सोलापुरी मासे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 December, 2010 - 02:28

नाव वेगळच वाटल ना ? मीच दिल आहे ते. नोव्हेंबरमध्ये सोलापुरला गेले होते तेंव्हा घेतलेली ही छायाचित्रे.
सोलापुरच्या सिद्धेश्वर मंदीराच्या तळ्यातील हे मासे माणसांच्या गडबड गोंधळाला न जुमानता अगदी कडेला येत होते.

mase1.JPGmase.JPGmase2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुतै, खायचे मासे आहेत हे...........???
जर असतिल.....तर होउन जाउ दे एक "डिश"
तळं भरलेलं दिसतंय्.......माश्यांनी Happy

जागू, खायचा मोह आवरला म्हणायचा म्हणजे ?
आणखी दोन ठिकाणच्या माश्यांना, माणसांपासून अभय आहे.
पहिले ठिकाण, आळंदीच्या इंद्रायणीत. देवाची आळंदी म्हणून तिथे कुणी मासे पकडत नाहीत. आणि त्यामूळे तिथे त्यांचा आकार भला मोठा झालेला दिसतो.

दुसरे ठिकाण, ईगतपूरीच्या रंधा धबधब्याखालचे रांजण. सतत पाणी पडून तिथे खोल रांजण झालेले आहे. तिथल्या पाण्यात शिरणे सामान्य माणसाला शक्यच नाही. तिथलेही मासे भले मोठे झालेले होते. आता रंधा धबधबाच रोडावल्याचे ऐकतोय.

मस्तच गं...तळ्याकाठी गेले की पाण्यात खायचे पदार्थ टाकुन मासे गोळा (म्हणजे माझ्या टोपलीत नाही तर खाली पाण्यात) करणे हा माझा आवडता छंद आहे. आणि हा ब-याच लोकांचा छंद आहे बहुतेक.

कधीतरी एकदा पुण्याला सारसबागेत गेले होते. तिथल्या तळ्यातही भलेमोठे मासे होते. आमच्या समोरच एक आजीबाई भिजवलेल्या पिठाचा गोळा घेऊन आल्या आणि एकेक लहान गोळी करत त्या माशांना खायला घालत होत्या. घरी फोटोही असेल कदाचित. पाहिला पाहिजे.

तारकर्लीलाही हाऊसबोट आतुन पाहायला गेलो होतो तेव्हा तिथे बसुन असेच चुरमुरे टाकुन मासे गोळा केलेले Happy

ब-याच वर्षांपुर्वी पावसाळ्यात गावी गेलो होतो. माझी लेक तेव्हा २ वर्षांची होती. तिला घेऊन असेच एकदा पिठ घेऊन नदीवर गेले मासे पाहायला. तिने ती मजा बघितली आणि मग गावाहुन परतेपर्यंत रोज सकाळी तिला नदीवर नेऊन त्या माशांना पिठ खाऊ घालावे लागले Happy

जागू, तूला तर खूप कमी पहायला मिळाले. मी तब्बल ३ तास सिद्धेश्वर मंदिराच्या पायर्‍यांवर बसून आयुष्यात कधी पाहिले नव्हते एवढे मासे त्या तळ्यात पाहिले होते. दरवर्षी त्या तळ्यातल्या माश्यांसाठी लिलाव केला जातो. अन वर्षभर मग त्या तळ्यात मत्सबीजे सोडली जातात अन मग वर्षभर त्या माणसाचा अधिकार असतो त्या माश्यांवर. Happy तिथे त्या माश्यांना खायला खास पावाची लादी मिळते. ती घेतली होतीस कि काय? त्या पावचा तुकडा पायरीवरच्या पाण्यात टाकलास तर ते मासे त्याच्याकडे झेप घेताना मस्त दिसतात.

चातक सुकीच्या माहीती प्रमाणे लिलाव होतो म्हणजे ते खाण्याचेच असतील. पुन वो अपुनका एरिया नही रे बाबा उनकी डिश बनाने को.

खायचा मोह आवरला म्हणायचा म्हणजे ?

दिनेशदा तुम्हाला पण चातकला दिलेलेच उत्तर.

साधना, सुकी, डॉ. आमच्याकडे तळ आहे त्या तळ्यात रोज सकाळी पाव घेउन जाउन माश्यांना तुकडे करुन घालणे हा माझ्या मुलीचा आणि तिच्या बाबांचा नित्यक्रम होता. पावसाळ्यात बंद असतो. आता मधुन मधुन जातातच.

आमच्या नव्या मुंबईत्,पालिका येण्या आधी तळ्यांचा लिलाव व्हायचा..... तेव्हा खूप मासे पाळले जायचे व तडाखेबंद विक्री व्हायची.... मनपा आल्यापासून लिलाव बंद झाले आणि मासेमारी सुद्धा.

माश्यांना पाव खायला घालताना खूप चांगले फोटो काढता येतात... .. धमाल येते. Happy

जागूले, झब्बू द्यायचा मोह आवरत नाहीये. चीनात गेल्तो तवा पायलेले माशे. त्यांच्या खाद्याच्या पुड्या विकत माणसं उभी असतात. पुडी विकत घ्यायची आणि माशांना खायला घालायची. माशे पण सगळ जाणून जमा होतात.

Total.jpgZumbad.jpg

अरे देवा कसले कसले झब्बु देतात लोक... इथे पोटात भुक भडकलीय आणि समोर तळलेला रावस आणि पापलेट... ती सुरमई मला पापलेटासारखी दिसतेय

रोहनचा झब्बू आवडला.

मासे पाण्यापेक्षा डिशमधेच छान दिसतात :).
तिथून पुढं त्यांना पुन्हा पाण्यात (पोटातल्या) सोडता येतं.

जागू, तुझ्या फोटोपेक्षा त्या रावस, सुरमई, पापलेट कडेच लक्ष जातय.....;-)
आयला खरच राव, तो पहिला फोटो म्हणजे अगदी घरून पाठवल्यासारखं वाटतंय....
बसा बोंबलत आता, माझ्या शिव्या शाप लागतील कसले भन्नात फोटो टाकता राव तुम्ही...... Happy

ती सुरमई मला पापलेटासारखी दिसतेय..

तीव्र भूकेने असे भास होणे संभवते. अशा वेळी सुरमई जरी खाल्ली तरी पापलेट खाल्ला असच वाटतं. मासा समोर ठेवून चुकून आळूचं फदफद वाढलं तरीही अशा अस्वथेत समजून येत नाही..

उपाय - मासा पाहील्यावर खूप काळ वाट पाहू नये.

<<अजून एक ठिकाण आहे... सुवर्ण मंदिर तळं,अमृतसर...>> दिनेशदा व डॉक्टरसाहेब, अजूनही असं एक ठीकाण आहे, अनंतनाग, काश्मिर.
<<माश्यांना पाव खायला घालताना खूप चांगले फोटो काढता येतात... .. धमाल येते.>> असं म्हणतात कीं पूर्वी मिशनरी लोक गावच्या विहीरीत पाव टाकायचे व मग त्या विहीरीचे पाणी प्यालेले सर्व ख्रिश्चन झाले म्हणायचे ! नशीब माशाना धर्माची झळ लागलेली नाही ते !!:डोमा:
<<मला मासे खायला आवडतात... पण जास्ती करून खारे.. गोडे मासे कधी तरी खातो... >> मलाही समुद्रकाठचा असल्याने तीव्रतेने असंच वाटायचं. पण चंद्रपूरला [चांदा] व रायगड जिल्ह्यात तळ्यात पैदाईशी केलेल्या कटला, रूई इ. गोड्या पाण्यातील माशानी हा गैरसमज दूर केला !

कटला, रूई इ. गोड्या पाण्यातील माशानी हा गैरसमज दूर केला ! >>>

हो हो निश्चित... मी इथे सुद्धा हे मासे खातो पण कमी... Happy

अजुन एक ठिकाणै ते म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या आवारातले छानसे तळे. नविन रहायला आले तेव्हा मुलीबरोबर रोज नेमाने ब्रेड घेऊन तळ्यावर जात असू.

असुदे, ते मासे तिकडे शुभ मानतात ना ? दुबई, सिंगापुरच्या एअरपोर्टवर पण आहेत ते.
पण हा प्रकार, गाईला चारा घाला वो माय !! अशातला झालाय.

नाही रे.. वरचा रावस.. फ्राय केलेला. आणि खाली कट सुरमई... Happy

रावस मध्ये एकच मेन काटा असतो. त्यामुळे रावस खायला एकदम सोपा. Happy

आणि हो रावस म्हणजे सल्मोंड / साल्मन / सालमंड मासा.

खरय दिनेशदा, आणि अगदी हेच माझ्या मनात आलेलं. शेवटी ईंडिया असो वा चीन, पळसाला पानं तीन.. Happy

<<आणि हो रावस म्हणजे सल्मोंड / साल्मन / सालमंड मासा.>> पक्का भटक्याजी, माझीही अशीच समजूत होती पण परदेशी वास्तव्य असलेल्या एका मासेखाऊ मित्राने मला छातिठोकपणे सांगितलं कीं रंगात बरंच साम्य असलं तरी रावस म्हणजे साल्मन [उच्चार सॅमन ] नव्हे. चवीतही फरक आहे. खरं काय तें शोधून काढायची तसदी कांही मी घेतली नाही. पण परदेशात सॅमन वर एक "डेलिकसी" म्हणून जीव टाकतात, तितका हा मासा आपल्याकडे लोकप्रिय नाही [मला खूपच आवडतो, व तोही वरच्यासारखा शॅलो फ्राय केलेला ], हेंही खरं.

भाऊ.. मी सुद्धा छातिठोकपणे सांगतो... Happy साल्मन म्हणजेच रावस...

दोघांची जातकुळी एकच.. पोटजात फारतर वेगळी असेल... Lol

Pages