बे एरीया गटग - २३ डिसेंबर २०१० संध्याकाळी

Submitted by अजय on 14 December, 2010 - 21:01
ठिकाण/पत्ता: 
बे एरीया. नेमके ठिकाण ठरते आहे.

बे एरीया गटग - २३ डिसेंबर, २०१० संध्याकाळी

तारीख/वेळ: 
Thursday, December 23, 2010 - 21:00 to शुक्रवार, December 24, 2010 - 00:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संध्याकाळी असेल ( बहुधा वर दिलेली वेळ EST आहे).
बरीचशी जनता देशात आहे सध्या (सायलीमी, राखी, मिनोती )
बाकी कोणाला जमतय का अजून?
रमा, सशल, रार, फुलपाखरू, प्रवीणपा, सुयोग अजून कोण?
गॄप मोठा असेल तर बॉम्बे गार्डन वगैरे चालेल का सगळ्यांना?
जर ७,८ जणच असतील, तर दीदीज मधे (http://www.mydeedees.com/menu.html) ?
नक्की येणार्‍यांची संख्या समजली तर मी टेबल बूक करुन ठेऊ शकेन.

सगळ्यांना सोयीचं असेल तर आधी एकत्र माझ्याकडे जमून मग जेवायला जाता येइल.

मी येइन. भाग्यश्री, मिनोति ने मेल मध्ये लिहल होत की ती २१/२२ तारखेकडे परत येणार आहे देशातुन, येणार आहे अस म्हणालि होती ती, तिची परतीची तारिख मला नक्कि आठवत नाहिये मात्र.

माझे आई-बाबा आले आहेत सध्या .. पण त्या दिवशी संध्याकाळी काही प्लॅन नसेल तर मी येईन .. उद्या नक्की सांगते ..

साधारण ६ ते ९ धरा. मी आत्ताच अजय शी बोललो.

मिनोती येणार आहे. ती बहुधा उद्या परत येत आहे.

बॉम्बे गार्डन चालेल भाग्यश्री. तेच कन्फर्म करू आता.

दीदीज आरामात गप्पा मारण्यासारखे आहे का? पूर्वी माउंटन व्ह्यू मधे तरी तसे नव्हते. आता बदलले असेल तर चालेल. कारण आपला २-३ तास मुक्काम पडतो Happy

अमोल, आश
दीदीज सांता क्लारा तसं लहान आहे, फार मोठं नाही.
८+ लोक असतील तर मोठ रेस्तॉरंट बघाव लागेल.
अजून एक चांगल म्हणजे सनीवेल मधलं Athidi ( http://www.athidhiusa.com/sunnyvale.php)
ईथे निवांत बसता येईल नक्की Happy
तिकडे फोन करून माहिती विचारेन अजून.

बरं संध्याकाळी किती वाजेपर्यंत जमायच आणि कुठे ?
जेवायला जाण्याआधी किंवा/व जेवल्यानंतर गप्पा कंटीन्यु करायला आमच्याकडे वेलकम. (पण उद्यापर्यंत सांगा, म्हणजे पसारा आवरायला बरं :डोमा:)
रश्मी, आश तुमचं येण्याच नक्की असेल (याच!) तर वर लिंकवरती नावनोंदणी कराल का?

मंडळी,
आत्ताच 'Athidi' ला चोकशी केली. ते बहुतेक १०-१२ लोकांसाठी बसण्यासाठी वेगळा हॉल पण देतील असे म्हणाले.
तिथे निवांत बसता येईल, तसे विचारून घेतले आहे.
तेच फायनल करूयात.

अजय सांता क्लारा मधेच, बहुतेक मी रहाते तिथेच जवळ्पास असतील..

साधारण ६ , ६.३० पर्यंत माझ्याकडे जमुयात , मग ७.३०, ८ पर्यंत जेवायला जाता येईल.

तिथे १० पर्यंत बसता येईल.

नंतर वाटलं तर परत घरी येऊन गटग पुढे चालु ठेवता येईल Happy

हो आम्ही फोनवर बोललो आहे. ही वेळ जमणार आहे त्यांना.

आता मग रेस्टॉ नक्की कोणते? अतिथी/अधिती (नक्की उच्चार काय आहे कोणास ठाउक)

रुनी, या किनार्‍यावरचे लोकं ईतकी मोजक लिहिणारी आहेत की या बीबी वर एकुण पोस्टींची संख्या (मी टाकलेल्या वगळून) बघता उगाच सगळ्यांना पोस्टी टाकायला सांगायच अगदी जीवावर आलं Proud
सशल Happy

स्टोरवी कुटूंब (५ लोक), वृषाली(१) यांचे येणे फक्त जेवणासाठी येणे कन्फर्म आहे. उपासक पण यायचा प्रयत्न करतील नक्की कुठे ते कळवतो असे त्यांनी सांगितले आहे.
भाग्यश्री, तुझी इमेल मी त्यांना पाठवली आहे.

आमचे हे पण अजय भावना यांना भेटायला येणार आहेत तेव्हा ते देखिल जेवणासाठीच येतील (तेवढीच गिनीपिग होण्यापासुन सुटका Wink )

मिनोती, ओके Happy
जेवायला २० लोकांसाठी टेबल बुक केलं आहे.
जास्त लोक आली आयत्या वेळी तरी चालेल.व्यवस्था होऊ शकेल, त्यामुळे जमत असेल अजून बाकी लोकांना पण काही कारणाने नावनोंदणी केली नसेल तरी अवश्य या Happy

चलो मंडळी ,संध्याकाळी भेटुच.

Pages