Submitted by साधना on 17 December, 2010 - 22:43
राजस्थान ट्रिपवर गेले होते तेव्हा मी रणकपुर मंदिरात फोटो काढायला थांबले. सोबतचे पुढचे एक देऊळ पाहायला निघुन गेले. माझे फोटो झाल्यावर बाहेर गेटजवळ येऊन सोबत्यांची वाट पाहात उगीचच निर्हेतुक कॅमेरा चालवत असताना अचानक एका गर्द पानांच्या झाडावर हा दिसला. जशी पोज दिसतेय तसाच बसलेला. झाडाच्या दुस-या बाजुला जाणे शक्य नव्हते. पोज बदलेल म्हणुन वाट पाहिली पण त्याने माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करुन दोन्-चार मिनिटातच तिथुन प्रस्थान केले. मला आधी भारद्वाज वाटला पण तो काळा आणि पंख मातीचे लाल असे असतात. मग हा कोण?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
साधना, पक्क्या नि असूदे..
साधना, पक्क्या नि असूदे.. सुंदर फोटो आहे .. मी पहिल्यांदाच पाहिला हा पक्षी..
नि वर्षू, भुंगा, सुकी.. धन्स माहितीबद्दल..
हा पक्षी आपल्या इथे बघायला
हा पक्षी आपल्या इथे बघायला मिळतो का?? मी तरी अजून पाहिलेला नाही..
असुदे मस्त झब्बु आहे.
असुदे मस्त झब्बु आहे.
साधना, मस्त पक्षी आणि फोटो
साधना,

मस्त पक्षी आणि फोटो !
भूंग्या,
तुलापण पक्षाची छान माहिती आहे
हा पक्षी आपल्या इथे बघायला
हा पक्षी आपल्या इथे बघायला मिळतो का?? मी तरी अजून पाहिलेला नाही..
>>>>
भटक्या... हा नॉर्थ भारतात जास्त असतो....... आपल्याकडे क्वचित पहायला मिळतोही...... तिकडे कडाक्याची थंडी पडली की काही पक्षी स्थानिक स्थलांतर करतात तसा कधीतरी दिसतो.
फोटो आणि झब्बू दोन्ही मस्त!
फोटो आणि झब्बू दोन्ही मस्त!
कसले अप्रतीम रंग आहेत. फोटो
कसले अप्रतीम रंग आहेत. फोटो सुंदर.
फोटो मस्त. टकाचोर हे नाव
फोटो मस्त.
टकाचोर हे नाव पडायचे कारण म्हणजे त्याला चमकणार्या वस्तु आवडतात, व अनेकदा तो नाणी पळवतो.
हा कावळ्याच्याच जातीचा आहे (Corvidae)
कुठला ते जाणकार सांगतीलच पण
कुठला ते जाणकार सांगतीलच पण पक्ष्याची पोझ अप्रतिम टिपली आहेस.>>>सुकीला अनुमोदन.
सगळेच झब्बू मस्तच
जबरी आलाय फोटो..
जबरी आलाय फोटो..
मस्त फोटोस आणी झब्बु पण
मस्त फोटोस आणी झब्बु पण
मस्त आलाय फोटो
मस्त आलाय फोटो
ह्याचे मराठीनाव टकाचोर
ह्याचे मराठीनाव टकाचोर (इंग्रजी Rufous Treepie) असून इतर सस्तन प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून थोडेशे मांस चोरून खातो म्हणून हे नाव पडले असावे असे मानले जाते. इंग्रजीत त्याच्या आवाजावरून “बोबोलिंक” असे सुद्धा नाव आहे. छान फोटो.
आह्हा बोबोलिंक हा होय! याच्या
आह्हा बोबोलिंक हा होय! याच्या वरील बर्याच कविता वाचल्या आहेत.
ह्याचे मराठीनाव टकाचोर
ह्याचे मराठीनाव टकाचोर (इंग्रजी Rufous Treepie) असून इतर सस्तन प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून थोडेशे मांस चोरून खातो म्हणून हे नाव पडले असावे असे मानले जाते. इंग्रजीत त्याच्या आवाजावरून “बोबोलिंक” असे सुद्धा नाव आहे. छान फोटो.>>>बरेचदा बघितलं याला पण नाव आज कळालं.
वर बऱ्याच जणांनी टकाचोर उत्तर
वर बऱ्याच जणांनी टकाचोर उत्तर भारतीय म्हणून लिहिले आहे. पण इतर उ भा सारखा हा पण आता महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा असा माझा अंदाज आहे. याला पारसिक टेकडीवर खूप वेळा बघितलय, एकदा तर पिल्ले व आई असाही लवाजमा बघितलाय

Pages