अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरिल लोकांचे स्नेहसंमेलन

Submitted by क्ष... on 22 December, 2010 - 16:27
ठिकाण/पत्ता: 
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.

महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्‍याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.

पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण Happy

माहितीचा स्रोत: 
मायबोली
तारीख/वेळ: 
रविवार, January 16, 2011 - 14:30 to 21:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमा, लहान मुले असली की हे प्रकार होतातच. त्यामुळे तू अजिबात विचार करू नकोस. नक्की येच.

मंडळी, आपण माझ्याकडेच भेटायचे का? कारण मग लहान मुलांना पण टीव्ही वगैरे लावून दिला की आपण गप्पा टाकायला रिकामे. आणि थोडावेळ येउन जाणार्‍या लोकांनापण कधीही टपकता येईल.
कसे वाटतेय तुम्हाला?

सगळे हो म्हणत असाल तर मग मेनु ठरवूयात.

हो

नक्कि तारिख / वेळ काय? घरीच भेटु, बाहेर खाण्यापेक्क्शा पॉटलक बरे, बाहेरचे खायचे असेल तर food बाहेरुन मागवु

मी आळूची भाजी/फदफदे/गरगटे करते. साधा भात आणि एखादी कोशिंबीर करू शकते.
पोळ्या कोणाला चांगल्या मिळतात हे माहिती असेल तर २ लोकांनी पोळ्या घेउन येण्याचे करावे.
एकाने पाणी/सोडा वगैरेची जबाबदारी घ्यावी.
राखी, बटाटेवडे पळतील Proud

सगळ्यांनी काहीतरी आणलेच पाहिजे असे नाही एखादेवेळी जाऊन नुसते खाल्ले तरी काही हरकत नाही.

तरीख-वेळ-ठिकाण - वर बदल केला आहे.

माझं यायचं मी दोन दिवसात सांगेन. म्हणुन अजुन नावनोंदणी केली नाही. पाने मिळाली तर मी समोसे नक्की आणेन.

मंडळी हेडकाऊंट सांगा पटापट!!! त्यानुसार
आत्तापर्यंत हो म्हणालेली टाळकी -

नंद्या (१)
महागुरू (२+१) - पोळ्यांचा बंदोबस्त
सुयोग (२+२) -
पेशवा (१) -
सायलीमी (२+२) - भाजी
राखी. (२+२) - बटाटेवडे
मीपुणेकर (२) - गोडाचे काहितरी
मिनोती (२) - आळू/पालकचे गरगटे, कोशिंबीर, भात.

अजुन कोणी विसरले का?

एकूण १२ मोठे, ७ लहान.

आश, रमा, सशल, अमोल, वृषाली, मनाली - नक्की या. अगदी थोडावेळ भेटायला का होईना पण या.

माझ्याकडूनही हो Happy
मी सॅन डिएगोहून ड्राईव्ह करून येईन. कोणी एल.ए.कर येणार असतील तर कारपूलचं जमवू शकू.

सुयोग, सार्/सूप किंवा ज्युस आणायला हरकत नाही. ज्युस मोठे कितपत पिणार माहिती नाही, तुम्ही मुलांना देत असाल तरच आणा Happy

Pages