होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

venetian blinds ला काही स्वस्त पर्याय कोणी सांगू शकेल का? माझ्या ऑफिस च्या खिडकीला लावायचे आहेत.

१५० रू. / sq. ft. असा भाव पाहिला. ३० sq. ft. खिडकीचे ४५०० रु. होतात. आणि ऑफिस कधी शिफ्ट केले की मग ते वायाच जातील कारण त्याच आकाराची खिड्की असेल असे नाही.

साधा पडदा नकोय, अगदीच घरगुती लुक येतो ऑफिसला...

रोलर ब्लाईड्स स्वस्त पडतील असे नाही वाटत. कारण मी ज्या दुकानात विचारले होते त्याने मला ते PVC sheet दाखवले होते १५०/- असे. मग त्यामधे त्याच्या पट्ट्या करुन बसवुन देणे सगळे धरून.
आणखी कुठे कदाचित जरा स्वस्त मिळतीलही, पण साधारण रेंज अशीच असेल. १५० चे फार तर १४५ किंवा १४०. काही 'हटके' पर्याय सुचतोय का ते पाहातोय. Happy

ब्लाईंड्स हवेतच आहेत का? light reducing film चालण्यासारखी नाही का? बरीच स्वस्त पडेल.

दुसरा पर्याय म्हणजे चटयांचे पडदे. सॉफ्ट्बोर्ड (असल्यास) आणि हा पडदा यांची छटा सारखी असल्यास मस्त दिसेल. किंमतीची मात्र कल्पना नाही.

रोलर ब्लाईड्सची साधारण कॉस्ट १५० रू / प्रति sq.ft. किंवा जरा जास्तच असेल असे मला वाटते. होम फर्निशिंगच्या दुकानातच मिळतील. इथे पुण्यात कुमठेकर रोडवर काही गृहसजावटीच्या दुकानात मी पाहिले होते.

माधव, light reducing film चा विचारच नाही केला मी. चांगला पर्याय आहे. बघतो. आणि चटयांचे पडद्यांचा पण पर्याय चांगला वाटतोय. हे चटयांचे पडदे कुठे मिळतील, काही कल्पना? किंमत वगैरे शोधुन बघतो. धन्यवाद.

होम इंटीरीअर करताना वास्तु कन्सल्टंट चा सल्ला कुणी घेतला आहे का? असल्यास आलेले अनुभव (फायदा/तोटा) इथे शेअर करणार का प्लीज?

वास्तु संबंधित दिशांचे बेसिक नॉलेज कुणाला असल्यास इथे शेअर करणार का प्लीज? जसे की आग्नेय वा दक्षिण दिशा ही अग्नीची मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला शेगडी किंवा लाल्/पिवळ्या/नारिंगी रंगाचे फूल असलेली फोटो फ्रेम इ. ठेवावी. उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने त्या दिशेला टॉयलेटचे ड्रेनेज असू नये. (घरातला पैसाही ड्रेन होतो. याचा अनुभव एका स्नेह्याला आलेला आहे. घर घेतल्या घेतल्या ४ महिन्यांच्या आत शेअर्स मध्ये १८ लाखांचे नुकसान, घरातल्या व्यक्तींची आजारपणे, hospitalisations अशा मार्गाने पैसे जात राहिले. )

जनरली घरांची रचना पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा मुख्य दिशांना धरून असते. पण जेव्हा घराची रचना आग्नेय-नैऋत्य-वायव्य-ईशान्य अशी असते तेव्हा ओटा, बेडवर झोपण्याची दिशा इ. साठी कसा विचार करावा??

मला एक सांगा. घराला डार्क कलरचे पडदे चांगले की लाईट कलरचे. हे रोजच लावायचेत त्यामुळे मळणार हे सहाजिकच. वारंवार पाणीही लागणार नाही त्यांना. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन कोणता कलर घ्यावा? दिवसभर तरी घरात कुणी नसेल, त्यामुळे उजेड अडण्याचा वगैरे प्रश्न नाहीय. भिंती लाईट यल्लो कलरच्या आहेत.

तुला सगळ्यात स्वस्त आणि मस्त ऑप्शन देऊ का?
दिसायला पण छान दिसतो.
लेटेस्ट स्टाइल इत्यादी नाही पण युनिक आणि आर्टसी नक्की दिसते.
फक्त थोडेसे स्वतःला कष्ट आहेत.

एका ठराविक जाडीचे मांजरपाट मिळते. ते खळ काढण्यासाठी दोन-तीन वेळेला धुतले की भरते आणि त्याला एक मस्त झळाळी येते. हवे असल्यास कुठल्याही कलरचा घरी करू तो डाय त्याला मोतिया टोन मधे बसतो. मस्त दिसतं ते. किंवा हवं तर त्याच्यावर मस्तपैकी पेंटिंग पण करता येतं.
एकाच ताग्यातून कापड घेऊन वेगवेगळ्या रूमच्या थीम आणि प्रकृतीप्रमाणे पडद्यावर चित्र/ रंग करू शकतेस तू.
हिंदमाता कडे जाताना चित्रा सिनेमाच्या समोरच्या बाजूला प्रफुल्लचंद एम शहा नावाचा केवळ विविध प्रकारचे मांजरपाट विकणारा होलसेलर आहे.
त्याच्याकडे ब्लीच्ड व्हाइट आणि अनब्लीच्ड ऑफ व्हाइट अश्या दोन्ही प्रकारचे मांजरपाट मिळते.

किंवा मग मंगलदास मार्केटमधे पण मांजरपाटाचे होलसेलर आहेत.

पडद्यासंदर्भाने अजून काही.
घराचा/ खोल्यांचा आकार आणि पडदे हे एकमेकांशी विसंगत असू नये.
हल्ली जनरली शहरांमधे लहान खोल्या असतात. त्यात एकदम डार्क कलर्स, जड आणि बोल्ड प्रिंट किंवा ब्रोकेडींग, जड आणि जाड कापड असेलेले पडदे नाही वापरू.
जसं लहान खोली मोठी वाटावी म्हणून एकदम लाइट कलर्स सजेस्ट केले जातात तेच पडद्यांचं आहे. पडद्यामुळे खोली जडजड वाटता कामा नये.

लहान खोल्या असतील तर ते डबल पडदे कसे वाटतील (म्ह्ण्जे आत १ जाळीचा आणि बाहेर जाडा )?? कुणी सांगु शकेल का?

नी मांजरपाटाला अनुमोदन्...आणि खर्चीक नसल्यामुळे १-२ वर्षात परत नविन थिम पण करता येते....मी येका ठीकाणी मुलांच्या खोलीला पांढरेशुभ्र मांजरपाटाचे पडदे पाहीले होते... २ महीन्यांनतर परत गेल्यावर त्या घरातल्या २ चिमुकल्यांची चित्रकला त्यावर दिसली.....ती मुल ईतकी खुश होती आणि त्या पडद्यांबद्दल आणि त्यांच्या चित्रांबद्दल इतकी बोलत होती की बस.....

मांजरपाटाची आणि त्यावरच्या चित्रांची कल्पना चांगली आहे.
(आमचे सध्याचे पडदे निवृत्त झाल्यानंतर) करून बघण्यात येईल.

मी पडद्यासाठी केले नाहीये. इतर कामांच्यात बरेचदा केलेत उद्योग पण त्यातली एकही वस्तू माझ्याकडे नाही. त्या त्या प्रॉडक्शनच्या पेटार्‍यांच्यात दफन होऊन पडल्या असतील. Happy

नी, मांजरपाटावरचा रंग उतरत नाही का? जर धुताना रंग जाणार नसेल तर ओढण्या डाय करणार्‍यांकडून पण स्वस्तात डाय करून घेता येईल.

माधव, टाय अँड डाय करताना शिकले होते कपडा डाय करायला. त्यावेळी रंगाच्या छोट्या बाटल्या मिळायच्या त्यातला रंग मीठ घातलेल्या उकळता पाण्यात घालून त्या पाण्यात कपडा बुडवून रंगवायचो. नंतर कपडा वाळवायचा. पण तो रंग धुताना जायचा.

डोमेस्टिक डाय मिळतात ना बाजारात. पावडर स्वरूपात.
ते जिथे मिळतात तिथे त्याची प्रक्रिया पण समजावून देतात. घरी किचनमधे करणार असाल. तर सगळ्या खाद्यवस्तू व्यवस्थित झाकून ठेवणे/ कपाटात ठेवणे, भांड्या बिंड्यांवर वर्तमानपत्र पसरणे तसेच डाय उकळायचे पातेले हे स्वैपाकातले नसले पाहिजे. काम झाल्यावर संपूर्ण किचन ओल्या कापडाने पुसून घेणे. रंगाची पूड इकडे तिकडे उडू शकते. पंखा कंपलसरी बंद पण एक्झॉस्ट कंपलसरी चालू पाहिजे किंवा जिथे डाय उकळणार तो भाग हवेशीर असायला हवा.
शक्यतो अंगण असेल घराला तर सरळ तीन दगडांची चूल करून त्यात पालापाचोळा सरकवा सगळा.
पण या सगळ्या उद्योगांची खरच आवड असेल तर करा.

बाप रे हे बरेच कठीण वाटतय घरी करायला. म्हणजे ते डाय कुठे मिळतात इथपासूनच शंका आहेत शिवाय घरी करणे सुरक्षीत पण वाटत नाहिये.

मुळात मांजरपाट आणि कॉटन यांच्यात डाय शोषून घेण्यात खूप फरक आहे अल्पना त्यामुळे डोमेस्टिक डाय घरी वापरल्यास मांजरपाटाला नुसता त्या त्या रंगाचा कमी किंवा जास्त टोन येतो. मी वरती म्हणाले तशी त्या त्या रंगातली मोतिया झाक. पण पूर्ण सॉलिड रंग होत नाही. म्हणून तर ते सुंदर दिसते. Happy
डायर्सकडे दिल्यास ते पूर्णच रंगीत करून देऊ शकतात. मुंबईत तरी ४० रू./ मीटर असा डाय करण्याचा भाव आहे बाहेर आणि १००-१२५ मीटर पेक्षा कमी कापड असेल तर ते भाव कमी करत बसत नाहीत. कारण त्यांच्याकडे रोजच्या रोज बुटिक्सच्या ऑर्डरी असतात. दिल्लीत एकुणातच शिलाई इत्यादी पण स्वस्त आहे तर कदाचित हा पण भाव स्वस्त असेल.
मांजरपाट डाय करून वापरल्याची काही सॅम्पल्स खालच्या लिंकांमधे बघता येतील पण त्यांचा पर्पज सुंदर पडदे हा नाहीये त्यामुळे डाय बरोबरच ते कापड जुने करण्यासाठी इतर बर्‍याच प्रक्रिया केलेल्या आहेत त्यामुळे कितपत कळेल जरा शंका आहे.
१. http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan या ठिकाणचा वरून तिसर्‍या ओळीतला सगळ्यात डावीकडचा फोटो. त्या मुलाच्या अंगावर टाकलेले कापड हे प्रक्रिया केलेले मांजरपाट आहे.
२. http://sites.google.com/site/neerajasspace/nata या ठिकाणचे सर्वात खालच्या ओळीतले तिन्ही फोटो. अंगावर टाकलेले कापड हे प्रक्रिया केलेले मांजरपाट आहे. ज्युलियस सीझरच्या फोटोतल्या मोठ्या कापडाचे नंतर नवर्‍याच्या हपिसात पडदे केले होते. पडदे उत्तम आहेत. दोन वर्ष मस्त वापरले. आता प्याक करून ठेवेलेले आहेत कारण ते हपिस सोडलं. नवीन ठिकाणी गरज नाहीये. Happy

माधव, बर्‍याच मुली हे करतात घरी. टेक्स्टाइल, होमसायन्स, फॅशन इत्यादी शिकणार्‍या किंवा मग कलाकुसरीच्या वस्तूंची आवड असलेल्या इत्यादी..
लिहिताना दिसतं तितकं ते अवघड नाहीये किंवा माझ्यासारख्या ज्यांना या प्रकारांची विशेष आवड आहे निदान त्यांना तरी नाहीये. Happy

नी, आपण होम फर्निशिन्ग लाइन सुरू करूया.
मी पण मुंबईला आले कि मला बारके मुंबई फॅशनचे घर पहिल्यापासून सजवायचे आहे. त्यात ह्या सूचनेचा नक्की वापर करेन. मला एलिगंट इंडियन लुक आवड्तो. अजून एक कल्लपना आहे. कलम कारीचे फॅब्रिक विकत घेउन येते मग घराच्या साइज प्रमाणे त्याचा उपयोग करता येइल.

मला भलं मोठ अमेरिकेतलं घर फक्त सजवायचे आहे एकदा. राहता नाही आले तरी चालेल.
दुसरे मंजे पड्दे प्लस लायटींग असा विचार करावा. नेट वर कितीतरी क्राफ्ट साइट्स आहेत त्यावर बारके बारके फॅब्रिक वर्क, हुक्स, फेअरी लाइट्स कप मध्ये बसविलेल्या माळा, सुरेख मेणबत्त्या, कॉर्नर स्टफ आहे. एन्वायटाइम्स च्या होम व गार्डन सेक्षन मध्ये फार मस्त कल्ल्पना प्रत्यक्षात आणलेल्या दिसतात. ते ही जरूर बघा. मार्था बाई तर आहेतच. तिला खरेच घर सजवीण्याची कला साधलेली आहे.

अमा, बिझनेसबद्दल पक्का.. Happy
गंमत नाही. खरंच. करूयात? मेरेमे बिझनेसकी अक्कल बहोत कम है लेकीन. क्रिएटिव्ह पार्ट अपुन संभालेगा.
वायर ज्वेलरी मेकिंग आणि हे होम अ‍ॅक्सेंटस... फार्फार आवडीचे विषय.
मुंबईत वायर ज्वेलरीचे क्लासेस शोधून काढणारे लवकरच.

माझ्याकडे भरपूर जास्तीचा पैसा आला कधी तर मला सान्टा फे, न्यू मेक्सिको मधे अडोबे स्टाइल घर घ्यायचेय. आणि एकदम टिपिकल नेटिव्ह अमेरिकन + मॉडर्न अमेरिकन अश्या मिक्स पद्धतीने सजवायचेय. मातकट गुलाबी भिंती, डार्क ब्राउन लाकडाचे अ‍ॅक्सेंटस, बाकी मेक्सिकन स्टाइल ब्राइट रंगसंगती आणि मस्त सान्टा फे लॅण्डस्केप, ऑपेरा हाउसच्या इथलं लॅण्डस्केपचं एकदम मेक्सिकन स्टाइलमधली पेंटींग्ज, एखादं जॉर्जिया ओ कीफ अश्या सगळ्यात सिल्व्हर + टरक्वॉइज अशी टळटळीत ज्वेलरी घातलेली मी.....
श्या माझा जीव ठेवून आलेय मी सान्टा फे ऑपेरा मधे

Pages