुंबई-पुणे वा याउलट आमचे वा.चा ठरलेले आहेत.ते जरी नसतील तरी त्यांच्या एकदम खात्रीचे वा.चा.देतात.
काही दिवस बाहेरगावी जायचे असेल तर गाडीवाल्यांचे ,कि.मी.वर दर ठरलेले असतात.तसेच त्यांच्या रहाण्याची/ जेवण्याचे पैसे प्रति दिवशी द्यावे लागतात.हॉटेल्समधे वा.चा.च्या रहाण्याची सोय असते,तसेच बर्याच ठिकाणी माफक दरात त्यांना जेवण/चहा मिळतो.
आमचा एक वा.चा.असे पैसे घेऊनही जितके दिवस असतील तितके दिवस आमच्याबरोबरच जेवतो आणि तेही पैसे आम्हीच भरतो.भीड भिकेची बहीण.तेही असो,पण अगदी आमच्या टेबलावरच येतो.त्याचा कंटाळा येतो.ह्या ट्रीपला १-२ वेळा आम्ही त्याला जरा टाळायचा प्रयत्न केला.
सध्या पुणे-मुंबईसारख्या
सध्या पुणे-मुंबईसारख्या अंतरासाठी कोणत्या कॅब चांगल्या आहेत?
गेल्या ३-४ वर्षांत रेडिओ विंग्जचे बेकार अनुभव आले आहेत. स्थानिक प्रवासासाठी. आयत्या वेळी नो शो, गाडी उशीरा येणे वगैरे. बाहेरगावासाठी आता ती कॅब बुक करायला नको वाटते.
ओला व उबर/उबेर कॅबची स्थानिक सर्विस सध्या घेत आहे, परंतु बाहेरगावासाठी त्यांची सर्विस आहे का, हे माहीत नाही.
http://www.getmecab.com अकु
http://www.getmecab.com
अकु हि साईट बघा. आम्ही त्यांची सर्व्हिस घेतली आहे. एकदम डिसेन्ट
अकु, ओला ची आऊटस्टेशन सर्वीस
अकु, ओला ची आऊटस्टेशन सर्वीस आहे. तासाभरात कन्फर्म बुकिंग मिळू शकतं. पण माझ्यामते ओला जरा महाग पडते. उबेर ची अशी सर्वीस आहे का ते पाहायला हवं. नाहीतर मग बाकी टूर ऑपरेटर्स आहेतच.
सर्वसाधारणपणे रु.९/१० लहान गाडीकरता रेट असावा.
धन्यवाद सुजा व योकु! बघते.
धन्यवाद सुजा व योकु! बघते.
Pages