सावळी चैतन्यकळा

Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 10:04

थेंबातून अवतरे
मेघचैतन्य सावळा
आसमंत धुंद सारे
भोगी आनंद सोहळा

थेंबाथेंबांची ही साद
पाखराच्या कंठी येई
सावळ्याच्या बासरीची
मुक्त तान रानी जाई

थेंब थेंब येता रानी
रत्न मोती लकाकती
झळाळून दावीतसे
सावळ्याची अंगकांती

थेंब थेंब टिपताना
राधा बावरुन जाई
सावळा की भास मना
मनी मोहरुन येई

थेंब कान्हा थेंब राधा
रास सर्वत्र रंगला
हरवले सृष्टीभान
सावळा की सृष्टीकळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान !

थेंब कान्हा थेंब राधा
रास सर्वत्र रंगला
हरवले सृष्टीभान
सावळा की सृष्टीकळा

>>> हे खूप आवडले !

उमेश, सखी राधा, मी मुक्ता.., अतुल गुप्ते - सर्वांचे मनापासून आभार.
"पाऊस" हे मला स्वतःला त्या सावळ्याचंच सगुण रुप वाटतं - त्यामुळेच श्रावण महिन्यात त्याचा जन्मोत्सव साजरा करत असावेत (प्रतिकात्मक).....

कविन, विनायक, अनिल - खूप उशीरा पाहिले तुमचे प्रतिसाद....
पण आवर्जून दिलेल्या प्रतिसादाकरता मनापासून धन्यवाद.....