प्रिय सखी

Submitted by भुंगा on 12 December, 2010 - 23:06

वर्षाव तुझ्या प्रेमाचा
बेधुंद होऊनी न्हालो
त्या अथांग डोहामधला
एकेक थेंब मी प्यालो

हे हात तुझे हातात
अंगास झोंबतो वारा
पण दोघांमध्ये आता
द्यायचा कुणा ना थारा

बाहूत तुला घेताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस

का अर्थ जुन्या शब्दांचे
मज आज नव्याने कळले
स्पर्शांनी उलगडलेले
हे "रेशीमनाते" जुळले

क्षण असे राहू दे सारे
जरी काळ धावला वेगे
जोवरी श्वास हृदयात
मी असेन तुझीयासंगे

जे शब्दातीतच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे

तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून

हा सुहृद घालतो साद,"ते मोरपीस" लेवून..............!

गुलमोहर: 

जे शब्दातीतच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे

मस्त रे भुंग्या!!! तू काय एकदम रोमँटिक मुड मधे!!! क्या बात हैं???!!! Wink

एकदम हळुवार, सुंदर कविता... आवडली Happy

आणि हो! कवितेचे शीर्षक तर फारच आवडले... कुठेतरी खुपदा वाचल्यासारखे वाटतेय... कुठे बरे??? Uhoh Proud

आणि हो! कवितेचे शीर्षक तर फारच आवडले... कुठेतरी खुपदा वाचल्यासारखे वाटतेय... कुठे बरे???

>>>>

सानी, मला पण वाचल्यासारखे वाटतय खरं .... पण वय झालं आठवत नाही आता...... प्लीज हेल्प. Proud Proud

सॉरी रे!! कान्ट हेल्प!!! सध्या बदाम संपलेले असल्याने सानीचीपण गझनी झालेली आहे... Sad Proud

व्वा छान लयबध्द कविता..

आवडली

बाहूत तुला घेताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस >>> मस्त

हे कडवे वाचताना वैभवच्या ओळी आठवल्या

थेट भेटला पाऊस ... आज मातीला
पेट पेटला पाऊस... लाज मातीला

भ्रमरा, अप्रतिम कविता. 'त्यांचे' नाते आहे ते... खरंच त्याला नावाची गरज नाही. अशी सखी मिळायला 'तो मोरपीसवाला' पण तसाच असतो ना! Happy

शब्दच नहित.....
अप्रतिम.......

सुंदर कविता.

जे शब्दातीतच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे .. मस्तच.

तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून .. अप्रतिम...............

अप्रतिम भुंग्या..... अरे काय सुंदर कविता आहे ही...
अशा काही कविता असतील तर माझ्या विपूत नक्की कळवत जा रे....

आयला..
ही राहिली होती वाचायची? की प्रतिसाद द्यायचा राहिला होता? हे कळत नाहिये.

एक नंबर आहे...
ज ह ब ह रा हा ! Happy

Pages