पालक पराठे [फोटोसहीत]

Submitted by मनिषा लिमये on 9 December, 2010 - 22:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ जुडी पालक
आल लसुण पेस्ट [प्रत्येकी चमचा]
चमचाभर जिरं
हिरच्या मिरच्या [आपल्याला हव्या त्या प्रमाणात ]
कणीक त्यात बसेल तेवढी आणि तेल- तुप आणि चवीप्रमाणे मीठ

[चमचा म्हणजे टीस्पुन या अर्थी]

क्रमवार पाककृती: 

१] मिक्सरमधे जरासं भाजलेल जिरं वाटुन घ्या
२] मग त्यातच हि. मिरची , आलं आणि लसुण पाकळ्या घालुन फिरवुन घ्या.
३] आता त्यातच पालक [निवडुन-धुवुन चिरलेला] घालुन पेस्ट .करा
४] आता या पेस्टमधे बसेल तेवढी कणीक आणि चवीप्रमाणे मीठ घालुन छान मळुन घ्या. [कणीक नेहमीच्या पोळीसारखी हवी उगीच घट्ट नको]
५] १५ मिनिटांनी पोळपाटाला तेल लावुन पराठे लाटा
६] तव्यावर मस्त तुप सोडुन आणि पराठ्यावर दोन्हीबाजुला तुप लावुन छान भाजा

७] आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम गरम पराठा लोणच आणि दह्याबरोबर खाऊन टाका.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो सही आलाय मनिषा Happy
मी प्युरी घालते आणि पालक बारीक चिरूनही कणकेत घालते. रंग एकदम मस्त दिसतो पराठ्याचा... आणि एक, कुठलेही पराठे करताना एखादा बटाटा उकडून गरम असतानाच बारीक कुस्करून कणकेत मिसळायचा आणि मग कणिक भिजवायची, पराठे एकदम खुसखुशीत होतात Happy

मस्त दिसताहेत पराठे Happy

ही बटाट्याची आयडीया माहित नव्हती गं मंजू ! मी पालक बारीक चिरूनच कणकेत घालते.

वा मस्त मनिषा.. अगदी तोंपासू... आम्ही घरी एकदा याच्या पुर्‍या पण केलेल्या. Happy

रंग मस्त दिसतोय!! मने, पुढच्या गटगला (म्हणजे १०-१२ गटग नंतर) मी असेन तेव्हा घेऊन ये. मंजे, तूही आण म्हणजे कोणता अधिक छान ते ठरवता येईल. Wink

सुक्या आता दही तुझ्या घरचच वापर पाहु Proud

वर्षा नेक्श्ट टाईम तिळ घालण्यात येतील.

मंजुडे टिपेबद्दल धन्स ग.

अश्वे Happy

निलु पुर्‍याही मस्त होतील ना. Happy

भ्रमा तु येताना सगळ्यांसाठी दही घेऊन ये म्हणजे झालं Happy

मनीषा मस्त आहेत पराठे. मी पण आजच केले आहेत. फोटो काढायचे राहीले. नाहीतर आज फोटो टाकले असते तर तुझे पराठे आणि माझे पराठे भाऊ भाऊ दिसले असते. सेम असाच कलर आलाय. मी थोडे मटार दाणे टाकले. म्हणजे मटार, पालक, आल, लसुण, मिरची, थोडी कोथिंबीर एकत्र मिक्सरमधुन काढते. मग हे मिश्रण परातीत टाकुन त्यात हिंग, हळद, मिठ घालून पिठ मळते. कधी कधी थोडासा गोडा मसाला पण टाकते.

मस्त

मी त्यात जास्त प्रमाणात चपातीचे पिठ घेते आणि १ चमचा भाकरिचे पिठ्[माझ्या कडे भाकरी चे पिठ मिक्स आसते[ज्वारी+बाजरी+सोयाबीन(आगदि कमि)+नाचणी]] असे
त्यात १ चमचा तांदळाचे पिठ आणि १ चमचा बेसन
मग पराठे करते
कधि कधि अरधे टोम्याटो पण घालते मिक्सर मधे

मस्तच मी पण टाकू का मग... कित्ती तरी प्रकार्चे बनवलेत आज पर्यंत .. पण सगळ्या पराठ्यांची पाकक्रुती जवळपास सेमच असते ..........

फोटो सहिच आलेत हा..... फोटो काढेपर्यंत थंड नाही झाले का ते... आमच्या घरी नाही थांबणार कोणी इतका वेळ Biggrin

येस मने,

मी पण जमतील ती पिठे अ‍ॅड करते. असेच मेथीचे पण करते. कधी कधी कच्चा दूधी किसून घालते पीठे मळताना. मंजुडी म्हणते तसा उकडलेला बटाटा सुद्धा कधीतरी!

आणि हो लोण्यासोबत पण छान लागतात असे पराठे.

मस्तच झालेत! आणखी एक टीप Happy कणिक भिजवताना थोडे दही घालुन बघा. पराठे छान लुसलुशीत होतात आतुन आणि बर्‍याच वेळ मऊ राहतात!