रत्ननगरी "रत्नागिरी" – (६) थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा

Submitted by जिप्सी on 26 December, 2010 - 23:39

=================================================
=================================================
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा), पावस आणि भाट्येच्या समुद्रकिनार्‍याला.
=================================================
थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा)
प्रचि १

प्रचि २
पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी मंदिर
प्रचि ३
आवळीच्या झाडातुन प्रकटलेला "आवळी गणेश" (पावस)
प्रचि ४
भाट्ये खाडी
प्रचि ५
भाट्ये खाडीवरचा पूल
प्रचि ६
भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा समुद्र
प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०
भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारा
प्रचि ११
भाट्येचा समुद्रकिनारा
प्रचि १२

प्रचि १३
भाट्ये समुद्रकिनारी बांधत असलेले पर्यटक निवास
प्रचि १४
हॉटेल कोहिनूर समुद्र
प्रचि १५

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

थिबा पॉइंटला ती बाग करून सगळी मजाच घालवली. हे थिबा पॉइंट म्हणजे कित्येक रत्नागिरीकराच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. कॉलेजात असताना आम्ही लेक्चर्स चुकवून इथेच टवाळक्या करायचो. Happy आणि परीक्षा जवळ आली की तिथेच अभ्यास पण करायचो. आमच्या ग्रूपमधे जमीर नावाचा एक वस्ताद कार्टा होता. त्याची "मैत्रीण" त्याचा पाठलाग करत इथेच यायची (तेव्हा त्याचं प्रेमप्रकरण गोत्यात होतं) तेव्हा हा करवंदाच्या जाळीमगे लपायचा... आणि उगाचच मरत असल्यासारखा किंचाळायचा. आम्ही इतर सर्व जण घाबरल्याची अ‍ॅक्टिंग वगैरे करायचो. शेवटी वैतागून ती यायची बंद झाली एकदाची..

आता लिहिता लिहिता आठवलं Happy माझी आणि सतिशची भेट पहिल्यादा थिबा पॉइंटलाच झाली. (पण त्यावेळेला आमचं प्रेम प्रकरण नव्हतं.) तो डिप्लोमाला होता, आणी मी नववीत किंवा दहावीत होते तेव्हा!!!!

आवळी गणेशाचा फोटो मस्त !!
कृपया हा फोटो वापरण्याची ( कॉपी/ पेस्ट ) परवानगी द्यावी

आपला
अमोल केळकर
----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

धन्यवाद नंदिनी, अमोल, गब्बर Happy

नंदिनी, छान किस्सा Happy

माझी आणि सतिशची भेट पहिल्यादा थिबा पॉइंटलाच झाली. (पण त्यावेळेला आमचं प्रेम प्रकरण नव्हतं.) तो डिप्लोमाला होता, आणी मी नववीत किंवा दहावीत होते तेव्हा!!!!>>>>>> Happy

<< (पण त्यावेळेला आमचं प्रेम प्रकरण नव्हतं.) >> "नजरकैदे"साठीच तर बांधला होता ना ब्रिटीशानी थिबा पॅलेस !! Wink

Pages