पैज/सार्वमत/सर्वेक्षण
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
53
खालीलपैकी कुठले शीर्षक उद्या 'सकाळी' दिसेल ?
१. पुणेकरांना पावसाचा सुखद दिलासा
२. पर्जन्यराजाचे/वळीवाचे पुण्यात (गडगडाटी) आगमन
३. मॉन्सून/वळीव पुण्यात दाखल
त्या बातमीत खालीलपैकी कुठले छायाचित्र असेल ?
१. संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची धावपळ झाली आणि त्यांना मिळेल त्या छपराखाली 'असा' आसरा घ्यावा लागला.
२. कालच्या मुसळधार पावसाने रस्ते चिंब ओले झाले आणि जागोजागी पाण्याची डबकी तयार झाली.
३. 'ये रे ये रे पावसा...' मुलांनी पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
कृपया लवकरात लवकर (पक्षी ती बातमी छापून येण्याआधी) इथे मत नोंदवा.
सर्वात जास्त जुळणारे उत्तर देणार्यांना बक्षीस : हार्मनी विद्यापीठाच्या 'वर्तमानपत्रातील बातमीचे शीर्षक कसे द्यावे' या अभ्यासक्रमाला विनामूल्य प्रवेश.
माध्यम प्रायोजक : कोणीही नाही.
विषय:
प्रकार:
शेअर करा
हेडलाईन
हेडलाईन आहे - 'पाऊस आला !' एवढीच. पहिल्या पानावर तेवढी एकच बातमी आहे, बाकी सर्व जाहिराती... ती बातमीसुद्धा जाहिरातींच्या गर्दीत अक्षरश: कोंबून बसवली आहे. तेव्हा साहजिकच शीर्षक छोटे करावे लागले असणार... असो. तर २ आणि ३ दोन्ही बरोबर

प्रकाशचित्र आहे एक त्रिकोणी कुटुंब वाहन घसरल्यामुळे पावसाच्या पाण्यात पडले आहे याचे... हे २ च्या जवळ जाते...
तेव्हा पूनम व केदार दोघांना बदललेले बक्षीस - आरती विद्यापिठाच्या 'जाहिरातींमध्ये बातमी कोंबून कशी बसवावी ?' या अभ्यासक्रमाला विनामूल्य प्रवेश.
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
आरती
आरती विद्यापीठ..
सपशेल चुक सार्यांचे अंदाज. भलेमोठे शीर्षक येऊ नये, अन कुणालाच बक्षिस मिळू नये, म्हणून मीच ढीगाने जाहिराती पाठविल्या त्या टुडेच्या पानावर.
अरे, ते टुडे म्हणजे जाहिरातींसाठीच काढले आहे रे. मंदीच्या काळातही सकाळ्च्या जाहिरातींचा रेव्हेन्यू कमी झाला नाही हे विशेष.
टाईम्स ऑफ इंडिया बघता का? जाहिरातींसाठी दोन दोन फ्रंट पेजेस काढतात ते. शिवाय इनोव्हेटिव्ह पोझिशन्सचा सुळसूळाट. शिवाय 'पेड एडिटोरियल' हा अतिशय वाईट अन खालावलेला प्रकार सुरू केला आहे त्यांनी.
सकाळ मध्ये अजून हे सारे वाईट प्रकार यायचेच आहेत. तो पर्यंत वाचायला हरकत नाही.
सध्या
सध्या जाहिराती येत आहेत यातच धन्यता माना भाऊ. हाफ पेज जाहिराती आल्या की सुटकेचा श्वास सोडतात मार्केटींगवाले सध्या! मध्ये एक 'इनोव्हेटिव्ह' जाहिरात आली होती पाहिली? पहिल्या पानावर सहाच इंचाचं पान होतं, जे मागच्या पानाशी जोडलेलं होतं. आम्ही दाद दिली त्या जाहिरातीला, पण जुन्याजाणत्या वाचकांना नाही आवडत असे अभिनव प्रयोग
असो. विषयांतराबद्दल क्षमस्व स्लार्ती. आणि बक्षिसाबद्दल धन्यवाद.
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
ह्म्म्म्म..
ह्म्म्म्म... तशा अभिनव जाहिराती मला आवडतात. पण आज म्हणजे अक्षरशः जाहिरातींच्या पानावर बातमी बसवलेली आहे असेच वाटत आहे. जाहिरातकला ही पासष्टावी कला आहे असे म्हणतात ते मात्र पटते.
साजिरा, पेड एडिटोरिअल म्हणजे नक्की काय असते ?
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
स्लार्टी,
स्लार्टी, तुझ्या बीबीवर विषयांतर.
पण तरीही-
संपादकीय विभाग अन जाहिरात विभाग वेगवेगळे असतात.
). आता जाहिरातींनी किती जागा व्यापावी, हे धोरण प्रत्येकाचे ठरलेले असते. (अगदी एलेव्हन्थ अवरला जाहिरात पाठवताना पान १ / ३ वगैरे वर 'जागा आहे का?' असे आधी विचारावे लागायचे. त्यावर 'जाहिराती अर्ध्या पानाच्या वर चालल्यात, जागा नाही.' असे ऐकावे लागायचे. आता 'सिटी पुलआऊट' म्हणजे 'टुडे' चालू झाल्यापासून तसे फारसे ऐकावे लागत नाही..! हे धोरण हळूहळू अधिक व्यावसायिक होत चालल्याचीच जुन्या वाचकांची तक्रार असते.)
जाहिरात विभाग प्रत्येक पानाचे 'पेजिनेशन' आधी करतो. म्हणजे त्यादिवशीसाठी त्या त्या पानावर आलेल्या जाहिराती साईझ प्रमाणे लावून ते पान जाहिरात विभाग 'संपादकीय विभागाकडे पाठवतो. मग उरलेल्या जागेत बातम्या / लेख 'बसवले' जातात. (बातम्यांच्या आधी जाहिराती लागतात, मग उरलेल्या जागेत बातम्या, हे ऐकून बर्याच जुन्याजाणत्यांना धक्का बसतो. पण त्याला काही इलाज नसतो.
असो.
जाहिराती या नेहेमी 'पेड' असतात, फुकट नसतात; आणि बातम्या ह्या लोकांच्या भल्यासाठी, माहिती मिळण्यासाठी वगैरे, अन अर्थातच मोफत छापायच्या असतात. प्रत्येक बातमी आल्यानंतर यात कुणाचा 'पर्सनल इंटरेस्ट' आहे का, एखाद्याच्या धंद्याचे / धंदेवाईकाचे नाव, पत्ता, फोन नं. वगैरे नाही ना, हे बारकाईने बघितले जाते.
आता मी माझ्या धंद्याची पैसे देऊन जाहिरात करून जेवढा फायदा होईल, त्याच्या कित्येक पट फायदा मला- सकाळमध्ये माझे नाव, माझ्या धंद्याची माहिती आली तर होईल. कारण सरळ आहे. जाहिरातींपेक्षा बातम्यांची रीडरशिप कित्येक पटीने जास्त असते. त्यात पुन्हा सकाळसारख्या वृत्तपत्राने छपलेली बातमी प्रचंड गांभीर्याने घेतली जाते. त्यामुळे एखाद्याने कोट्यवधी रुपये दिले, अन सकाळला सांगितले, की माझी ही माहिती 'एक बातमी' म्हणून छापा, तर त्याला नकार मिळाला पाहिजे.
लोकांच्या या विश्वासाचा फायदा प्रकाशनाने घ्यायचा ठरवला, तर ते नैतिक, की अनैतिक? याची उत्तरे अनेक मिळतील, परंतू धंदा मिळवण्यासाठी / वाढवण्यासाठी 'माफक' फायदा घेतला पाहिजे असा विचार करणारीही वृत्तपत्रे आहेतच. मग सुरू होते 'पेड एडिटोरियल', म्हणजे 'विकतचे संपादकीय / बातमी'. म्हणजे सरळ सरळ व्यवहार. 'गिव्ह अँड टेकचा'. टाईमसच्या वेगवेगळ्या पानांचे / फीचर्सचे 'पेड एडिटिरियल्स' चे चक्क 'रेटकार्डे' आहेत. आता बोला!!
या 'पेड एडिटोरियल्स' चेही बरेच प्रकार आहेत. त्याबद्दलही लिहायला हवे. पूनम, तुला काही माहिती यावर?
(अरे, हा चक्क 'नवीन धागा' होऊ शकेल. लिहायलाच हवे खरेच. बैजवार.)
खरंच, बरंच
खरंच, बरंच काही लिहिता येईल यावर..

पण या बातम्यात कोणाला रस असेल?
मुळात एखादे वृत्तपत्र चालते कसे हेच सुशिक्षितांतल्या सुशिक्षितांना देखील माहित नसते
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
या
या बातम्यात कोणाला रस असेल?>>
हम्म. खरे आहे. पण पेपर घेतला, की शब्द न शब्द वाचून काढणारे लोक आहेतच. टाईम्समधले लाईफस्टाईल, ड्रीम होम्स, क्लासिक इंटेरियर्स, टाईम्स प्रॉपर्टी इ. मधले आपण अतिशय गांभीर्याने वाचत असलेले आर्टिकल चक्क 'स्पॉन्सर्ड' आहे, पैसे घेऊन छापले गेले आहे, हे आपल्या गावीही नसते!
काही 'पेड एडिटोरियल्स' मधून 'माहिती' मिळत असेल, तर काय हरकत आहे छापायला? असा दावा काही अंशी खरा असतो. दोन उदाहरणे घेऊ या.
१) दर गुरूवारी सकाळमध्ये 'हेल्थमंत्र' नावाची पुरवणी येते. यात हेल्थ-ब्युटी संदर्भातल्या उत्पादनांच्या जाहिराती अपेक्षित आहेत. ज्यांना ६, १२, २५, किंवा वर्षभर जाहिराती हव्या आहेत, त्यांना डिस्काऊंट स्कीम्सही आहेत. त्याशिवाय 'राईटअप सपोर्ट' किंवा 'फ्री एडिटोरियल' सपोर्टही आहे. समजा माया परांजपेंची ब्युटिक ही संस्था माझी क्लायंट आहे. ब्युटिकच्या कॉस्मेटिक विभागाची २-३ डझनांच्या वर उत्पादने आहेत. आता ६ बाय ८ सेमी इतक्या छोट्या जाहिरातीत त्या उत्पादनाचा फोटो, नाव, एखादी पंचलाईन एवढेच बसू शकते. मग हे उत्पादन कसे वापरावे, व इतर माहिती त्याच पानावर साधारण ६ बाय ८ सेमी च्या बातमी / आर्टिकल मध्ये लिहिली जाते. आम्ही वर्षाला २० लाखांच्या जाहिराती देत असू, तर हा सपोर्ट आम्हाला मिळायला हवा, असे क्लायंटचे म्हणणे असते, आणि ते मान्यही केले जाते.
आता हे असले कोण वाचेल, असे आपल्याला वाटते. पण खाली 'माया परांजपे' हे नाव वाचून काय लिहिले आहे ते उत्सुकतेने वाचणारे अनेक स्त्री-वाचक आहेत. (साप्ताहिक सकाळ किंवा लोकप्रभा मधला 'मायेचा सल्ला' वाचता का? बातमी / आर्टिकल आहे, असे भासवून केलेली (खर्चिक) जाहिरात!) जाहिरात बघून नाही, पण ही माहिती वाचून ती उत्पादने खपल्याची अनंत उदाहरणे आहेत. मग काय.. अधिक माहिती मिळाल्यामुळे वाचक खुष. उत्पादन खपल्यामुळे क्लायंट खुष. रेव्हेन्यू मिळाल्यामुळे प्रकाशन खुष. असा सारा 'गिव्ह अँड टेक'चा मामला..!!
२) तीच गोष्ट 'एज्यूमंत्र' ची. एखादी अॅनिमेशन शिकविणारी संस्था वर्षभर जाहिराती करते. अन त्याच संस्थेचा डायरेक्टर 'अॅनिमेशन फील्ड' मधले भविष्य / करिअर' या विषयावर लेख लिहून पाठवतो. जाहिरात असलेल्याच पानावर ते छापले जातात. यातून विद्यार्थ्यांना 'अधिक' माहिती मिळते, हे तर खरेच. अन त्या संस्थेत मग जास्त संख्येने अॅडमिशन्स होतात, हे त्याहूनही खरे!
(असो. आता आवरते घ्यावे. बार्टफास्ट 'पेड शिव्या' कुठे मिळतात का, ते शोधत असेल.
)
पेड
पेड शिव्या>>>:हाहा:

अरे, हे सगळं तुझ्या रंगीबेरंगीवर हलव की.. नाहीतरी तिथे काय लिहायचं हे तुला कळत नाहीच एरवी
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
हो
हो रंगीबेरंगीवर बरोबर आहे. लिहितोच तिथं सगळं व्यवस्थित पहिल्यापासून.
साजिरा,
साजिरा, धन्यवाद. हे इथे राहिले तरी काहीच प्रश्न नाही, उलट छानच. पण याचे सविस्तर, बैजवार रंगीबेरंगी अवश्य करावेस. पूनम म्हणते तसे वर्तमानपत्राची ही बाजू फार थोड्यांना माहिती असते. ते वाचायला नक्कीच आवडेल.
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
साजिरा-
साजिरा- खरंच लिही व्यवस्थित. ज्ञानात भर पडते आहे.
या
या बातम्यात कोणाला रस असेल?>>>
असेल असेल. अनेकांना असेल. शेवटी इन्साईड बातमीला नेहेमीच डिमांड असतो.
हे काय
हे काय आजचे नाही! खूप पूर्वी पुण्यातील क्षुधाशान्तीगृहान्बद्दल (म्हणजे हॉटेल्स हो) लेखमाला आली होती! त्या त्या हॉटेलबद्दल लेख छापायचा तर काही एक मोबदला द्यावा लागे
वीणा पाटील की कोणश्याश्या आहेत ना? सहली आयोजित करणारे? केसरी की राजा ट्रॅव्हल्स? त्यान्चे लेख अन जाहिराती दर रविवारी लोकसत्तेत येतात! वेगवेगळ्या देशान्ची चान्गली माहिती असते त्यात!
वाईट येवढेच वाटते, की ज्यावेळेस वृत्तपत्रिय कागदासाठी कोटा सिस्टीम होती, त्यावेळेस, पुण्यातल्या तरुणभारत सारख्या वृत्तपत्राचे "ठरवुन" खच्चीकरण केले गेले!
आता कागद मुबलक झालाय, तर पब्लिकला येडे बनवुन की समजुन हा धन्दा सुरू झाला आहे! असो
हे होणारच होत!
फक्त त्या त्या वृत्तपत्राची ओळख म्हणजे पहिले पान, पहिली हेडलाईन, हे या धबडग्यात इतिहासजमा होऊ लागले आहे! सन्माननीय अपवाद आहेतच! पण ते विरळे!
अरे
अरे वा!!
साजिरा, तु तुझ्या रंगीबेरंगीवर लिही. मी पण तिथे माझी मते मांडेन.
याअमधे शिव्या खाणारे आम्ही असतोच ना.. पी आर वाले.
पेड एडिटोरिअल हा प्रकार टाईम्सवाल्यानी आणला. तसेच पेज थ्री हा सुद्धा. तिथे फोटो छापायचा असेल तर कमीतकमी करोड रूपये लागतात. (अणि याचे सुद्धारेटकार्ड आहे :))
--------------
नंदिनी
--------------
ईईईईईईईईई
ईईईईईईईईईई त्या भयाण बायका आपले फोटो छापायला पैसे देतात?
हो. वाटेल
हो. वाटेल तेवढे पैसे देतात.
पेज थ्रीवर उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यांचे फोटो असतात. पार्टीतून विविध हेतू साध्य करून घेणार्या कंपन्यांसारखंच, या छापल्या गेलेल्या फोटोमधूनही विविध हेतू साध्य करून घेतले जातात, या सो-कॉल्ड-सेलेब्रिटीजकडून. त्यावरून सोशल स्टेटसही ठरते, ते वेगळेच.
पुण्यात सौरभ गाडगीळ (पुनागाडगीळ कुटूंब), विश्वनाथ कदम, अर्चना किर्लोस्कर, सुलज्जा फिरोदिया, रांका, सायरस व इतर पुनावाला, मीरा कलमाडी, नंदू नाटेकर, अविनाश भोसल्यांची मुले असे अनंत लोक या अशा पेज थ्री, पार्ट्या अन समारंभांतून आपले अस्तित्व धगधगते राहील, सारखे लोकांसमोर येईल, अन त्याचा फायदा आपल्या उद्योग-व्यवसाय, राजकारण इ.ला मदत होईल- याची व्यवस्थित काळजी घेतात.
लिंबूदादा, केसरीच्या वीणा पाटलांनी जाहिरातीचा हा अभिनव फॉर्म मराठी वृत्तपत्रांत चालू केला. त्याआधीही असे प्रकार होत होतेच. परंतू कमी प्रमाणात. वाचकांना माहिती देऊन 'गुडविल' कमवायचे, की धंदा, अन पैसे आपोआपच चालत येणार, हा सरळ हिशेब. हा लेख-कम-कॉलम-कम-जाहिरात वर्तमानपत्राच्या मुळ फॉटचाच प्रकार अन साईझ वापरून केला जातो. हे संपादकीय आर्टिकल आहे, असे भासविण्यासाठी. पण अशा लेखांच्या सर्वात खाली कोपर्यात advt असे बारीक अक्षरांत छापण्याचे बंधन आधी होते. जेणेकरून त्या लेखातली मते व विषयांशी वर्तमानपत्राचे धोरण जोडले जाऊ नये. आताही मराठी वृत्तपत्रांत असे advt दिसते कोपर्यात. पण एकूणच फारसे सोवळे-ओवळे पाळले जात नाही आजकाल त्याबद्दल.
पुण्यातल्या वेज रेस्टॉरंट्सना जाहिरातीची गरज नसते. संध्याकाळ झाली, की लोकच वाट बघत, नंबर यायची वाट बघत दाराशी उभे राहतात.
त्यामुळे हा क्लास जाहिरातींमध्ये ओढण्यासाठी आक्रमक प्रकाशनांनी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. जाहिरातींमध्ये भरम्साठ स्कीम्स अन डिस्काऊंट्स तर दिलेच, शिवाय, स्पेशल थाली व डिशेस, हॉटेलमधले नम्र व प्रसन्न वातावरण.. इ. ची माहिती लेखांमधून छापायला सुरूवात केली. आता, खवैय्याला काय घेणे आहे, ही माहिती कुठून अन कशी मिळाली ते? अमूक पेपरमध्ये तुमच्या या डिशबद्दल वाचले, असे जेव्हा तो हॉटेल्मालकाला सांगायला जातो, तेव्हा तो मालकही, 'हा, हा. इतके पैसे खर्च केले होते बघा, त्या आर्टिकलसाठी!' अशी फुशारकी मारून सांगतो.
जाहिरात हा माहितीचा अविभाज्य भाग होऊ लागला आहे. जाहिरातीच्या या बदलत्या फॉर्म्सबद्दल त्या करणार्यांची तक्रार नाही, वाचणार्या-बघणार्यांचीही नाही. छापणार्यांनीच का करावी मग?
कुणी कुठपर्यंत मजल मारावी, अँड अॅट व्हाट कॉस्ट, एवढाच फक्त प्रश्न. पण तो 'एवढाच' नाही. त्यावर रणकंदनही होऊ शकेल.
पेज थ्री
पेज थ्री आणि त्यात फोटो यायला Delhi Timesमध्ये सुरुवात झाली. सबिना सहगल सैकिया ही त्यावेळी संपादक होती. तिनेच 'पेज थ्री'ची संकल्पना रुजवली. पुढे Sunday Timesसुद्धा तिने बदलला. भारतातली सर्वोत्कृष्ट food critic होती ती. २६/११च्या हल्ल्यात हॉटेल ताजमध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्याबद्दल लिहायचं आहे मला कधीतरी.
आम्ही जे
आम्ही जे काम करतो. पी आरचे... त्यामधे सुद्धा क्लायंटला "पैसे महत्वाचे असतात" मग त्या न्युज क्लिपिंगची त्या पेपरात जाहिरात दिली असती तर किती पैसे लागले असते हे मोजावे लागतं.
मागच्या आयपीएलला मी १७०००+ क्लिपिंग्जचा अभ्यास करून आणि असे मोजून किंमत कढली होती. फक्र ४५० कोटी रूपये.
साजिरा यावर एकदा सविस्तर लिही. मग मीपण लिहिन.
--------------
नंदिनी
--------------
बापरे पेड
बापरे पेड अॅडीटोरीअल्स असाही प्रकार असतो माहीत नव्हते.मराठी वर्तमानपत्रात अशी संपादकीय असतात का??शिवाय टाईम्समधे अशी एडीटोरीअल्स ची उदाहरणे कोणती??
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|
या
या सगळ्याची खरंच कल्पना नव्हती.
साजिरा, पूनम, नंदिनी, खरंच सविस्तर लिहा - ज्ञानात भर तेवढीच.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
अगदी..
अगदी.. काहीच कल्पना नाहीये या प्रकाराची!
सगळे संबंधित लोकहो, लिहायला लागा!
www.bhagyashree.co.cc
सहीच
सहीच चांगली चाल्लेय चर्चा.. ऐकलय बरंच ह्याविषयी वाचायला नक्कीच आवडेल.
चिन्मय २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या वेळी सबिना सहगल सैकिया बद्दल वाचलं होतं की ती पत्रकारितेमध्ये आहे खूप आवडेल तिच्याबद्दल खोलात वाचायला आणि तू लिहीणार म्हणजे मेजवानी असणारच!
नक्की नक्की लिही.
चांगली
चांगली चर्चा चालू आहे.. नवीन माहिती बरीच मिळाली... अजून येवू द्या
Pages