सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा !!.
पूर्वी एक ट्रेन्ड आली होती, ड्रेनेज चा कट केलेला पाइप विकत आणून त्याची दीपमाळ बनवायचा
टकाउतून टिकाउ च्या निमित्तानी हे सुचलं होतं पण यात टाकाउपेक्षा टिकाउ गोष्टी जास्त आहेत म्हणून हे दिवाळी साठी राखून ठेवलं :).
तर हा रिकामा डबा, हार्डवेअर स्टोअर मधून मिळाणारे ब्रॅकेट्स वापरून केलेला दीपमाळ बनवायचा प्रयत्न:
हा डबा:
हे ब्रॅकेट्स:
डब्याला ब्रॅकेट्स मेटल ग्लु नी चिकटवले.
नंतर विटकरी रंग देऊन कुंभाराच्या भट्टीतून काढल्याचा लुक दिला :).
पांढर्या थ्री डी पेंट्स ना कोन मधे वापरून सजवला.
पणत्या पण त्या कलर थीम मधे सजवल्या आणि ब्रॅकेट्स वर ठेवल्या.
काचेचा एक टी लाइट होल्डर पण विटकरी रंग देऊन सजवला, डब्यावर पालथा ठेवला ( आत मधे एक बॅटरी ऑपरेट टी लाइट ठेवला)., त्यावर एक पणती ठेवली.
आणि हा फोटो टी लाइट्स, पणात्या पेटवल्यानंतरचा.

दिवाळी निमित्त सजवलेल्या मेन्दी कॅन्डल्स.
(सगळ्या कॅन्डल्स मधे बॅटरी ऑपरेड फ्लेम आहे.)





आतिशय सुंदर...घरातल्या टाकाऊ
आतिशय सुंदर...घरातल्या टाकाऊ डब्यापासून बनवायची आईडिया तर मस्तच..
Pages