बाणगंगा

Submitted by पाटील on 28 November, 2010 - 09:42

आज बाणगंगा येथे केलेले जलरंगातले चित्र

Banganga.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर.
(पण हे जरासे डल (म्लान) का दिसते आहे? की मलाच तसे वाटते आहे?)
कालच कान्हेरी गुंफांमध्ये गेलो होतो तेव्हा तुमच्या कार्ला लेण्याच्या चित्राची आठवण आली. ते चित्र खरंच फार सुंदर होते.

आवडले.
रैना माझ्यामते चित्र काढतांना त्या ठिकाणी ज्याप्रमाणात सूर्यप्रकाश/ढगाळ वातावरण असेल त्याप्रमाणे चित्राचा टोन सेट होतो. इथे तसे झाले आहे की नाही माहित नाही.

आवडले.
बहुतेक हे फोटो काढताना/स्कॅन करताना डार्क झालय का? अजुन जरा एक्पोजर वाढवलं तर जास्त छान दिसेल का?

धन्यवाद, चित्र थोड ड्ल व्हायचे कारण म्हणजे या कागदावर पलिकड्च्या बाजुवर येक पेंटींग आधि केले होते, पुन्हा त्याच पेपरची मागची बाजु वापरली. सावली- थोड एक्स्पोजर वाढवुन चांगलं करता येईल पण मग ते मुळ चित्रा पेक्षा थोड वेगळे दिसलं असतं

प्रपोर्शन छान आहे चित्रामध्ये!
बाणगंगा परिसरात सॅचुरेटेड रंग आणि त्याच्यामध्ये कायम एक हार्ड कॉन्ट्रास्ट असतो. तो परिणाम ऑईल पेंटिंग माध्यमामधून जास्त चांगला दिसेल असे वाटते. ऑईल माध्यमातील टेक्स्चरमुळे एक मिती अजून वाढेल चित्रामध्ये!

अभिजीत - जर या वॉटरकलर साठी रफ टेक्स्चर्ड पेपर वापरला तर तू म्हणतोस तसा टेक्स्चर मिळवता येईल. लोकेशन वर जाउन ऑईल पेंटींग थोडं कठीण असते कारण रंग लवकर सुकत नाहित. अ‍ॅक्रॅलिक मधे करायला हवे परत कधितरी.
हार्ड कॉन्ट्रास्ट बद्दल दुजोरा. मी थोड लवकर सुरु केले होते मात्र दुपारी कचकचित सावल्या पडल्या होत्या.

पाटील, तिथे आता रंगरंगोटी केली आहे का ? मी काही वर्षांपुर्वी तिथे गेलो होतो, त्यावेळी असे नव्हते.
आणि मला वाटते बाणगंगेचा अजून काही भाग चित्रात यायला हवा होता. तो एक बंदीस्त तलाव आहे, हे जाणवत नाही, या चित्रात.

दिनेशदा- पुर्ण तलावचे चित्र काढायचे तर थोडं वरच्या पायर्‍यांवर बसुन चित्र करावे लागेल, थोड कठीण आहे . रंग असेच आहेत पण घाण वाढत चाललेय, पुर्वी येका कोपर्‍यात पाण्याचा झरा वाहताना दिसायचा तो बहुदा बुजलाय

छान. Happy

रैना म्हणते तसे मलाही डल वाटले होते, पण आता कळाले का ते. Happy
बाकी, तुमची जलरंगातली चित्रे नेहमीच सुंदर असतात. त्यात वेगळे काय सांगायचे? Happy

रिक्षा--
http://www.onlinegraphicdesigndegree.com/features/painting-watercolor/
या वेबसाईट ने माझा ब्लॉग Top Watercolor Painting Blogs २०१० मधे नुकताच फिचर केलाय. त्या पेजवर Weekend Brushstrokes सर्च केलतं तर माझ्या ब्लॉग ची लिंक मिळेल

खूपच सुंदर !:) मुंबईला कॉलेजला असताना गेले होते २-४ वेळा इथे.
रामाने बाण मारून ह्या जागी पाणी आणलं म्हणून बाणगंगा, अशी काहीतरी गोष्ट आहे ना ह्या जागेची?
समुद्र अगदी जवळ असूनही इथे गोडं पाणी आहे म्हणतात.आणि ते कुठेतरी खालून समुद्राशी कनेक्टेड आहे,असं ऐकलंय. ( माहिती ऐ़कीव आहे. मला खात्री नाही.:))

सुंदर.

रुणुझुणू - इथे रावणाने वाळु ची शंकराची पिंड बनवुन पुजा केली म्हणुन वालुकेश्वर- वाळकेश्वर आणि रामाने बाणाने पाण्याचा स्त्रोत्र तयार केला म्हणुन बाणगंगा असं काहिशी आख्याईका आहे

Pages