प्रकाश किरण

Submitted by जो_एस on 12 December, 2010 - 07:46

प्रकाश किरणाचं अस्तित्व समजायला
वाटेत अडथळा असावा लागतो
एकदा तसं झालं की
तो उजळूनही निघतो
पण त्याचा प्रवास मात्र तिथेच संपतो

पुढे कोणत्याही गरजे शिवाय
अंधार मात्र चिरंतन असतो...

सुधीर

गुलमोहर: 
शब्दखुणा: