'जित्याची खोड'ची पार्श्वभुमी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हे वाचण्याआधी कृपया 'जित्याची खोड' वाचा: http://www.maayboli.com/node/22014

लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०

त्या कथानकाशी काही साधर्म्य नसले तरी स्टॅनिसलॉ लेमची 'The chain of chance' मनात घोळत होती. सोबतच रामानुजन व हार्डीबद्दल पुन्हा एकदा वाचले, व ग्योडेल आणि गॅल्वा सुद्धा आठवले.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी विश्वाची सर्व सत्ये गणितात पकडता येतील असे समजल्या जात होते. येवढेच नाही तर आपण बहुदा त्याच्या अगदी जवळ आहोत असेही काही तज्ञाना वाटत होते. ग्योडेलच्या अपुर्णत्वाच्या सिद्धांताने त्या शक्यतेला कायमचा सुरुंग लागला. त्याने दाखविले की अनेक प्रमेये एकत्र करुन कितीही गुंतागुंतीची प्रणाली बनविली तरी आपण नेहमीच त्या प्रणालीच्या कक्षेत राहुन असे काही भाकीत करु शकतो जे सत्य आहे असेही सिद्ध करता येत नाही आणि असत्य आहे असेही सिद्ध करता येत नाही. मुख्य मह्णजे त्या पुढे दोन्ही दिशांना ती प्रणाली वाढवता येते (उदा. युक्लिडीय व अयुकलिडीय भुमित्या - दोन्ही तिताक्याच 'सत्य' आहेत). इतका महत्वाचा शोध लावणारा ग्योडेलने मात्र कुणितरी आपल्याला विष द्यायचा प्रयत्न करतय असे समजुन खाणे सोडुन दिले व मृत्यु पावला.

रामानुजनने हार्डीला लिहिलेल्या पत्राद्वारे त्यांची भेट घडुन आली व त्यांनी बरेच महत्वाचे संशोधन केले. इग्लंडमध्ये एकदा रामानुजनने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. थोडेफार तब्बेतीमुळे आणि थोडेफार आपले बरेच संशोधन लोकांना आधीच माहित होते या जाणिवेनी. (आणि बायकोकडुन न येणाऱ्या पत्रांमुळे - रामानुजनची आई त्यांची पत्रे एकमेकांना मिळु देत नव्हती हे सत्य नंतर उघडकीस आले). वयाच्या बत्तिसाव्या वर्षी त्याचा मृत्यु झाला.

हार्डीने स्वत: देखील नंतर (अनेक वर्षांनी) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने A Mathematicians' Apology नामक पुस्तक लिहिले जगापुढे गणिताचे सौंदर्य मांडायला. त्यानंतरचा आत्महत्येचा दुसरा प्रयत्न सफल झाला.

गाल्वाची कथा आगळीच आहे. जितका तो गणितज्ञ होता तितकाच क्रांतीकारी होता, अनेकदा तुरुंगात गेला होता. नेमके कोणावरुन त्यांचे द्वंद्व ठरले यावर एकमत नाही, पण पहाटे पिस्तुल घेऊन निघाला तेंव्हा त्याला आपण परत येणार नाही याची कल्पना होती. त्याच्या राजकीय शत्रुंचे ते कारस्थान असल्याचे म्हंटले जाते. आदल्या रात्री त्याने आपले गाणितावरील अनेक विचार उशीरापर्यंत जागुन एकत्र केले. त्याचमुळे Galois Theory नामक गणिताच्या एका शाखेचा जन्म झाला. मृत्यसमयी त्याचे वय होते 21.

'The chain of chance' मध्ये एकमेकांशी संबंध नसलेले १२ लोक आत्महत्या करतात - किंवा वरवर पाहता तसे वाटते तरी. मरण्याआधी ते कोणत्यातरी मोठ्या सत्याजवळ पोचल्याप्रमाणे उत्तजीत असतात व कुणाला काही न सांगता मरतात.

या सर्वांमुळे गणितज्ञ व आत्महत्या या विषयांवरुन 'जित्याची खोड' लिहिली. पण फार काही गणितज्ञ प्रत्यक्षात आत्महत्या करत नाहीत. आमजनतेचे ज्या प्रमाणात जगाशी भांडण असते तितके त्यांचे नक्कीच नसते.

http://www.edge.org/3rd_culture/goldstein05/goldstein05_index.html

http://www.everestuncensored.org/874/2007/01/09/ramanujan-divine-equatio...
Ramanujan: essays and surveys By Bruce C. Berndt, Robert Alexander Rankin
http://en.wikipedia.org/wiki/%C3%89variste_Galois
http://en.wikipedia.org/wiki/The_Chain_of_Chance

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ह्म्म्म.. गुंतागुंत आहे सगळी.. (माझ्या नजरेत, एखाद्या गणितज्ज्ञाच्या नजरेत सगळे crystal clear असेल)

हे लोक आयुष्य का संपवत असतील? ह्या आयुष्यात जे मिळवायचे ते मिळवले आता पुढे काही नाही,एक मोठी पोकळी आहे असे वाटुन की जे मिळवायचेय त्याच्यासाठी हे आयुष्य पुरेसे नाही, अजुन मोठी व्याप्ती असलेले आयुष्य मिळायला पाहिजे म्हणुन????

(रच्याकने, तुम्ही खगोलशास्त्रज्ञाबरोबर गणितज्ज्ञ पण आहात की खगोलशास्त्रज्ञात गणितज्ज्ञ पण सामावलेला असतो? )