टाकाऊ डब्यापासून केलेली दीपमाळ आणि सजवलेल्या मेणबत्त्या .

Submitted by दीपांजली on 3 November, 2010 - 15:24

सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा !!.

पूर्वी एक ट्रेन्ड आली होती, ड्रेनेज चा कट केलेला पाइप विकत आणून त्याची दीपमाळ बनवायचा
टकाउतून टिकाउ च्या निमित्तानी हे सुचलं होतं पण यात टाकाउपेक्षा टिकाउ गोष्टी जास्त आहेत म्हणून हे दिवाळी साठी राखून ठेवलं :).

तर हा रिकामा डबा, हार्डवेअर स्टोअर मधून मिळाणारे ब्रॅकेट्स वापरून केलेला दीपमाळ बनवायचा प्रयत्न:
हा डबा:
can21.jpg

हे ब्रॅकेट्स:
can20.jpg

डब्याला ब्रॅकेट्स मेटल ग्लु नी चिकटवले.
नंतर विटकरी रंग देऊन कुंभाराच्या भट्टीतून काढल्याचा लुक दिला :).
पांढर्‍या थ्री डी पेंट्स ना कोन मधे वापरून सजवला.
पणत्या पण त्या कलर थीम मधे सजवल्या आणि ब्रॅकेट्स वर ठेवल्या.
काचेचा एक टी लाइट होल्डर पण विटकरी रंग देऊन सजवला, डब्यावर पालथा ठेवला ( आत मधे एक बॅटरी ऑपरेट टी लाइट ठेवला)., त्यावर एक पणती ठेवली.
can11.jpg

आणि हा फोटो टी लाइट्स, पणात्या पेटवल्यानंतरचा.

can13.jpg

दिवाळी निमित्त सजवलेल्या मेन्दी कॅन्डल्स.
(सगळ्या कॅन्डल्स मधे बॅटरी ऑपरेड फ्लेम आहे.)

can18.jpgcan19.JPGcan14.jpgdurga.jpgcan24.jpgcan17.jpg

गुलमोहर: 

झक्कास ! मी आज करून बघतेय , काही अडचण आली तर येतेच तुला विचारायला . Happy
मला पांढरा रंग भरण्यासाठी कोन कोणत्या प्लास्टिकचा केलास ते सांग ना , तेच एक जरा चॅलेंजिंग वाटतेय . Happy

थॅ़क्स पुन्हा एकदा.
संपदा,
प्लॅस्टिक चा नाही, रंगीत कोन चा रोल मिळतो( Mylar -cellophane wrap ) तो वापरलाय.
झिपलॉक बॅगचं जाड प्लॅस्टिक किंवा दुधाच्या पिशवी वापरली तरी चालेल, मी पाहिलय वापरून पूर्वी.

अतिशय अतिशय सुंदर आहे दिपमाळ.... आणि सजवलेल्या कँडल्सही Happy

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... Happy

मेणबत्ती वरील मेन्दी चे डिझाइन टिकुन रहावे यासाठी वापरलेल्या फिक्सर चे नाव.कं आणि ते कुठे मिळेल ते सांग ना... मेणबत्त्या व दिपंमाळ छान झाली आहे..

बाप रे! काय पेशन्स आहे!

सुंदर! Happy अंधार्‍या खोलीत ती दीपमाळ ठेवून त्याचा फोटो काढ ना. ( आणि तो पण इथे टाक ना...)

डीजे, दीपमाळ अप्रतीम. त्या थ्रीडी पेंटवाल्या कंपनीला पाठवले हे फोटो, तर जाहिरातीत घेतील लागलीच!

खुप छान...आवडलं..
मेणबत्ती वरील मेन्दी चे डिझाइन टिकुन रहावे यासाठी वापरलेल्या फिक्सर चे नाव.कं सांगा ना..गा Happy

बाप रे! दिपांजली माझ्याकडे कौतुक करायला शब्दच नाहीत. Happy
निव्वळ अप्रतिम कला आहे तुझ्याकडे... Happy
ती अशीच बहरू दे.. Happy

अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!

जांभळी मेंदी दिसतिये एका कँडल वर, ती कशी? का तो रंग आहे?

Pages