१)चिकन बाईट साईझ तुकडे करून ( ग्रोसरी स्टोअर मधे बरेचदा थिनली स्लाईस्ड चिकन ब्रेस्ट मिळतात ते सोपे पडतात पटकन तुकडे करून घ्यायला.) साधारण १ पाउंड
२)तळणी साठी तेल
मॅरिनेशन साठी
१) आलं,लसूण, मिरची,कोथिंबीर पेस्ट
२)मीठ
३)मीरपूड
४) १ अंडं
५) कॉर्नफ्लोअर
६)शानचा तंदूरी चिकन मसाला १ छोटा चमचा
७)तिखट १ टीस्पून
सॉस साठी
१)टोमॅटो केचप १ टेबलस्पून
२)सोय सॉस १ टीस्पून
३)हॉट सॉस १ टीस्पून
४)बारीक चिरलेले आलं, लसूण, हिरवी मिरची
५)स्प्रिंग ओनियन ४-५
६)कांदा १ छोटा बारीक चिरून
७)भोपळी मिरची बारीक चिरून २ टेबलस्पून
८)चवी प्रमाणे मीठ मीरपूड
१) प्रथम चिकन साफ करून त्याचे बाईट साईझ तुकडे करून घ्यावेत.
२) चिकनला मीठ,मिरपूड,(आलं+लसूण्+मिरची+कोथिंबीर) पेस्ट लावून मुरवावं.
३) करायला घेते वेळी ह्या चिकन मधे एक अंडं फेटून घालावं. गरजे प्रमाणे कॉर्नफ्लोअर्,तिखट,शानचा तंदूरी चिकन मसाला घालावा.
४)आता हे तुकडे तेलात तळून घ्यावेत.
५)सर्व तुकडे तळून झाल्यावर एका पातेल्यात थोडे तेल तापवावे.
६)आलं,लसूण,मिरची, पातीचा कांदा, कांदा,भोपळी मिरची असे क्रमा क्रमाने परतावे.
७)त्यात टोमॅटो केचप, सोय सॉस, हॉट सॉस, मीठ,मीरपूड घालावे. सर्वात शेवटी तळलेले चिकन मिक्स करावे.
चिकन मुरवल्या नंतर लागणारा वेळ साधारण ३० मिनिटे. चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट मॅरिनेट करते. थंडीच्या दिवसात हे चिकन आणी जोडीला स्वीट कोर्न सूप, हाक्का नूडल्स आणी व्हेज स्टरफ्राय असा मस्त मेनू होतो.
क्या बात है.सही फोटो आहे मृ.
क्या बात है.सही फोटो आहे मृ. मी पण काल दुसरा हफ्ता केला शॅलो फ्राय करूनच.आणी भरपूर जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून परतलं. कढाई चिकन मसाला पुढच्या वेळी ट्राय करून बघेन.
मीपण मीपण विकेंडला करून
मीपण मीपण विकेंडला करून पाहिलं झकास झालं होतं, आता याच पाकृनी व्हेज डिश करायचीये; प्रज्ञा जनता जाम खुष ग!
प्रज्ञा काय मस्त दिसतय गं ते
प्रज्ञा काय मस्त दिसतय गं ते चिकन. आता मर्गशीर्ष संपला की लगेच करून बघणार आहे मी
मस्तच दिसतंय चिकन, नक्की
मस्तच दिसतंय चिकन, नक्की करणार
मस्त आहे रेसिपि. पण फोटो दिसत
मस्त आहे रेसिपि. पण फोटो दिसत नाहिए.
Pages