वाघोबा नी म्हातारी

Submitted by शुभांगी. on 10 December, 2010 - 05:50

जंगलामधे वाघोबाबा, धरुन बसले दबा
पोटामधले कावळे मेले,आणा कुणी डबा??

चालल्या होत्या आजीबाई, लुटूलुटू मजेत
खुदकन हसले वाघोबाबा,सावज आल कवेत

आज्जीबाई जाता कुठे, थांबा थोडावेळ
कितीतरी दिवसांपासुन, खाल्ली नाही भेळ

आज्जी काही भ्याल्या नाहीत, ध्यानी आला कावा
सुटायचे तर युक्ती करावी, नको नुसता धावा

मला खाशील भागेल का भुक, हाड जातील घशात
बेसन लाडू आणिन म्हणते, इंटरेस्ट नाही का कशात??

वाघोबा हसले मनात फसले, तोंडा सुटले पाणी
आज्जीबाईंसह त्यांनी म्हणली गंमतगाणी

आज्जीबाई निघाल्या लेकिकडे, होण्या धष्टपुष्ट
वाघोबा बसले जिभल्या चाटत, कशाला हवेत कष्ट?

तुप खाल्ले, मेवा खाल्ला तेज आले अंगा
काय बरे द्यावे वाघा, आता तुम्ही सांगा?

लेकि पुसे जाता जाता, आता काय करु?
भुकेल्या त्या वाघोबाच्या, तोंडी काय भरु?

लेक हसली, दिला भोपळा आतमधे कोरुन
बिंधास्त जा ग आई, यात स्वतःला भरुन

जंगलामधुन जाताना, आज्जी चालल्या जपुन
वाघोबाबा बसले होते, झाडामागे टपुन

ए भोपळ्या येताना म्हातारी, दिसली का रे तुला?
वाट बघुन बघुन आता, कंटाळा आला मला

भोपळ्यामधुन आवाज आला, म्हातारी नाही ठाऊक
वेगे वेगे चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक, टुणुक टुणुक

गुलमोहर: 

छान!

Pages