लंडनमधील मादाम तुसॉं या प्रसिद्ध वॅक्स म्युझियमच्या (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) धर्तीवर लोणावळा येथे उभारले आहे भारतातील पहिले सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तेंव्हा आता मेणाचे पुतळे बघायला लंडनला जायची गरज नाही.
सुनिल कंडल्लूर या केरळ येथील तरूणाने हे म्युझियम उभारले असुन सध्या येथे २५ सेलिब्रिटींजचे मेणाचे पुतळे आहेत. १९९३ साली फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा केलेल्या सुनिलचे स्वप्न आहे मुंबईत वॅक्स म्युझियम उभारण्याचे.
सदर म्युझियम हे लोणावळ्यापासुन अंदाजे २-३ किमी अंतरावर असलेल्या "वरसोली" या गावात आहे (लोणावळा टोलगेटजवळ). हे वॅक्स म्युझियम उभारून सुनिलने जगाला दाखवून दिले आहे कि, "हम भी किसीसे कम नही".
वेळः सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत
प्रवेश फि: ७५ रुपये (प्रति माणशी)
वेबसाईट: www.celebritywaxmuseum.com
संपर्कः ०२११४ ३२३८६६/०२११४ २७७६६६
=================================================
छत्रपती शिवाजी महाराज


महात्मा गांधी
मदर तेरेसा


स्वामी विवेकानंद
पंडित जवाहरलाल नेहरू
राजीव गांधी
माता अमृतानंदमयी
अॅडॉल्फ हिटलर
रसुल पुक्कुट्टी
हरीहरन
एस्. सुब्बलक्ष्मी

ए. आर. रहमान

मायकल जॅक्सन

श्री. बालाजी तांबे
सत्यसाईबाबा



सद्दाम हुसेन
अरे , हे महितच नव्हते
अरे , हे महितच नव्हते .
सुबुलक्ष्मी, रसूल पोक्कुटी आणि रेहमानसर अगदी खरे वाटतायेत. अप्रतिम!!
बघायलाच पाहिजे एकदा.
Pages