अतिरेक्यांचे मित्र

Submitted by रणजित चितळे on 20 November, 2010 - 00:04

२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुंधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क
जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदु ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापुन आले आहे.) महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतुन अरुंधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडु लोकांना त्यांच्या आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठींबा जाहीर केला आहे.
अशी सभा बोलावण्याची कृती, व अश्या सभेत साक्षात भाग घेणे व त्याही वरुन काश्मीर तोडु अतीरेक्यांना पाठींबा जाहीर करणे हेच मुळी भारतीय कायद्याचे १२४अ कलमाचे उल्लंघन होते. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी ह्या कलमाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावता येते. (१२४ अ राष्ट्रविरोधी कृत्य (sedition) – ‘whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. the Government established by law in India, shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine’) व त्या दृष्टीकोनातुन बघीतले तर सरकारने अरुंधती रॉय व त्यांच्या मित्रांवर तात्काळ हे कलम लागु केले पाहीजे. व असे होत नसेल तर आपण भारतीयांनी व त्यातल्या त्यात राष्ट्रव्रत (राष्ट्रव्रता बद्दल अजुन कोणाला जाणुन घ्यायचे असल्यास, राष्ट्रव्रत ह्या वर टिचकी मारा) घेतलेल्यांने अरुंधती रॉय व त्यांच्या मित्रांवर व त्यांच्या सगळ्या वाङमयावर बहिष्कार घातला पाहीजे. हे सच्च्या भारतियांच्या हातुन उपजत झाले पाहीजे. हा बहिष्कार त्यांचे डोके ठिकाणावर येई पर्यंत व त्यांना त्यांची चुक समजुन येई पर्यंत टिकला पाहीजे.
अजुन विचार करण्या सारख्या गोष्टी अशा आहेत
(अ) अरुंधती रॉय सारखी लोकं प्रसिद्ध होण्या साठी व राहण्या साठी कोणत्याही थराला पोहोचतात. अशा लोकांपासुन आपण सावध रहायला शिकले पाहीजे व अशा लोकांना खत पाणी घालणे बंद केले पाहीजे.
(ब) अरुंधती रॉय सारख्या लोकांनी हे समजुन घ्यायला पाहीजे की आपल्या देशाचे ऐक्य सर्वोच्च्य आहे व असायला पाहीजे. भारताचे सार्वभौमुत्व व एकता हे त्यांच्या पैसा, प्रसिद्धी व समाजात नावाजलेले राहण्याच्या ईर्षे पेक्षा जास्त महत्वाचे आहे. भारत आहे तर ते आहेत. व हे जर अशी लोकं लौकर समजली नाहीत तर आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी व राष्ट्रव्रती लोकांचे कर्तव्य आहे की त्यांना ते समजुन सांगायचे. त्यांच्याच भाषेत, त्यांच्यावर बहीष्कार घालुन. अशा लोकांना प्रसिद्धी व पैसा हा खुप प्रिय असतो व बहीष्कार घातला तर तो जातो व तेव्हाच त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ठिक होते.
(क) आपले सरकार व राजकिय पक्षांनी डोळ्यात तेल घालुन अशा सभांना कोणाचा पाठींबा मिळतो, पैसे कोण देतो ह्याचा थांगपत्ता लावला पाहीजे. त्यांना असे
ब-याच वेळेला कळुन येईल की पुष्कळ वेळेस पाकिस्तानच अशा सभांना व
एन.जो.ओ ना पैसे व मदत देत असतो.
(ड) भारत सरकारने भारतीय कायद्यांचा योग्यतो प्रयोग व उपयोग करुन अशा लोकांना तेथेच व तेव्हाच धडा शिकवला पाहीजे व अशा वेळेस सुज्ञ भारतीयांनी त्याला उपजत व पुर्णपणे पाठींबा दिला पाहीजे.
लक्षात ठेवा अब्राहम लिंकन चे वाक्य “the idea of secession is the essence of anarchy”. आपले सरकारने ह्याला अजाणपणे पण खत पाणी घालायला नको व सुज्ञ भारतीयांनी डोळ्यात तेल घालुन असल्या सगळ्या डावपेचांना शह दिला पाहीजे.

गुलमोहर: