Submitted by डॉ अशोक on 9 December, 2010 - 10:13
आता गझल कशाला?
साठीस दोन बाकी, अंगास कंप आला
त्या गत यौवनाची, चर्चा आता कशाला?
नजरेस साद असता, प्रतिसाद नाही आला
अंगाई गात असता, मग प्रेम गीते कशाला?
आषाढ श्रावणांचा ना स्पर्श अंगी झाला
ग्रीष्मातल्या दुपारी, मग मेघ-चर्चा कशाला?
मैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला
नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?
-अशोक
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा, सुंदर.
वा, सुंदर.
साठीस दोन बाकी, अंगास कंप
साठीस दोन बाकी, अंगास कंप आला
त्या गत यौवनाची, चर्चा आता कशाला?
नजरेस साद असता, प्रतिसाद नाही आला
अंगाई गात असता, मग प्रेम गीते कशाला?
छान नि मस्त आवडले !!
चांगली कविता अशोकराव...
चांगली कविता अशोकराव...
गझनी गझल !
गझनी गझल !
आवडेश
आवडेश
सुंदर कविता.
सुंदर कविता.
नि:शब्द ओठी फुलते, आता गझल
नि:शब्द ओठी फुलते, आता गझल कशाला?
व्यथा चांगली जाणवली.
नजरेस साद असता, प्रतिसाद नाही आला
अंगाई गात असता, मग प्रेम गीते कशाला?
ह्यात दुसरा मिसरा थोडा बदलता येतो का पहा कारण मग थोडा बरोबर वाटत नाही आहे.
अंगाईगीत गाता हवे प्रेमगीत कशाला?
असे काहितरी जास्त चालेल असे वाटते.
वाह सुंदर ! आवडली कविता डॉक..
वाह सुंदर !
आवडली कविता डॉक..
मैफील संपलेली, अस्तास सूर्य
मैफील संपलेली, अस्तास सूर्य आला
नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?
>>>
वा वा!
अलका, प्रकाश १११, डॉ कैलाश,
अलका, प्रकाश १११, डॉ कैलाश, गिरीश, वर्षा_म, ङंगाधर मुटे, निलीमा, सांजसंध्या, बेफिकीर....
धन्यावाद सर्वांचे.
निलीमा...
ही कविता या पूर्वी नांदेडला माझ्या एका मित्राने गायली आहे.
-अशोक
खुपच सुरेख .... मैफिल
खुपच सुरेख ....
मैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला
नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?
या ओळि फार भावल्या.......