होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत लहान मुलांची खोली रंगवायची असेल तर 'आकांक्षा' या NGO ची गुणी मुलं घरी येऊन सुरेख काम करून देतात. माझ्या मैत्रिणीने संपूर्ण विमानतळाचा देखावा तिच्या मुलांच्या खोलीत काढून घेतला आहे. आकांक्षा चा नंबर नेटवर मिळेल.

तसंच नेरोलॅक पेंटवालेही लहान मुलांची खोली थीमप्रमाणे रंगवून, चित्र काढून देतात.

चिऊ, अगं एशियन पेंटचे लोक येवुन हवी ती थीम पेंट करुन देतात. माझ्या शेजारणीने मुलीच्या रुममधे पर्‍या, फुलपाखरं, झाडं, मधेच पॉवर पफ गर्ल्स असं काय काय करुन घेतलं आहे. मुलाच्या रुममधे पण स्पायडरमॅन, पोकेमॉन, असले कुठले कुठले मॅन हजर आहेत. थांब, तुला मी उद्या त्यांचा नंबर देते. ते मस्त catalogue घेवुन येतात. भरपुर आयडियाज असतात. मोठ्यांसाठी पण काय भारी सजवतात रुम्स. भेटुन तर घे. Happy

अगं नेरोलॅक वालेही करतच असतील. स्पर्धक कंपनीज आहेत. ते काय एकमेकांशी जमेल तिथे स्पर्धा करणारच. Happy

roller blinds बद्दल माहिती हवी आहे
बांबू आणि फॅब्रिक पासून बनवलेले अशा दोन्ही प्रकारात, एका शो फ्लॅट मधे बघितले होते.
पुण्यामधे कुठे मिळतील ?

माझ्याकडे फॅब्रिक वाले आहेत. बांबुपेक्षा महाग पडतात पण धुता येतात. अधिक चांगलेही वाटतात.
पुण्यात होम डेकोरच्या कुठल्याही दुकानात मिळायला हवेत.

हा धागा का बंद पडलाय ?
घरात नूतनीकरण संदर्भात काही काम काढायचं म्हणजे अगदी भंजाळायला होतं
बेडरूम मधे वॉर्ड्रोब बनवायचाय. बांधकामातच भिंतीत कोनडा आहे (जमिनीपासून छतापर्यन्त ) म्हणजे ९ फूट उंच ८ फूट रुंद आणि २ फूट खोल
आता या जागेत पूर्ण लाकडी कपाट केले तर बरेच महाग पडते .......याला दुसरा पर्याय काय.......म्हणजे क्लोजेट मधे wired shelving करतात तसं करता येतं का .......ही shelves ....म्हणजे फ्रीझ मधे पार्टीशन असतात त्या क्वालिटीचं हवं....पुण्यात कोण करून देईल

आता या जागेत पूर्ण लाकडी कपाट केले तर बरेच महाग पडते .......याला दुसरा पर्याय काय....... >>>
लोखंडी किंवा गोदरेजची कपाटे (साईझ बघून घ्यावी लागतील) घेऊन त्या जागी ठेवायची. दोन बसत असतील मध्ये लाकडी पार्टीशन घालायचे. बाहेरून लाकडाची दारे करून घ्यायची एकदम ढिनचॅक. दिसताना असे दिसेल की लाकडी वॉर्डरोब बनवला आहे. पण उघडल्यावरच समजेल की आत सेपरेट कपाटे आहेत. किंवा कपाट एकच ठेवायचे व उरलेल्या अर्ध्या भागात अ‍ॅक्च्युअल लाकडी वॉर्डरोब. बजेट असेल त्या प्रमाणे.

एका परिचितांच्या घरी ही रचना पाहिली होती. ते जुन्या घरातोन नव्या घरी शिफ्ट झाले तेव्हा घरातली जुनी २ लोखंडी कपाटे डिस्कार्ड न करता त्यांनी ही योजना केली होती व मला आवडली. त्याचप्रमाणे लाकडी वॉर्डरोब मध्ये पैसे, जडजवाहीर ठेवायला लॉकर हा प्रकार जनरली नसतो. असला तरी लाकडी असल्याने सेफ वाटत नाही. अन्यथा गोदरेज चे लोकंडी सेफ मिळतात ते सेपरेट घेऊन लाकडी फर्निचर मध्ये फिट करून घ्यावे लागते. त्या अनुषंगानेही वरील योजना मला बेस्ट वाटते.

क्लोजेट डिझाइन्स असं गुगल सर्च कर.
८ फुटांमधले ४ फूट, जमिनीपासून ५ फुटांपर्यंत नुसते ड्रॉवर्सचं युनिट करून घे. त्यावर एका कोपर्‍यात सेफ ठेवायला जागा ठेव आणि सेफच्या पुढे हँगरवरचे कपडे राहतील असं बघ.
संपूर्ण रूंदीत एक हँगरसाठी दांडी करून घे.
या सगळ्याला बाहेरून स्लायडींग दरवाजा करून घे. त्यावर आरसा बसव.
सध्या सुरूवात इथून मग लागेल तसं बॉक्सेस/ ड्रॉवर युनिट्स/ कॅबिनेटस वाढवत नेता येतील.

दुसर्‍या एका धाग्यावरून

हरिहर | 2 January, 2013 - 23:34 नवीन
स्वयंपाकघर रिनोव्हट करताना खाली बसूनदेखील स्वयंपाक करता यावा अशी साधारण 3 फूट रुंदीची जागा ठेवण्याचा विचार आहे. त्याठिकाणी बसण्यासाठी 6 इंचाचा छोटा कट्टा करावा. तेथेच पुढे सिंगल शेगडी/ऊर्जा शेगडी/इंडक्शन असे काहीतरी ठेवावे असा डोक्यात विचार आहे. दररोजची पोळी भाकरी करताना किंवा जेव्हा मोठा स्वयंपाक/भाजणीसारखा उपद्‌व्याप असेल त्यावेळी सोईस्कर होईल असे वाटते. नेटवर अशा स्वरूपाचे डिझाइन कोठेच दिसले नाही. आर्किटेक्टला ही संकल्पना पचनी पडली नाही. सध्याच्या ओट्याला तात्पुरते टेबल जोडून प्रयोग करून बघितला. आराम वाटतो. पण अजून खातरी नाही. एका ठिकाणी गुजराती स्टाईलने खुर्चीच्या उंचीचा ओटा पाहिला होता. मांडी घालून किंवा एक पाय खाली सोडून स्वयंपाक करता येतो. कायम उभे राहून स्वयंपाक केल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते का?
उपरोक्त प्लॅन सोईस्कर होईल का किंवा यामध्ये काय-काय त्रुटी असू शकतील यासंदर्भात आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे.

इब्लिस | 3 January, 2013 - 00:37 नवीन
हरिहर, किचन कॅबिनेट मधल्या सर्वात खालच्या ड्रॉवरमधे ग्यासची शेगडि इ. बसेल अशी सोय करता येईल. काम झाले की गायब करता येईल. खालीच बसून स्वयंपाक करणार असा हट्ट असलेले लोक अजूनही आहेत जगात.
- अनुभवी इब्लिस.

खालीच बसून स्वयंपाक करणार असा हट्ट असलेले लोक अजूनही आहेत जगात.
>>>
प्रत्येक वेळी नाही, पण जेव्हा बराच वेळ उभे रहावे लागते (उदा. तळण, पोळ्या (लाटणे व भाजणे दोन्ही) इ च्या वेळी माझी आई खाली बसून स्वयंपाक करणे प्रेफर करते. कारण तिला गुढघेदुखीचा त्रास असून खूप वेळ पायांवर प्रेशर येईल अश्या अवस्थेत उभे राहणे शक्य होत नाही.

अश्या लोकांसाठी माझ्या आईने स्वयंपाकघरात करून घेतलेली अरेंजमेंट उपयोगी ठरू शकेल. ओट्यावर नेहमीची २ बर्नर्स असलेली शेगडी आहे. शिवाय एक बर्नरची चौकोनी शेगडी ओट्याच्या एल शेपचा छोटा भाग असतो त्याखालच्या पोकळ जागेत ठेवली आहे. जेणे करून पोळ्या. तळण इ च्या वेळी ओट्यालगत खाली बसून काम करता येईल. काम झाले व शेगडी गार झाली की दार लावून ती जागा बंद करून घ्यायची.
(ओट्याच्या खालच्या भागाला बंद करणारी दारे लावली आहेत.)

मी मॉड्युलर किचन बद्दल कंफर्टेबल नाहीय. पुण्यात सुट्ट्या स्टिलच्या ट्रॉलीज कुठे मिळतील का?

वाडिया हॉस्पिटल आणि चिंचेची तालीम यांच्यामधून जाणारा रस्ता पुढे खडकमाळ पो स्टे कडे जातो. त्याच रस्त्याने १-२ चौक पुढे गेल्यावर ट्रॉल्या, रॅक्सचं मोठ्ठं मार्केट आहे. त्याच रस्त्यालाही आहे आणि मग डावीकडे वळूनचा रस्ता आहे तिथेही आहे.

ओके ओके गुरुवार पेठ का, बरं झालं सांगीतलं, मी थोडी कंफ्युज झालेले. त्या पेठा आणि छोटे छोटे रोड कळत नाही नीट, पण म्हणलं विचारत विचारत जाऊ.

आमच्याकडे किचनमधे नाही पण सिटींग रुममधे अर्ध्या आकाराचे खिडकीलगत संगमरवराचे ओटे केले आहेत. टेकायला पाठ पण आहे. तिथे बसून वाचायला, भाजी निवडायला, पेपर खाली ठेवून वाचायला सोयीचे होते. उन्हाळ्यातही ते ओटे दुपारी थंड राहतात त्यामूळे त्यावर आडवे पण होता येते.

हा धागा बघितल्यावर माझा कालचा धागा येथे टाकावयास हवा या विचाराने हा धागा उघडला तर अगोदरच कॉपी पेस्ट केलेला दिसला. धन्यवाद निंबुडा ! माझ्या डोक्यात असलेला खाली बसून स्वयंपाक करावयाच्या कट्‌ट्याचा प्लॅन कागदावर काढून येथे लवकरच टाकतो. म्हणजे आणखीन योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. आमच्याकडे दररोज संध्याकाळी भाकरी असतात. गॅसवर भाकरी म्हणाव्या तेवढ्या चांगल्या होत नाहीत. त्यासाठी कोळशाची एक शेगडी तेथे खाली बसावयाचा जो कट्टा करणार आहे तेथे ठेवावा म्हणतो. गावाकडे असताना सायंकाळी चुलीजवळ बसून गरमागरम भाकरी खाल्ली आहे. त्याची नेहमी आठवण येते. मुलांना ते सुख देऊ शकत नाही ह्याची रुखरुख वाटते.

कोळशाची शेगडी घरात केल्यास वर 'चिमणी' बसविणे म्यांडेटरी. पूर्वीच्या घरांत धुर बाहेर जाण्याची सोय असे. त्यामुळेच घरातील धूर आपोआप बाहेर जाईल अशा अग्नेय दिशेस स्वयंपाकघर असावे असा संकेत होता.
असो.
(चुलीवरच्या भाकरीचा फ्यान)

एका ठिकाणी गुजराती स्टाईलने खुर्चीच्या उंचीचा ओटा पाहिला होता. मांडी घालून किंवा एक पाय खाली सोडून स्वयंपाक करता येतो.>>> माझ्या गावी काका आणि मामांच्या घरी अशाप्रकारचा ओटा अजूनही आहे. जास्त वेळ स्वयंपाकात जाणार असेल तर ते खरच सोयीचे होते.

शेगडीच असेल तर मग टेरेसमधेच मराठी शिणेमात दाखवतात तसा १ वीतभर उंचीचा ओटा करून घेतला तर? टेरेसमधे शेगडी ठेवता येईल व मोकळ्या हवेत तिथेच जेवण पण करता येईल.

नवीन गॅस हॉब घ्यायचे आहे. सध्या कुठल्या ब्रँडचे छान डिझाईन्स आहेत का?
मी बॉशचे पाहिले. अजुनही एक दोन पाहिलेत पण आवडले नाहीत. सध्या कुणी घेतला असेल तर प्लीज सांगा.

अजुन एक गोष्ट विचारायची आहे. गॅसचा ओटा (किचन काऊंटर) एल आकराचे आहे. पण मला त्यावर मायक्रोवेव्ह ठेवायचे नाहीये. तुम्ही कुणी मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी कॅबिनेट बनवले आहे का?

मला माझ्या खोलीत पारंपारिक घरात सारवलेल्या भिंतीवर काढतात तशी नक्षी काढायची आहे. त्यासाठी कोणता रंग वापरू ? म्हणजे रंग पांढरा वापरणार आहे पण प्रकार विचारते आहे. नक्षीची डिझाईन सुचवाल का? अजून काही सल्ले असतील तर जरूर दया.

प्रिन्सेस, आम्ही बनवून घेतलंय. कॅबिनेट म्हणण्यापेक्षा एक फडताळ बनवून घेतलाय. त्यावर मायक्रोवेव्ह ठेवतो आणि फडताळामधे काचेच्या वस्तू. आम्ही सतत बिर्‍हाड घेऊन फिरत असल्याने प्रत्येक घरामधे मायक्रोवेव्हसाठी जागा असेलच असे नाही, म्हणून असे फडताळ बनवून घेतलंय.

क्रोकरी कशी ठेवावी ?
डिनर सेट्स , ग्लासेस , प्लेट्स, सूप पासून सर्विंग बाऊल्स अशा खूप काचेच्या वस्तू असतात किचनमध्ये.
कशी नीट ठेवाव्यात. ?
मी सध्या काही गोष्टी बॉक्स मध्ये ठेवते.
प्लेट्स बश्या तर एकमेकांवर ठेवाव्या लागतात . प्रत्येकामधे एक मऊ जाडसर कागद ठेवते की ज्यामुळे एकमेकांवर घासून चरे पडणार नाहीत.
पण वापरून झाल्या की सर्व क्रोकरी पूर्ण वाळल्या शिवाय आत ठेवता येत नाही.ग्लासेस ,कप तर थोडे जरी ओले असतील तर वास येतो. खूप वेळ जातो. वेळ जातो म्हणून जास्त वापर नाही.
एक अंदाजे 3 (रुंदी) X २ (खोली) X ४ (उंची ) फुट कॅबिनेट रीकामे आहे ह्या साठी .
ट्रोली करता येतील का ? का अजून काही
प्लीजजजजजज काहीतरी सुचवा. आहे ती क्रोकेरी वापरात आणायची आहे.

फॅब इंडियाचा असतो तसा किंवा इतर कोणाचा फुतॉन सोफा बेड कोणी वापरुन बघितला आहे का?

लिव्हिंग रुममधे लो लेव्हल सोफा/बेड, भारतीय बैठकीकरता योग्य फोम/गाद्यांची अरेन्जमेन्ट याकरता काही सल्ला, डिझाइन्स मिळू शकतील का? तसेच कुठे करुन मिळतील याबद्दलही माहिती हवी आहे.

Pages