मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.

ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)

या पुस्तकात प्राचीन काळापासून लढाया कशा होतात (का होतात हा विषय वेगळा) व जगातील काही महत्वाची युध्दे घेतली आहेत. अशी युद्धे निवडताना नेत्याचे युद्ध कौशल्य, त्या काळातील राजकारण, महत्त्वाच्या व्यक्ती व त्या युद्धानंतर होणारे समाजव्यवस्थेतील बदल हे मांडले आहे. ह्यात आपल्या बाजीराव व निजाम यांचे पालखेडला झालेले युद्ध आहे ज्याने तत्कालीन राजकारणावर दूरगामी प्रभाव पडला व सत्ता खर्‍या अर्थाने शाहूंकडून पेशव्यांकडे आली.

पार्श्वभूमी:

निझाम्-उल्-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता. निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या. अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या. शाहू महाराज सुटून आल्यावर त्यांनी " जुने मोडू नये नवे करु नये" ही " स्ट्रॅटेजी घेतली होती. त्यांना मोगलांशी लढाया नको होत्या कारण त्यामुळे नवीन गोष्टी प्रस्थापित झाल्या असत्या पण त्याच वेळेस त्यांना बादशहाने तत्वतः मान्य केलेली दक्षिणेतील चौथाई सनद हवी होती. निझामाला स्वतः सुभेदार व्हायचे होते व झालेच तर पुढे मागे स्वतंत्र राजाही व्हायचे होते. त्यामुळे त्याला दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पाय रोवणार्‍या मराठ्यांना हारविणॅ भाग होते हे ओघाने आलेच. ह्या लढाया १७२७ च्या शेवटास ते १७२८ च्या सुरुवाती पर्यंत चालल्या. १७२७ मध्ये शाहूचा सरलश्कर सुलतानजी निंबाळकर हा निझामाला मिळाला. तर कोल्हापुरकर छत्रपती संभाजी (दुसरा) याने निझामास युध्दात मदत केली.

नमनाला घडाभर तेल न ओतता आता मी तो प्यारेग्राफ देतो.

The Palkhed campaign of 1727-28 in which Baji Rao I outgeneralled Nizam-ul-Mulk, is a master piece of strategic mobility. Baji Rao's army was a purely mounted force, armed only with sabre,lance, a bow in some units, and a round shield, there was a spare horse for every two men. The Marathas moved unencumbered by artillery, baggage, or even handguns and defensive armor. They supplied themselves by footing.
Bajo Rao resented the Nizam's rule over the Deccan and feared his diplomacy. And it was he who struck the first blow. In Oct 1727 as soon as the rainy season ended, Baji Rao burst into the territory of the Nizam. The lightly equipped Marathas moved with great rapidity, avoiding the main towns and fortresses living off the country, burning and plundering. They met one reserve as the hands of the Nizam's able lieutenant, Iwas Khan , at the beginning of November, but within a month they had fully recouped and were off again, dashing east, north, west, with sudden changes of direction. The Nizam had mobilized his forces and for a time pursued them, but he was bewildered by the swift and impracticable movements of the enemy and his men became exhausted.
At the end of January the Nizam changed his strategy; he gave up the pursuit of the elusive Maratha forces and instead made direct for his heartland around Poona, which he captured and ravaged. Baji Rao received urgent calls to come back. but with good strategic sense he resisted the call and instead countered the Nizam's move by in turn threatening his capital Aurangabad. Nizam predictably evacuated the Poona district and returned to rescue Aurangabad. Baji Rao had not actually captured the capital, but he had pillaged the neighbouring area. As the Nizam had once again endeavored to catch Baji Rao, the Marathas harried & circled round his forces. The Nizam preserved his army intact, but in March 1728 he gave. The Marathas returned home laden with plunder and by the peace terms some of their territorial claims conceded.

फिल्ड मार्शल माँटगॅमेरी - A CONCISE HISTORY OF WARFARE

बाजीराव युध्दातुन माघार घेऊन जळगावाकडे सरकल्यावर निझामाने पुण्यावर चढाई केली व आजुबाजूचा परिसर ताब्यात घेऊन विध्वंस सुरु केला. त्याला बाजीराव अवघड अजिंठा मार्गाने औरंगाबादवर येईल हे वाटले नाही पण आपल्या पायी चालणार्‍या मावळ्यांनी मुक्काम न घेता अजिंठा पार करून औरगांबादला धडक दिली व दिल्ली दरवाजा ताब्यात घेतला. शहरावर हल्ला झालाच नाही, फक्त हूल ऊठविली गेली. निझाम वापस येताना पेशवा औरंगाबादेतून ऊठून नाशकाकडे निघाला. निझामाने परत पाठलाग सुरु केला. बाजीरावाला कुठे थांबायचे हे आधीच माहीत असल्यामुळे त्याले पालखेड हे नदीकाठचे गाव गाठले. नदीला पल्याड ठेवून भली मोठी छावणी उभी केली. निझाम पाठलाग करत पालखेडला आला व छोट्या मोठ्या लढायांना तोंड फुटले. निझामी सैन्याला नदी पल्याड असल्यामुळे पाणी मिळेनासे झाले. पाण्याला काबूत ठेवून निझामाला बाजीरावाने जेरीस आणले. निझामी सैन्यात महागाई सुरु झाली. पाणी, अन्नावरुन आपापसात भांडणे सुरु झाली व सैन्याचा धीर खचला. अशातच बाजीरावाने दुसरी आघाडी उघडली. पाणी नाही, दोन्हीकडून बाजीराव अशा स्थितीत निझामाला शरण येण्याशिवाय पर्याय राहीला नाही. (अशीच परिस्थिती सदाशिव भाऊने अब्दालीवर आणली होती पण .....)

फलप्राप्ती व नंतरचे राजकारण ( माझे विवचन. हे त्या पुस्तकात नाही)

निझामाने शरणागत येऊन पुढील पाच वर्षासाठी निझाम मराठा युध्द होणार नाही, मराठ्यांना चौथाईचा हक्क व नुकसानभरपाई भरणे असा तह बादशहाकडुन मान्य करुन घेतला. व लढाई संपली.
निझामाने मराठ्यांच्या भयाने त्याची राजधानी औरंगाबादहुन हलवून भागानागर (हैद्राबाद)ला पुढे केली. पुढील काही वर्षे दक्षिणेकडे निझामाकडून शांतता होती. नंतर थोरल्या नानासाहेब पेशव्यांनी निझामाला परत एकदा मात देऊन बाजीरावाचा तह कायम करुन घेतला.

शाहू लढाया न करता प्यादे हलवत होता तर हा तरुण पेशवा खर्‍या अर्थाने मुख्य प्रधान झाला व सूत्रे पुण्याकडे आली. जर या लढाईस भोसलेपणाला जागून शाहू जाता तर कदाचित पेशवाई निर्माण झाली नसती व स्वतः छत्रपतीच युध्दाला जातो म्हणुन सर्व सरदार एकदिलाने पुढे लढू शकले असते. मराठा मंडळ जे राजारामां मुळे अस्तित्वात आले (यावर एक मोठा लेख होऊ शकतो) ते नष्ट करता येऊन एकछत्री अमंल प्रस्थापित करता आला असता. पण शाहु तेवढा धैर्यशाली नव्हता.

नीट विचार करता हे युद्ध ज्या गोष्टीसाठी झाले (दक्षिण सुभा चौथाई हक्क) त्यामुळे मराठे हे खर्‍या अर्थाने दिल्लीकर बादशाहाचे मांडलीक बनले. दिल्लीवर संकट आले तर मराठे धावून जाणार व मराठ्यांची फौज दिल्ली रक्षणासाठी दिल्लीत राहाणार असा करार नंतर परत झाला. म्हणजे ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व नंतर छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई ने अहोरात्र मेहनत घेतली ती शाहुने अशी वाया घालवीली व मराठेशाहीला मांडलीकाचे रुप आणले. यातुनच पुढे दिल्ली रक्षणासाठी पाणिपत घडल्याचे वाचकांचा लक्षात येईल. जर शाहूने चौथाई नाकारुन प्रदेश कब्जा केला असता तर नविन स्वराज्य वाढण्यास मदत झाली असती

विषय: 
प्रकार: 

वा वा केदार शेवटी लिहायला सुरूवात केली तर! हे काहीच माहिती नाही. एकतर एक एक पेशवा म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा एवढेच होते, आणि नंतर काहीच वाचल्याचे आठवत नाही.
मग बाळाजी विश्वनाथ पेशवे हे नक्की कोण होते आणि त्यांच्याकडे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडे अधिकार कोठून आले?

धन्यवाद अमोल. मी आपला तुम्हाला लिहीतो लिहीतो ऐवढेच म्हणत होतो लिहीत काहीच न्हवतो. अरे ह्या लेखाला कारन ठरले दिनेश. त्यांनी लिहीलेल्या जोधा अकबर च्या पोस्ट वर त्यांनी आयती युध्दाचा मुद्दा मांडला होता तेथुन सुरुवात झाली त्यामुळे मला स्वतलाच दिनेशना धन्यवाद द्यावे लागतील.
पेशवे कोण ते अस्तित्वात का आले हे पण एक छोट्या लेखात लगेच लिहीन. Happy

केदार, चालू झाला आहेस तर थांबू नकोस आता. व्युहरचनेबद्दल पण माहिती सांग जमेल तेंव्हा.

सुंदर केदार भाउ..
मॉंटेग्युमेरीसारख्या अभ्यासु माणसाने लिहिलेले पुस्तक वाचायलाच हवे..

ज्यांना मॉंटेग्युमेरी माहिती नाही त्यांच्यासाठी: हा तोच जनरल (आफ्रिकेच्या लढाईच्या वेळी हा फिल्ड मार्शल झाला नव्हता) ज्याने फिल्ड मार्शल रोमेल सारख्या निष्णात लढवैय्याला रणगाडे आणि वाळवंटीय प्रदेशात हारवले (आठवा सुदान, लिबीया मधील लढाया)..

एकदम वेगळ्या विषयावर लेख ... माहितीसाठी धन्स रे.

वेगळ्या विषय. बाजिरावावरच्या ए़का कादंबरी मधे याबद्दल वाचल्याच आठवते आहे (बहुतेक ना स इनामदारानि लिहिलेलि "राऊ"). त्यात पूण्यात कशि अवस्था होति निझाम असताना त्याचे वर्णन होते.

जियो !!! शेवटी तू मनावर घेतलंस तर. तुझं विवेचन (नेहमीप्रमाणे) आवडलं.

  ***
  असेच काही द्यावे घ्यावे
  दिला एकदा ताजा मरवा
  देता घेता त्यात मिसळला
  गंध मनातील त्याहून हिरवा
  - इंदिरा

  आवडेश.
  तुझ्याइतका नाही तरी किंचित किंचित अभ्यास पेशवाई काळाचा केलाय त्यामुळे आपल्यासारखेच किंवा आपल्यापेक्षा वेडे कोणीतरी आहे हे बघून बरे वाटले. Happy

  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  मस्त केदार! तुझा अभ्यास या विषयावर आहेच.. वाचायला आवडतंय! धडाकेबाज सुरुवात केली आहेस.. ती चालू ठेव.. सगळं सगळं लिही.. 'शाहू'पणा करून पुन्हा स्वस्थ बसू नकोस Happy दिवे!

  खुप छान माहीती आहे. अजुन लवकर लवकर वाचायला आवडेल.

  वा छान लिहीलय केदार Happy
  आणखी लिहा Happy

  >>>>> ह्या लढाया १७२७ च्या शेवटास ते १९२८ च्या सुरुवाती पर्यंत चालल्या. १९२७ मध्ये शाहुचा सरलश्कर
  केदार, यातल्या शतकी सालाच्या जागा दुरुस्त करुन घे बघु आधी! Happy
  बाकी विषय आमच्या आवडीचा... जिव्हाळ्याचा, जेवढे लिहाल त्याचे स्वागत हे! Happy

  लगे रहो केदार...... वाचायला आवडतंय खुपच...

  चांगला लेख आहे. अजुन येउ दे!!!!फक्त 'शिवाजी महाराज' असे लिहिल्यास वाचायला बर वाटत.

  "धन्यवाद अमोल. मी आपला तुम्हाला लिहीतो लिहीतो ऐवढेच म्हणत होतो लिहीत काहीच न्हवतो. अरे ह्या लेखाला कारन ठरले दिनेश. त्यांनी लिहीलेल्या जोधा अकबर च्या पोस्ट वर त्यांनी .........................."

  दिनेश यान्चा तो जोधा अक्बरचा लेख कुठे आहे? मी नाही वाचला... त्याची लिन्क द्या प्लीज.

  केदार, मी मायाजालावर शोध घेतला पण मला माँट्गोमेरीचे 'ए हिस्टरी ऑफ वारफेअर' कुठे दिसले नाही. नक्की हेच नाव आहे का?

  सर्वांनां मनापासुन धन्यवाद.
  टन्या पुस्तकाचे नाव देताना मी एक शब्द गाळला होता. आता तो अपडेट केला आहे. त्यांनी चार पाच पुस्तके लिहीली आहेत. ईथे बघ. http://www.spartacus.schoolnet.co.uk/2WWmontgomery.htm

  लिंबु धन्यवाद. दुरुस्ती केली. तसेच पाण्याबद्दलही टाकले कारण पाण्याने लढाई सोपी केली होती.

  सव्या मला युध्दाच्या चढाया द्यायला आवडले असते पण त्या एका दिवसात उपलब्ध करता आल्या नाहीत (माझे बहुतेक पुस्तक देशात आहेत). तसाही मराठेशाही च्या युध्दांत द्स्ताऐवजाचा फार घोळ आहे. सैन्यानी चढाया कशा केल्या हे निदान ८० टक्के लढाईत मांडले गेलेले नाही. या उलट मोगल होते. आजच्या अमेरिकी लोकांसारखे. त्यांचाकडे प्रत्येक गोष्टीचे लेखी दस्ताऐवज आहेत ( म्हणजे चढाई कशी, कोण,कुठे करनार वैगरे). पण मी पुढे नक्कीच प्रयत्न करेन. Happy

  शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत अशी एक लढाई केली होती, ती लढाई पण अशीच ग्रेट आहे.

  जागोमोहन ही ती लिंक. http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=1065380#POS... ( जुन्या मला आवडलेला चित्रपटाच्या बाफवर)
  आणि http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=1065404#POS...

  काशीकी कला जाती, मथुरा मस्जिद होती
  अगर शिवाजी न होते तो सुन्नती होत सबकी
  ----कविराज भुषण.
  केदार अशा शिवछत्रपतींचा उल्लेख एकेरी होणार नाही असे बदल तू लेखात करावेस असे मनापासुन वाटते.

  दुसर्‍या महायुध्दात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाला युध्दात हारविले >> तुला रोमेलला लिहायचेय का रे ? बाकी वेगळा नि मस्त विषय निवडलास

  केदार धन्यवाद. पार्श्वभुमिमधेही एका ठिकाणी (त्यामुळे त्याला दक्षिनेत शिवाजीच्या काळापासुन पाय रोवनार्या मराठ्यांना हारविने भाग होते हे ओघाने आलेच)बदल करावास.

  असामी हो रोमेलच तो. पण तो जनरल होता. मी हिटलर जाणिवपुर्वक लिहीले व पुढे "प्रशाशक" हा शब्द लावला कारन तो एक महान स्टटेजिस्ट होता. त्याचा जनरलला हार म्हणजे त्याचा स्ट्र्टजीला हार दिली म्हणुन हिटलर लिहीले. पण वाक्यरचेन बदल केला आहे.

  चांगल काम करत आहेस.
  फार माहीत नसलेल्या काळातील घटना माहीत होतील तुझ्या ह्या उपक्रमामुळे Happy
  धन्यवाद रे.
  लिहित रहा.
  फार वेळ लावु नकोस.
  .............................................................
  **Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
  expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
  Think about it.**

  मला नीट आठवत नाहि पण रोमेल आणी हिटलर ह्यांच्या strategies मधे बराच फरक होता नि त्यांच्यात फारकत निर्माण झाली होती नि त्यातूनच विषप्रयोग etc झाले होते असे काहि होते.

  'युद्धस्य रम्या: कथा:' युद्धकथा माझा नेहमीचा आवडीचा विषय त्यातल्या त्यात बाजीराव व मराठे यांची युद्धनीती, क्लुप्त्या, तपशिल व एकंदरीत माहिती फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अशी माहिती अजुन मिळाल्यास मजा येइल. असो या मेजवानीबद्दल केदार तुम्हाला शतशा: धन्यवाद.

  शिवाजी महाराज न लिहिल्याने काही बिघडत नाही. उगीच आपले नॉन इश्यू उभे करून इथे रण माजविणार्‍याना संधी देऊ नका. शिवाजी म्हटले तरी लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास आदर आहेच.

  ---------हितगुज दॅट इ़ज....
  पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
  गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

  केदार लेख उत्तम आहे, पण..

  >>निट विचार करता हे युध्द ज्या गोष्टीसाठी झाले (दक्षिन सुभा चोथाई हक्क) त्यामुळे मराठे हे खर्या अर्थाने दिल्लीकर बादशाहाचे मांडलीक बनले.

  हे पटत नाही. बाजीरावाने बादशहाचे मांडलिक व्हायला कोणतेही युद्ध केले नाही. या युद्धामुळे उलट मराठ्यांचा दरारा पुन्हा प्रस्थापित झाला.

  केदार,
  शाहूने सुरुवातीला कदाचित् चौथाई साठी दिल्लीचे वर्चस्व मान्य केले असेल. पैसा पाहिजेच, सुरुवातीला तरी.

  पण नंतर बाजीरावाचा पराक्रम नि कर्तबगारी बघून तरी जरा धैर्य दाखवायला पाहिजे होते. मांडलिकी ऐवजी स्वतःला छत्रपति म्हणून घोषित करून आपल्या मुलुखातील मोंगलांकडे जाणारे पैसे स्वतः घ्यावे नि पुनः आपल्या राज्याचा विस्तार करावा.

  नाही सुचले त्यांना. मोंगलांच्या कडे रहावे लागल्याने बिचार्‍यांना स्वतःच्या बाबा, काका यांच्यासारखे स्वातंत्र्याचे बाळकडू मिळाले नाही. शिवाय त्यांचे तेथे लष्करी शिक्षण झाले नसावे म्हणून ते युद्धावर जात नसावेत.

  कदाचित् बाजीरावाच्या युद्ध प्रणालीत शाहू महाराजांच्या (नि कदाचित् त्यांच्या सर्व बाजारबुणग्यांच्या) संरक्षणात वेळ नि मनुष्यबळ घालवणे शक्य नव्हते. म्हणून बाजीरावानेच नको म्हंटले असेल. (नाहीतर पानिपत कसे होईल याचा आधीच अंदाज आला असता!)

  पण घरबसल्या "सरलश्कर सुलतानजी निंबाळकर हा निझामाला मिळाला. तर कोल्हापुरकर छत्रपती संभाजी (दुसरा) याने निझामास युध्दात मदत केली. " हे उद्योग थांबवण्याचा तरी प्रयत्न केला का? वाटाघाटी करणे? "जरा थांबा, निझामाशी लढाई झाल्यावर पुनः बघू?" इ. सांगून ते थांबवता आले असते.

  असो. बाजीरावानंतर फार थोडे वाचण्यासारखे आहे पेशवाईबद्दल. आणि जे झाले ते वाचून उद्वेग, राग, नि रडू येते. त्यापेक्षा घाशीराम कोतवाल, का कुठले ते नाना फडणविसांबद्दल असलेले नाटक, ते बघायला बरे वाटले असते.

  शाहू महाराज पराक्रमी नव्हते त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही .काहींनी यावरून शाहू बनणे हा वाक्य प्रचारही एका प्रतिक्रियेत वापरला आहे . .ह्या शाहूंचे पालन पोषण औरंगजेबाच्या छावणीत झाले होते त्यांच्या कडून अजून अपेक्षा काय करणार ?

  पण आधी ताराबाई ची बाजू दुबळी करून शाहूला मोठे पेशव्यांनीच केले . नाहीतर हे राज्य आयतेच यांना कसे मिळाले असते ?

  मुघलांबरोबर नमते घ्यायचे धोरण पेशाव्यांचेही होतेच . शेजवलकर यांनी आपल्या पानिपत पुस्तकाच्या प्रस्तावनेत काही मुद्दे मांडले आहेत . त्यामुळे पुण्यात कोणी हे पुस्तक प्रस्तावनेसह छापायला तयार नव्हते . आता राजहंस ने छापले आहे प्रस्तावनेसह .

  Pages