तुझ्या कथेला लागलं नाट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
1’

चाल : तुझ्या उसाला लागंल कोल्हा

बघ सांभाळ लिखाणास नीट
तुझ्या कथेला लावंल नाट गं
तुझ्या कथेला लावंल नाट ॥

मूळ लिखाण साधं सोपं
वर प्रतिसाद मिळती मोपं
हे कुणाच्या डोळ्यात खुपं

मग हातामंदी घेउन छडी
होई प्रकट डुप्लिकेट आयडी
त्याने टाकली हळूच काडी

बीबी पेटवायचा घातला घाट
तुझ्या कथेला लावंल नाट गं
तुझ्या कथेला लावंल नाट ॥

बंदुक ठेवुनी खांद्यावरी
दुसऱ्यांच्या हा गोळीबार करी
ह्याची युगत हाय मातुर भारी

एका दगडात पक्षी किती?
कशी वाकडी चालते मती
म्होरं यायची नाही छाती

जात लांडग्याची लई वाईट
तुझ्या कथेला लावंल नाट गं
तुझ्या कथेला लावंल नाट ॥

नाव गुर्जींचे घेतले खरे
पण गुरावानी ह्यो गुरगुरे
दबा धरून हल्ला करे

कसा मनामंदी आकस धरी
का किडे करायची सुरसुरी
एकी गडाची सलते उरी

उगा मित्रांना म्हणतोय भाट
तुझ्या कथेला लावंल नाट गं
तुझ्या कथेला लावंल नाट ॥

विषय: 
प्रकार: 

मिल्या... सही आहे रे!! Happy

मिल्या जियो!!!!!!
.
कोणी आम्हांस भाट म्हणोत वा काही.. पण जिथे तिथे विकृती करत फिरण्या पेक्षा स्तुती करत फिरणं कधीही चांगलंच नाही का???? :p

मिल्या... सही जिरवलीस रे... Happy

मिल्या हेच हव होत तुझ्याकडून.
 
 
==============
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

"सो सुनार कि एक लोहार कि!"

मिल्या, सगळ्यांच्या मनातले लिहिलेय.
आता "त्याना" बोलण्यासारखे काहि आहे का ?

खुषाल लागू दे कोल्हा ऊसाला,
तूम्ही गुर्‍हाळ थांबवू नका.

नाही, माझे काव्य नाही हे, अशी लावणीच आहे.

मिल्या,
बंदुक ठेवु’नी’ खांद्यावरी
दुसऱ्यांच्या हा गोळीबार करी
ह्याची युगत हाय मातुर भारी

या ओळींमधे अवतरण चिन्हात नी असल्याने त्यावर श्लेष आहे हे अर्थातच कळतंय. आणि तो श्लेष माझ्या नावाच्या शॉर्टफॉर्म कडे जातो हे उघड आहे. आणि अर्थ बघता नी दुसर्‍यांच्या म्हणजे डुप आयडीजच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार करते आहे असा मला जाणवला, अजून काही जणांनाही तो तसाच वाटला आहे.
तो तसा तुला अपेक्षित नसेल तर प्रश्नच नाही. पण वरच्या अभिप्रायांपैकी काही जणांनी असाच अर्थ घेऊन तुला 'वा वा' म्हणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मास्तुरे हा जेव्हा जेव्हा येऊन धिंगाणा घालून जातो तेव्हा कोणी ना कोणीतरी हे संशय बोलून दाखवतो. दर वेळेला हीच गोष्ट हॅमर केल्यावर नव्याच काय पण जुन्या लोकांनाही खरी वाटू शकते
तस्मात तुला या ओळीतून नक्की काय म्हणायचे आहे ते इथे स्पष्ट केलेस तर बरे होईल.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

हम्म ओके आता कळले...

  नाही मला तसे काही मुळीच म्हणायचे नाही... उलट कुणीतरी तुझ्या खांद्यावरुन म्हणजे मुद्दाम तुझ्या नावाचा वापर करुन असा गोळीबार करत आहे असे मला म्हणायचे आहे..

   तू डुप्लिकेट आयडी घेउन असे काही करणार नाहीस ह्याची मला खात्री आहे.

    पण मी ते अवतरण चिन्हच काढून टाकतो म्हणजे गैरसमज होणार नाहीत.

    प्राजक्ताशी सहमत.. अर्थात 'शहाण्याला शब्दाचा मार' त्यामुळे विकृतांवर त्याचा किती परीणाम होतोय ते पाहू यात.

    मिल्या, सहीच!
    .
    अशे करु दे हल्ले मोप
    झाली ठाऊक त्याची रुपं
    आता ऍडमिन बी येऊन झापं
    .
    तू लिहीत र्‍हा जोमानी
    मिल्याची पूनमरानी
    जळनार्‍याला जळू दे मनी
    .
    बघतोय पुढल्या कथेची वाट
    तुझ्या कथेला लावलं नाट गं
    तुझ्या कथेला लावलं नाट

    जबरी विंडबन.

    मस्तच रे मिल्या ........... Happy
    --
    अरूण

    जबरी रे मिल्या....... Happy

    मिल्या, खासच रे एकदम......

     माझी एक शंका genuine ...... लावंल की लावलं? कसं लिहायचं नक्की?

     हा हा हा!!!!!!!!!जबरीच रे भो!!!!!!

     लावंल की लावलं? कसं लिहायचं नक्की?
     <<<<<
     लावंल हे बरोबर. ('लावेल'चे रूप. लावलं चा संबंध लावले शी आहे.)

     मिल्या, मस्तच रे. Happy

     पाठींब्याबद्दल सर्वांचेच आभार..

      मॄ : भन्नाट आहे तू लिहिलेले चौथे कडवे... धन्यवाद गं Happy

       मंजू : श्र चे बरोबर आहे. ती टायपो आणि कॉपी पेस्ट एरर आहे Happy

        दुरुस्त केलीय आता..

        बरेच दिवसांनी तुझे विडंबन वाचले, आधी नीट कळले नव्हते पण मग पुनमची कथा आणि त्यावरची 'चर्चा' वाचल्यावर प्रकाश पडला. छान केलयस.

        जबरदस्त... मिल्या पुनम.. लगे रहो! Happy