बे एरीया गटग - २३ डिसेंबर २०१० संध्याकाळी

Submitted by अजय on 14 December, 2010 - 21:01
ठिकाण/पत्ता: 
बे एरीया. नेमके ठिकाण ठरते आहे.

बे एरीया गटग - २३ डिसेंबर, २०१० संध्याकाळी

तारीख/वेळ: 
Thursday, December 23, 2010 - 21:00 to शुक्रवार, December 24, 2010 - 00:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, भाग्यश्री च्या घरी ६ वाजता भेटू. जे लोक रेस्टॉ मधे थेट येणार आहेत त्यांनी साडेसात पर्यंत या. १० पर्यंत बसता येइल.

गटग छान झाले. सर्वांना विषेषत: अजय आणि भावना यांना भेटुन आनंद वाटला.

सर्व संबंधितांना फोटो पाठवले आहेत. कोणाला मिळाले नसल्यास मला कळवा.

थोडा वेळच जमलं मला, पण का होईना, भेटायला मजा आली.. थोडेफार ID आणि चेहरे यांची सांगड झाली.. अजय/भावना, भेटून मस्तं वाटलं.. फोन टाक, जमलं तर एकदा भेटू परत..
मीपुणेकर, चहा मस्तं झाला होता..

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!
धन्यवाद!!

धमाल आली काल. ६ ते ११. बरेच मोठे गटग झाले.

अजय/भावना: प्रश्नोत्तराच्या तासाने तुम्हाला हैराण केले नाही अशी आशा करतो Happy

अभिजित, भाग्यश्री: आयोजना बद्दल धन्यवाद. आणि चहा, कोकम बद्दलही.

मंडळी वृत्तांत येईलच तुमच्याकडून पण कोण कोण आले होते, कोणी सरप्राइझ पाहुणे होते का, टांगारू कोण कोण इ. तपशील लिहा आमच्यासाठी.

तुम्हाला सगळ्यांना भेटून मजा आली. काही अगदी जुने मायबोलीकर (८-१० वर्षे जुने, काही त्या अगोदरचेही) भेटले. पूर्व किनार्‍यावरच्या वादळामुळे आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त दिवस पश्चिम किनार्‍यावर अडकून पडलो. जाताना सगळ्यांना एकाच दिवशी तिकिटे न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या मार्गाने शेवटी आज सगळे बोस्टनला पोहोचलो (मी शेवटचा). रविवार ऐवजी, बुधवारी. पण पोहोचलो हे महत्वाचे कारण काही सहप्रवाशी शुक्रवारपर्यत अडकून पडले आहेत.

टीपा:
१. यात कुठल्याही किनार्‍याचा उल्लेख योग्य किंवा चुकीचा असे लिहिले नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.
२. अभिजीत अतिशय भिकार चहा करतो. (हे त्यानेच जाहिरपणे का सांगीतले आहे ते चतूर मायबोलीकरांना माहिती आहेच Happy ! )
३. वर यादीत लिहले आहे त्यापेक्षा जास्त मायबोलीकर उपस्थित होते आणि पाहुण्यांची संख्या नोंदवायची काहीतरी सोय करा अशी मागणी करण्यात आली.

Pages