मज्जाखेळ [३-५]: रैना ने लिहिलेला खेळ

Submitted by सावली on 6 December, 2010 - 06:45

रैना ने दिलेला खेळ इथे वेगळा धागा करुन लिहित आहे

वयोगट: [३-५]

साहित्य: काटेचमचेसुर्‍यांचा सेट (घरात असतो तो) ४ काटे, ४ मोठे चमचे, ४ छोटे चमचे, चार सुर्‍या असा सेट असतो नेहमीचा.

कृती: पोरांना बसवून त्यांचे पॅटर्न्स करायला शिकवायचे. म्हणजे प्रत्येकी एक हा एक सेट, दोन काटे दोन चमचे हा दुसरा असे..

अधिक टिपा:

मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची पालकांनी दिलेली उत्तरे:
http://www.astro.caltech.edu/~aam/fun/set.html. हे आश्चिग यांनी सुचवले.
तो खेळ नवर्‍याने मुलीसाठी मॉडिफाय केला वरील खेळासाठी warm up म्हणून. मुलीची एक मैत्रिण आहे, त्या दोघींना बसवुन खेळणे चालू केले आहे. अजून या पोरींना नियम समजत नाहीयेत. (एक गंमत- यांना समजा ६ वेळा टाळ्या वाजवायला सांगीतले तर त्या एकतर दोन्तीन वाजवतात, किंवा ८-९-१०, दिलेल्याआकड्याबरहुकुम थांबणे ही प्रक्रिया त्यांना अजून पुरेशी समजत नाही, किंवा आम्हाला सांगत येत नाही.)

हळु हळु या वर दिलेल्या दुव्यावरील खेळ खेळायला शिकवायचे आहे. वरील लिंक वरचा खेळ प्रिंट करुन त्यातली कार्ड कापून घ्यायची.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, अश्विगनी दिलेल्या दुव्यावरचा खेळ आहे माझ्याकडे. पुतण्या लहान असताना जावेने बनवला होता / बनवून घेतला होता.
छान खेळ आहे तो. त्यात बरेच परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स करता येतात. आयाम सध्या फक्त रंग आणि आकार वेगवेगळे करणे हेच करु शकतोय. यादोन्हीचे कॉम्बिनेशन पण बर्‍याचदा जमतं त्याला.