Submitted by भुंगा on 12 December, 2010 - 23:06
वर्षाव तुझ्या प्रेमाचा
बेधुंद होऊनी न्हालो
त्या अथांग डोहामधला
एकेक थेंब मी प्यालो
हे हात तुझे हातात
अंगास झोंबतो वारा
पण दोघांमध्ये आता
द्यायचा कुणा ना थारा
बाहूत तुला घेताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस
का अर्थ जुन्या शब्दांचे
मज आज नव्याने कळले
स्पर्शांनी उलगडलेले
हे "रेशीमनाते" जुळले
क्षण असे राहू दे सारे
जरी काळ धावला वेगे
जोवरी श्वास हृदयात
मी असेन तुझीयासंगे
जे शब्दातीतच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे
तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून
हा सुहृद घालतो साद,"ते मोरपीस" लेवून..............!
गुलमोहर:
शेअर करा
तू जन्मोजन्मी यावे माझीच
तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून>>>
आठवणी जाग्या केल्यास रे....

भुंग्या प्रचंड म्हणजे प्रचंड
भुंग्या प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली कविता..
पुलेशु!!
(आवडत्या १० त गेली.)
बाहूत तुझ्या शिरताना विरघळले
बाहूत तुझ्या शिरताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस >>>>>>>> हे खासच !
छान कविता, आवडली.
छान कविता, आवडली.
अतिशय सुंदर... शेवटचे कडवे
अतिशय सुंदर... शेवटचे कडवे खूप खूप खूप खूप आवडले
प्रचंड आवडली...!
प्रचंड आवडली...!
अप्रतिम कविता.भुंग्या.. काही
अप्रतिम कविता.भुंग्या.. काही खास कारणं..मोरपिसं आठवण्याची
जे शब्दातितच आहे ते कसे कुणा
जे शब्दातितच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे
प्रचंड आवडली. दक्षीप्रमाणे आवडत्या १०त.
श्री भुंगा, उत्तम! वृत्तात
श्री भुंगा,
उत्तम!
वृत्तात आहेच. (काही किरकोळ र्हस्व दीर्घ हे केवळ 'टायपो'!)
कविता वेगवान, मधुर, हळुवार आणि सच्ची वाटली. मस्त, मस्त, मस्त!
आपल्याला मनापासून शुभेच्छा व या कवितेबद्दल अभिनंदन!
अजून उत्तमोत्तम कवितांच्या प्रतीक्षेत आहे आता!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अप्रतिम कविता भुंगाराव!! जे
अप्रतिम कविता भुंगाराव!!
जे शब्दातितच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे
ह्याच्यावरून माझ्या काही जुन्या ओळी आठवल्या,
मी मात्र तुज प्रियाच म्हणतो नकोत उक्ती अन्योक्ती
एकच ह्या शब्दामध्ये बघ, मिळे जन्मोजन्मींची मुक्ती
सुंदर.... सुंदर....
सुंदर.... सुंदर.... सुंदरच!!!
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस
त्या context मध्ये ज्ज्जाम आवडली ही ओळ!
मस्त सुंदर लयकारी आहे कवितेत,
मस्त सुंदर लयकारी आहे कवितेत, सोप्पी मनातुन उतरलेली वाटली...
वा सुरेख !
वा सुरेख !
कविता खूपच छान आहे ...
कविता खूपच छान आहे ... आवडली
-------------------------------------------------------------------------------
छंदात असल्याने काही ठिकाणी र्हस्व-दीर्घाचे बदल
(जरी व्याकरण दृष्ट्या चूक/बरोबर असले तरी)
आवश्यक वाटतात.
जाणकारांकडून तपासून, योग्य सल्ला घेणे.
जे शब्दातितच आहे ते कसे कुणा
जे शब्दातितच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे!!!
>>>> जबरदस्त आहे ! ....(शब्दातितच यातला ती दीर्घ कर बस्स)
तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून
>>> अप्रतिम !
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे>>>> ह्म्म पण मी एक नाव दिले आहे -----------"सई"
बाहूत तुझ्या शिरताना विरघळले
बाहूत तुझ्या शिरताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस
का अर्थ जुन्या शब्दांचे
मज आज नव्याने कळले
स्पर्शांनी उलगडलेले
हे "रेशीमनाते" जुळले
काबिले तारीफ. निव्वळ अप्रतीम!!!
खूप आवडली.
खूप आवडली.
वा सुरेख !
वा सुरेख !
क्या बात है...भुंगा
क्या बात है...भुंगा !!!
आवडेशकुमार
बाहूत तुझ्या शिरताना विरघळले
बाहूत तुझ्या शिरताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस
हे कडवं प्रचंड आवडलं....
बाहूत तुझ्या शिरताना विरघळले
बाहूत तुझ्या शिरताना
विरघळले होते श्वास
मातीस जणू भिडण्याची
क्षितीजास लागली आस
का अर्थ जुन्या शब्दांचे
मज आज नव्याने कळले
स्पर्शांनी उलगडलेले
हे "रेशीमनाते" जुळले........ही दोन कडवी खूपच आवडली !
एकदम हळुवार, रोमॅण्टिक कविता !
तू जन्मोजन्मी यावे माझीच
तू जन्मोजन्मी यावे
माझीच "सखी" होऊन
हा सुहृद घालतो साद
"ते मोरपीस" लेवून
>>> छान आहे कविता... फक्त जरा शुद्धलेखन सांभाळ...
व्वा....अप्रतिम...... मला खुप
व्वा....अप्रतिम......
मला खुप आवडली कवीता......
जे शब्दातितच आहे
ते कसे कुणा उमगावे
दोघांच्या या नात्याला
का उगा द्यायची नावे
..........अगदी खरय......
अभिनंदन...नी खुप सगळ्या शुभेच्च्छा
सावरी
हे हात तुझे हातात अंगास
हे हात तुझे हातात

अंगास झोंबतो वारा
पण दोघांमध्ये आता
द्यायचा कुणा ना थारा
भुंग्या,
वाह ...वाह !!
म्हणुन तर तु अलिकडे दुर्मिळ झालायसं ..!
अप्रतिम्...फार सुरेख..
अप्रतिम्...फार सुरेख..
मस्तच रे भुंग्या.. तुझी अशी
मस्तच रे भुंग्या.. तुझी अशी कविता पहिल्यांदाच पहाते मी
भुंग्या................. काय
भुंग्या.................:)
काय लिहीलंय्स रे...एकदम क्लास!!! खुपच आवडली..निवडक १०त
झकास! सुंदर!! आवडली
झकास! सुंदर!! आवडली
सुंदर!
सुंदर!
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक आभार.....!!!!!
Pages