नैरोबीमधले गुलाब

Submitted by दिनेश. on 13 December, 2010 - 12:55

गुलाबांच्या फूलांचे मला लहानपणापासून आकर्षण आहे. मालाडला आमच्या घरी अनेक प्रकारचे गुलाब जोपारले होते. पण पुढे काही बांधकाम झाल्याने ते टिकले नाहीत.

अंधेरीला भवन्स कॉलेजच्या आवारात मी पहिल्यांदा मोठी गुलाबाची बाग बघितली. नंतर बघितली ती, वरळीला नेहरु सेंटरच्या समोर. आधी तिथे मोठी गुलाबाची बाग होती. पण आता ती नष्ट झालीय. तिथे आता एक बाग आहे पण बागेत गुलाबाची झाडे नाहीत.

मस्कतमधल्या कुरुम रोझ गार्डन ची निर्मिती होत असताना मी तिथेच होतो. तिथल्या उष्ण हवेत गुलाब फुलतील का, याची मला काळजी वाटत होती. पण अत्यंत परिश्रमाने ती बाग निर्माण केली गेली. ती फूलायला लागल्यावर तिथल्या माळीबुवांइतकाच मला आनंद झाला होता.

मुंबईत भरणारी गुलाबांच्या फूलांची प्रदर्शने मी अजिबात चुकवत नसे. ती अजूनही भरत असावीत.
झूरीकमधे मी अनेकवेळा निरुद्देश भटकत असायचो, त्यावेळी देखील तिथले अल्पाईन गुलाब बघत बसायचो. पण या सगळ्य काळात डिजीट्ल कॅमेरा नव्हता.

गेल्या १६ वर्षातील ७ वर्षांपेक्षा जास्त काळ मी आफ्रिकेतील विविध शहरांत वास्तव्य केले आहे. अजूनही अनेकजण या खंडाचा, देश म्हणून उल्लेख करतात. या खंडात तीन टोकाला (अल्जीरिया, सोमालीया आणि दक्षिण आफ्रिका ) तीन मोठी वाळवंटे असली तरी इथल्या नद्या आणि सरोवरांमूळे हिरवाई देखील आहे. अदीस अबाबा, नैरोबी सारखी शहरे तर एखाद्या हिलस्टेशन इतकी थंडगार आहेत. किलिमांजारो आणि केनया हे दोन बर्फाच्छादित पर्वत इथे आहेत.

नैरोबी आणि परिसरात गुलाबांची लागवड शेकडो एकरात झालेली आहे. इथून गुलाबांची निर्यात होते. माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर फूटपाथवर एक माणूस केवळ गुलाबफूले विकत असतो.
त्याच्याकडे २०/२२ बादल्यात निव्वळ गुलाबांची ताजी फूले असतात आणि ती तितक्याच प्रकारची देखील असतात.

निर्यातीसाठी किंवा विकण्यासाठी जी फूले असतात ती साच्यातून काढल्यासारखी, अगदी एकासारखी एक असतात. इथली हवा गुलाबांना चांगलीच मानवते, इथे कुठेही गुलाब दिसू शकतात. पेट्रोल पंप, फूटपाथ अशा ठिकाणी पण. कधी कधी तर अगदी कचर्‍यात ती फूलतात. आणि वीतभर वाढलेल्या झाडाला टपोरे फूल आलेले दिसते.

आणि या फूलांत रंग आणि आकार यात खूप विविधता दिसते. तर असेच काही निवडक गुलाब, तूमच्यासाठी पेश करतोय.

यातला एक फोटो सोडला, तर बाकीचे सर्व फोटो झाडावरच्या फूलांचे आहेत. काही फोटो मी क्रॉप न करता तसेच ठेवलेत, कारण, ते कूठे फूलले होते त दाखवायचे होते. काहि फोटो अपूर्‍या प्रकाशात काढले आहेत. इथे निरभ्र आकाश क्वचितच असते.

या फूलांचे म्हंटले तर एकच वैगुण्य. यांना अजिबात सुगंध नसतो. इथल्या थंड हवेत सुगंधाच्या कुप्या तशाही उघडल्या नसत्याच.

एक

दोन

तीन

चार

पाच

सहा

सात

आठ

नऊ

दहा (हा फोटो मी इथल्या देवळात काढला होता, फूलांच्या अनोख्या रंगासाठी )

अकरा

बारा

तेरा

चौदा

पंधरा

सोळा

सतरा

अठरा

एकोणीस

वीस

एकवीस

बावीस

गुलमोहर: 

अखी छान आहे कि. आणि बाजूला तो खायच्या पानांचा वेल आहे का ?
जागू, यावर्षी हवामानाचे तंत्र बिघडलेय. वसंत ऋतू कधी येईल सांगता येत नाही. आजूबाजूच्या झाडांकडे नजर ठेवायची. ती फूलायला लागली, कि राणीच्या बागेतली पण फूलू लागतील.

गुलाबाच्या बिया रुजत असाव्यात. युरपमधे रानटी गुलाबाच्या तरी नक्की रुजत असाव्यात. त्या फार कडक असतात. (चावून बघितल्या. गोडबिड लागत नाहीत.)

अखी, आताच वाचले कि गुलाबाचा बियांना रुजायला तीन महिने लागू शकतात. कधी कधी एक वर्ष पण.
प्रयोग करुन बघणार का ? फळ मात्र पूर्ण पिकून झाडावरच सुकलेले असायला हवे.

नक्कीच करुन बघेन. हे फळं शेजारच्या झाडाचे आहे. गावरान गुलाब आहे. एकदा फुल यायला लागले की भरपूर फुल येतात.

दिनेशदा,
गुलाब आणि फोटो आवडले !
Happy

सुरुवातीच्या ३-४ फोटोमध्ये मक्याच कणीस दिसल्यावर वाटलं, की ही फुले तर नक्कीच आपल्या देशातली असणार !
Lol

दिनेशदा तेथे गुलाब जंगलात आले आहेत कि अंगणातले प्रचि आहेत हे?...काहि अंगाणातले वाटत आहेत....प्लिज माहिती द्या...

सगळे प्रचि आवडले.....:स्मित:

चातक ज्या फोटोत आजूबाजूचा कचरा दिसतोय, ते आमच्या इमारतीच्या बाहेर जी मोकळी जागा आहे तिथे उगवलेले आहेत.
काहि पेट्रोल पंपाच्या बाहेर, काही रस्त्याच्या कडेने. काहि देवळाच्या आवारात....
पण अंगणातला एकही नाही, आणि जंगलातलेही नाहीत.

मस्त फोटो, दिनेशदा. माझ्या माहेरी माझ्या लहानपणी दारात पन्नासेक गुलाबांची झाडं होती, वेल गुलाब होते. आजोबांना ह्या सगळ्याची अतोनात आवड. पुढे त्या बंगल्यावर मजला चढवला आणि जमिनीची जी वाताहात झाली त्यात सगळच हिरमुसलं Sad
असो...
मला पांढरे गुलाब अतोनात आवडतात... छान आलेत फोटो

Pages