Submitted by सावली on 3 November, 2010 - 21:44
फ्लॅक्स सीड ला मराठीमधे काय म्हणतात?
फ्लॅक्स सीड ऑईलच्या गोळ्या मिळतात का? कुठे मिळतील?
जर फ्लॅक्स सीड ऑईलचा अजुन कुठल्या प्रकारे आहारात समावेश करता येईल?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्लॅक्स सीड म्हणजे जवस. तुला
फ्लॅक्स सीड म्हणजे जवस. तुला तिथे फार्मसीमध्ये गोळ्या मिळतील कदाचित.
फ्लॅक्स सीड्स ला मराठीत जवस
फ्लॅक्स सीड्स ला मराठीत जवस म्हणतात..कोलेस्टोरेल कमी करण्याकरता अतिशय उपयोगी आहे..एक चमचा पुड रोजच्या तयार भाजीत मिसळावी..जवसाला विशेश चव नाही..जवस हाताला गरम लागेल इतपत गरम करुन मिक्सर मधे पुड करुन रोजच्या जेवणात वापरावे.....होल-फुड ला मिळते..
धन्यवाद हे आईला हवय खरतर. मग
धन्यवाद
हे आईला हवय खरतर. मग भारतात मिळेलच 
जवसाची चटणी करतात ना?
सावली, भारतात जवसाची चटणी
सावली, भारतात जवसाची चटणी वगैरेही मिळते बघ.
दिनेशदा कडे एक मस्त चट्णी
दिनेशदा कडे एक मस्त चट्णी रेसीपी आहे. जवस व लसूण इत्यादीची.
धन्यवाद सगळ्यांनाच रेसिपी
धन्यवाद सगळ्यांनाच
रेसिपी मधे विचारते त्यांना कशी करायची ते.
अगं आपण आळशी म्हणतो ना त्याच
अगं आपण आळशी म्हणतो ना त्याच त्या! याचा काढा, भाजून आळशी ह्या सर्दीसाठी फार उपयुक्त आहेत. इथे अमेरिकेत नेहेमी "डॉ . ओझ शो' पहाते त्यात वजन कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो असे ऐकले होते.
याची पूड देखील इथल्या दुकानांमधे मिळते.
जवसाची चटणी इथे आहे -
जवसाची चटणी इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105534.html?1158509156
जवस वगैरे माहिती इथे आहे - http://www.maayboli.com/node/9103
धन्यवाद आईला स्किन
धन्यवाद
आईला स्किन प्रॉब्लेम आहे त्यामुळे ओमेगा ३ असलेले पदर्थ हवे होते. याची चटणी करता येते म्हण्जे रोज खाईल ती.
कोलेस्ट्रोल आणी वजना बद्दल महित नव्हते. आता त्यासाठिहि वापरता येईल.
सावली, किंग्ज सर्कलला,
सावली, किंग्ज सर्कलला, सर्कलला लागूनच एक स्पेशालिटी फूड्स चे दुकान आहे. तिथे हे तेल मिळते.
मराठीत ओसोजनाकू अश्या काहिश्या नावाचे पुस्तक आहे. त्यात ओट्स, सोयाबीन, जवस, नाचणी आणि कूळिथ यांचा पाककृति आहेत. हे पुस्तक दादरला मॅजेष्टीक मधे मिळेल. आयडियल मधे पण मिळेल.
जवस वा अळशी आता कुठल्याही किराणा दुकानात मिळतात.
अश्विनीला सांगितलेली चटणी यात
अश्विनीला सांगितलेली चटणी
यात प्रमाण असे नाही, आवडीप्रमाणे घटक घ्यायचे.
दोन वाट्या अळशी, अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी तीळ, दोन टेबलस्पून ओवा, दोन टेबलस्पून हिंग, एक टेबलस्पून मिरीदाणे, चवीप्रमाणे मीठ, दोन लसणीचे गड्डे.
अळशी, जिरे, तीळ व ओवा सगळे वेगवेगळे भाजायचे. अळशीची बारीक पूड करायची. जिरे भरड करायचे. ओवा आणि तीळ अर्धवट दळायचे. त्यात मिरपुड टाकायची. आणि बाकिचे जिन्नस टाकायचे. लसूण शक्यतो ठेचून टाकला तर चांगला पण मिक्सरमधे वाटू नये. गार्लिक प्रेसने बारिक केला तर छान (हे उपकरण मुंबईत मिळते )
त्यात हवेच असेल, तर सुके खोबरे (भाजून), दाण्याचे कूट व लाल तिखट टाकायचे. यातले सर्वच मूळ घटक आरोग्यदायी आहेत. आणि हि चटणी चवदार होते.
भाकरीवर, ब्रेडवर लावून खाता येते. वरणभाताबरोबर खाता येते. भाजी आमटीत मसाला म्हणूनही वापरता येते. कोरडी वाटली तर थोडे करडईचे तेल मिसळून खाता येते.
दिनेशदांनी दिलेली एक जवसाची
दिनेशदांनी दिलेली एक जवसाची रेसिपी इथे आहे : http://www.maayboli.com/node/2610
अश्विनीला सांगितलेली चटणी>>
अश्विनीला सांगितलेली चटणी>> ही मी केवळ वाचली आहे आणि आता करून बघेन. मी एकाचवेळी साबुदाणावडा व बटाटा वडा खाणारी अत्रंग व्यक्ति आहे.
लाट्ण्याच्या निरुंद बाजूने एक एक लसूण पाकळी मस्त ठेचली जाते. गंमत पण येते.
जवसाला विशिष्ट असा वास असतो,
जवसाला विशिष्ट असा वास असतो, तो घालवण्यासाठी, ते भाजुन घेतात वा लसणीचा वापर करतात
आई नक्की सान्गु शकेल)
दम्यावर जवसाचा /आळशीचा काढा देतात (अतिशय बुळबुळीत होतो अशी आठवण आहे, नाक दाबुन प्यायचो)
सर्दी/दम्यावरच, जवसाची पुरचुन्डी पाण्यात उकळवुन, त्या पुरचुण्डीने छाती शेकवतात - झेपेल इतपत गार करुन घ्यावे.
कोणत्यातरी जननशान्तीमधे "जवस" हा दानपदार्थ आहे.
कोठा साफ होण्यासही याचे सेवन उपयोगी पडते.
सुगरण स्त्रीया, मेथीसारखाच यान्चाही वापर अधेमधे स्वयम्पाकात करतात, तो कसा ते "सुगरणीन्नाच" विचारले पाहिजे (लिम्बी सान्गु शकेल की नाही याची शन्का हे
बुळबुळीतपणा या गुणाचा वापर
बुळबुळीतपणा या गुणाचा वापर करुन, काहि पदार्थात तो बाईंडर म्हणून अंड्याच्याऐवजी वापरता येतो.
अनेकवेळा पावावर तो लावतात.
माझ्या मित्राच्या दरभंगा मधे राहणार्या आजी, याची पूड वापरून, पेपरमॅशच्या वस्तू बनवायच्या.
जवसाची पुड जर गव्हाच्या पीठात
जवसाची पुड जर गव्हाच्या पीठात टाकली तर चालेल का ?
रचु, चवीत काहीच फरक पडणार
रचु, चवीत काहीच फरक पडणार नाही, फायदाच होईल, पण किंचित काळपट रंग येईल. भाजीत/ आमटीत पण टाकता येईल. लक्षात येणार नाही.
धंन्स दिनेशदा बघते करुन
धंन्स दिनेशदा
बघते करुन
फ्लेक्स सीड ला मराठीत आळशी
फ्लेक्स सीड ला मराठीत आळशी म्हणतात हे बरोबर पण जवस म्हणजेच आळशी का? माझ्या मते जवस म्हणजे एक प्रकारचे काळे तीळ. हे लांब आणि बारीक असतात. जवसालाच खुरासणी असेही म्हणतात. याची पण चटाणी करतात. चुभुद्याघ्या.
दिनेशदा, या आळशीच्या बियांची चटणी मीही करते. जरा मॉडिफाय केलेली आहे - बिनपॉलिशचे तीळ भाजून, आळशीच्या बिया भाजून. मग मिक्सर मध्ये तीळ, आळशी आणि आक्रोड घालून बारीक करते. आणि मग मीठ, तिखट आणि लसूण घालून एकत्र करते. हेल्दी भी, टेस्टी भी!!!
मामी, कनफ्यूजन ! कनफ्यूजन
मामी,
कनफ्यूजन ! कनफ्यूजन !!
मला वाटते खुरासणी म्हणजे कोरटे म्हणजे कारळे. पण काळे तीळ वेगळे !
आता मी पण लिहितो, जाणकार प्रकाश टाकतीलच !!!!
जाणकार ???? तरी पण, जवस
जाणकार ????
तरी पण,
जवस तपकीरी रंगाचं, चपटं, गोलसरं आकाराचं.....
काळे तीळ, तीळचं पण काळ्या रंगाचे...
कारळं, थोडफार जी-याच्या आकाराच आणि काळ्या रंगाचं..
तिन्ही प्रकार वेगवेगळे.....
दिनेशदा, तुम्ही जाणकार नाही
दिनेशदा, तुम्ही जाणकार नाही तर मग कोण?????? बाबा वाक्यम प्रमाणम!!!
दिनेशदा आणि स्निग्धा, धन्स. कन्फ्यूजन दूर झालं.
चला मी फूलांच्या भाषेत लिहितो
चला मी फूलांच्या भाषेत लिहितो (मी आणखी काय करणार ?)
अळशीची पाने बारीक असतात. त्याचे झाड मीटरभर वाढते. एक उभी फांदी आणि तिला सभोवती आठ ते सहा चक्राकार फांद्या येतात. याची फूले सुंदर आकाशी रंगाची असतात. साधारण सदाफूलीच्या फूलांसारखी दिसतात.
तीळाचे झाड मीटरभर उंच वाढते. त्याची पाने लांब असतात. फूले गुलाबी जांभळट रंगाची असतात. एक पाकळी लिप प्रमाणे बाहेर आलेली असते आणि गडद रंगाची असते. फूल निमूळत्या घंटेच्या आकाराचे असते. याच्या बर्याच रानटी जाती आहेत. (पण त्या सगळ्यांच्याच बिया खाद्य नसतात.)
कारळ्याचे झाड अगदी छोटे असते. पाने खरखरीत असतात. फूले पिवळी व साधारण एक सेमी व्यासाची असतात. पावसाळ्यात महाराष्ट्रात शेताच्या बांधावर याची लागवड झालेली दिसते.
जव मात्र वेगळे. ते गव्हाच्या
जव मात्र वेगळे. ते गव्हाच्या आकारचे पण करड्या रंगाचे असतात.
आता मी कन्फ्यूजन झाले. कालच
आता मी कन्फ्यूजन झाले.
कालच मी फ्लॅक्स सीड आणले त्याचा रंग ब्राउन आनि चपटं आहे पण गोलसरं आकाराचं नाही आहे.
रचु, तुम्ही बरोबर आणलय जवस.
रचु, तुम्ही बरोबर आणलय जवस. खा बिनधास्त. जवस टिअर ड्रॉप आकाराचं असतं.
जवस = आळशी = फ्लॅक्स सीड्स
जवस = आळशी = फ्लॅक्स सीड्स आणि इतर तत्सम पदार्थ हा मागे मिनोतीने काढलेला सचित्र धागा.
कारळ्याचे झाड अगदी छोटे असते.
कारळ्याचे झाड अगदी छोटे असते. पाने खरखरीत असतात. फूले पिवळी व साधारण एक सेमी व्यासाची असतात. पावसाळ्यात महाराष्ट्रात शेताच्या बांधावर याची लागवड झालेली दिसते. >>
काराळ्याचे झुडूप साधारण २-२.५ फुटी असते. त्याची फुले साधारण पिवळ्या डेझीच्या आकाराची (इंचभर व्यासाची) असतात. ही फुले साधारण दसर्याच्या दरम्यान येतात. नोव्हेंबरमधे फुले खुडून त्यापासून कारळे म्हणजे खुरासणी म्हणजेच कोरटी म्हणजेच काळे तीळ वेगळे केले जातात. याची मळणी शेतात करतात त्यामुळे बियांमधे प्रचंड प्रमाणात माती असते. धुवुन स्वच्छ करण्याशिवाय पर्याय नसतो.
बाकी फोटो वरती रूनीने दिलेल्या धाग्यावर आहेतच.
मला शुद्ध 'रेड वाईन' औषधी
मला शुद्ध 'रेड वाईन' औषधी वापरासठी हवी आहे. पुण्यात कुठे मिळेल? वाईन दुकानांतली preservatives युक्त असते असे वा टते. सल्ला हवा आहे.